मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय १४ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय १४ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय १४ वा Translation - भाषांतर १०८अंगराज्यत्यागें होई अराजक । निरुपायें राज्य वेना देती ॥१॥आधींच तो क्रूर त्यांत होता राजा । करी सज्जनांचा अपमान ॥२॥यज्ञ, दान, होम, करुं नये कोणी । डांगोरा पिटूनि जनां कथी ॥३॥स्वयें रथारुढ होऊनि आज्ञापि । तदा कांपे पृथ्वी स्वर्गासह ॥४॥वृत्त हें सकळ कळतां मुनींसी । पाजिलें सर्पासी दग्ध वाटे दुग्ध ॥५॥असो, आतां पाहूं करुनियां बोध । न ऐकतां दग्ध करुं तेजें ॥६॥वासुदेव म्हणे चिंतूनियां ऐसें । पातले सभेतें मुनिश्रेष्ठ ॥७॥१०९शांतपणें मुनि विनविती वेना । आचरीं स्वधर्मा स्वहितार्थ ॥१॥आयुष्य, संपत्ति, तेंवी बल, कीर्ति । धर्ममार्गे जाती तयांलागीं ॥२॥धर्ममार्गे प्रजापालन जो करी । कृपा तयावरी श्रीहरीची ॥३॥वेद, हवनीयद्रव्यें, तपश्चर्या । स्वरुपें हीं आर्या, भगवंताचीं ॥४॥वैभवाचें मूळ लोकपालकृपा । संतोष तयांचा यज्ञमार्गे ॥५॥सन्मान विप्रांचा यास्तव करावा । बोध वासुदेवा मोद देईं ॥६॥११०ऐकूनियां मुनिबोध । वेन बोलला उन्मत्त ॥१॥अधर्मासी कथितां धर्म । करितां विपरीत कर्म ॥२॥संरक्षक मी तुम्हांसी । पूजा त्यागूनियां माझी ॥३॥ऐसें जारिणीचें कृत्य । आचरितां तुम्ही मूर्ख ॥४॥करिती अवज्ञा राजाची । कदा न त्यां इष्टप्राप्ति ॥५॥ब्रह्मा, विष्णु, शिव, इंद्र । देव नभांत सकळ ॥६॥विष्णूचि तो नरपती । आराधना करा माझी ॥७॥मजचि द्यावें बलिदान । श्रेष्ठ मजहूनि कोण ॥८॥वासुदेव म्हणे ऐसीं । मुक्ताफळें उन्मत्ताची ॥९॥१११ऐकूनि नृपाची उन्मत्त ते वाणी । संक्रुद्ध होऊनि मुनिश्रेष्ठ ॥१॥म्हणती तत्काळ वध याचा योग्य । निर्लज्ज हा जग संहारिल ॥२॥राज्यपदालागीं असे हा अपात्र । दुर्बुद्धि हा क्रूर अधार्मिक ॥३॥जयाच्या कृपेनें ऐसी राज्यप्राप्ति । तया ईश्वरासी निंदितो हा ॥४॥मरणचि तेणें योग्य या दुष्टासी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥५॥११२संयमित क्रोध उफाळे मुनींचा । दुर्वर्तनें होता मृतचि राव ॥१॥हुंकारें तयाचा करुनियां नाश । गेले आश्रमास सुखें मुनि ॥२॥पुत्रशोकें दु:ख पावली ‘सुनीथा’ । रक्षी पुत्रप्रेता मंत्रबळें ॥३॥ऐसा कांही काळ लोटतां वनांत । दुश्चिन्हें मुनींस कळलीं बहु ॥४॥तस्कर जनांसी बहु पीडिताती । प्रतिकार त्यांसी न करी कोणी ॥५॥अराजकामाजी समर्थही जन । अनिष्ट जाणून मनांत मुनिश्रेष्ठ ॥७॥अंग वंशावरी कृपा श्रीहरीची । व्हावी वंशवृद्धि तयाचीच ॥८॥वासुदेव म्हने चिंतूनियां ऐसें । निज अधिकारातें स्मरती मुनि ॥९॥११३अनाथरक्षणास्तव शांतवृत्ति - । विप्रेंही, दुष्टांसी वधणें योग्य ॥१॥उपेक्षा द्ष्टाची होतां शिरीं पाप । तपश्चर्याभंग ब्राह्मणांचा ॥२॥जाणूनि हे शास्त्र औदासिन्यत्याग । करणें उचित म्हणती मुनि ॥३॥पुढती वेनाच्या अंकाचें मंथन - । करितां, कृष्णवर्ण प्रगटे नर ॥४॥हस्त पाद र्हस्व, दीर्घ हनु त्याची । नासिका निम्न ती रक्तनेत्र ॥५॥ताम्रवर्ण केश आंखूड शरीर । होऊनियां नम्र अत्यादरें ॥६॥काय करुं ऐसें म्हणतां निषीद । बोलले तयास मुनिश्रेष्ठ ॥७॥निषाद वनींचे संतती तयाची । वेनपापरुपी नगरबाह्य ॥८॥वासुदेव म्हणे यापरी निषाद । वसती वनांत सर्वकाळ ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP