मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध २ रा| अध्याय २ रा स्कंध २ रा द्वितीय स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा स्कंध २ रा - अध्याय २ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध २ रा - अध्याय २ रा Translation - भाषांतर ५कल्पांतीं निद्रिस्थ ब्रह्मा कल्पारंभीं । उठतां विस्मृति तया होई ॥१॥रचावी हे केंवी सृष्टि तें कळेना । भगवद्रुपध्याना करी तदा ॥२॥तेणें तया ज्ञान होतसे सकळ । ऐसा अधिकार धारणेचा ॥३॥वेदामाजी कर्ममार्ग वर्णियेला । परी नच व्हावा मोह त्याचा ॥४॥स्वर्गादि तयाचीं फलें अशाश्वत । यास्तव कर्मात न रसो जीव ॥५॥जीवरक्षणार्थ सेवावे विषय । म्हणे वासुदेव हांव नसो ॥६॥६नश्वर शरीरसुखार्थ प्रयत्न करुं नये जाण कदाकाळीं ॥१॥रक्षणार्थ सर्व व्यवस्था ईशाची । भूमी आश्रयासी निर्मियेली ॥२॥उपाधान हस्त, अंबर तें वस्त्र । तलहस्तपात्र उदकास्तव ॥३॥दिशा वल्कलें वा पांघरुण सिद्ध । फलमूलादिक अन्न बहु ॥४॥तैसेंचि अनन्य शरण जो त्यासी । संरक्षीन ऐसी भाक असे ॥५॥द्रव्यमदांधाचें कासया आर्जव । वासुदेवा देव साह्य असे ॥६॥७जन्म-मरण तें अज्ञानाचें योगें । अज्ञान तें नासे भक्तिबळें ॥१॥विषयसंगें तापत्रयपूर्ण - । संसारनिमग्न, होई जीव ॥२॥यास्तव विषयप्रवृत्त कर्माचा । अवलंब साचा करुं नये ॥३॥विरक्तें प्रादेशमात्र मूर्तिध्यान । करावें सगुण हृदयामाजी ॥४॥शंख चक्र गदा पद्मायुधयुक्त । प्रफुल्लित नेत्र सुप्रसन्न ॥५॥कटीसी मेखला पीतांबर नीट । मस्तकीं किरीट दीप्तिमान ॥६॥रत्नभूषणें तैं किरीट कुंडलें । चरणीं नूपुरें असों द्यावीं ॥७॥कौस्तुभ वनमाला श्रीवत्सलांछन । सुहास्य वदन कुरळे केश ॥८॥प्रसन्न नयनें आपणासी पाहो । सदा ऐसी ध्यावी हृदयीं मूर्ती ॥९॥वासुदेव म्हणे पाहतां पाहतां । येवो तन्मयता ऐशा ध्यानीं ॥१०॥८पुढती संपूर्ण रुप ध्यानीं घ्यावें । प्रेमें न्याहाळावें सकल अंग ॥१॥तन्मय तें मन बुद्धीसवें लीन । करावें अनन्यभावें पदी ॥२॥नित्य नैमित्तिक कर्माच्या शेवटीं । विराट रुपासी नित्य ध्यावें ॥३॥विराटस्वरुप चिंतितां ईश्वर । भरुनि सर्वत्र उरला दिसे ॥४॥दृश्यमिथ्याभान यायोगें प्रत्यक्ष । होई साधकास ऐशापरी ॥५॥नश्वर शरीर जाणूनि सुखार्थ । प्रयत्न तो व्यर्थ करुं नये ॥६॥वासुदेव म्हणे देहान्तसमयीं । वर्तावें तें केंवी ऐका आतां ॥७॥९देशकालचिंता त्यागूनि सर्वथा । व्हावा इंद्रियांचा लय चित्तीं ॥१॥स्थिरासनीं चित्तलय तो बुद्धींत । बुद्धि क्षेत्रज्ञांत लीन व्हावी ॥२॥परमात्मरुपीं लीन व्हावा जीव । याहूनि प्राप्तव्य नसे कांहीं ॥३॥अनिवार जरी कालाचा प्रभाव । निर्गुणीं न बल परी त्याचें ॥४॥ज्ञातेही आत्म्यासी मानूनियां श्रेष्ठ । अहंममत्याग करुनी ध्याती ॥५॥वासुदेव म्हणे देहत्याग कैसा । करावा तें आतां कथिती मुनि ॥६॥१०योगी आसनस्थ व्हावा । गुरुद्वारीं पाय द्यावा ॥१॥ऐसें द्वार करुनि बंद । वायु खेंचावा तो ऊर्ध्व ॥२॥मूलाधार स्वाधिष्ठान । मणीपूर तें तेथून ॥३॥हृदयीं अनाहत चक्र । कंठीं चक्र तें विशुद्ध ॥४॥सप्तद्वारें कर्णादिक । असती एथूनि वायूस ॥५॥एथ सावधान व्हावें । पुढती आज्ञाचक्रीं जावें ॥६॥अर्ध मुहूर्त त्या स्थानीं । प्राण रक्षावे योग्यांनीं ॥७॥वासुदेव म्हणे मार्ग । पुढती ऐका एकचित्त ॥८॥११निष्काम योग्यानें लिंगदेहत्याग । करुनियां, ब्रह्मरंध्रीं जावें ॥१॥भेदूनि तें देह त्यागूनियां जावें । ब्रह्मरुप व्हावें परमानंदें ॥२॥अथवा कामना असे जरी चित्तीं । लिंग देहाप्रती त्यागूं नये ॥३॥ऐसा देहत्याग करील तयासी । संचार सुखेंची ब्रह्मांडांत ॥४॥वायुरुप लिंगदेहें वायुगति । लाभे योग्याप्रती योगमार्गें ॥५॥गती हे योग्याची भक्ताविण अन्या । कदाही लाभेना ध्यानीं असो ॥६॥वासुदेव म्हणे शिशुमार लोकीं । जाई या पुढती योगिश्रेष्ठ ॥७॥१२शिशुमार तेंचि राया धुव्रचक्र । याचाचि आधार ब्रह्मांडासी ॥१॥भेटूनि एकाकी योगीर या चक्रासी । जाती न देवांसी गति तेथें ॥२॥पुढती सत्यलोकीं ब्रह्ययाचा निवास । भक्तांसी वैकुंठ पुढली लाभे ॥३॥ऐसे भक्त पंचभूतआवरणें । भेदूनि क्रमानें पुढती जाती ॥४॥क्रममुक्ति ऐसी लाभे योग्यांप्रति । अथवा सद्योमुक्ति निष्कामातें ॥५॥यापरी कथिलें वेदांनींच ज्ञान । भागवतधर्म श्रेष्ठ असे ॥६॥वासुदेव म्हणे जेणें भगवंत । आकळेल मार्ग तोचि श्रेष्ठ ॥७॥१३अनुभवाविण जडे प्रेम केंवी । ऐसी नच घेईं शंका राया ॥१॥प्रत्यक्ष दर्शन न देई ईश्वर । परी सर्वाधार तोचि एक ॥२॥प्रति व्यवहारीं संबद्ध तो असे । मन, बुद्धि, माझें म्हणे कोण ॥३॥म्हणसी जरी जीव तरी त्याचा द्रष्टा । कोण ऐसा चित्ता करीं प्रश्न ॥४॥सर्वद्रष्टा सर्वसाक्षी तोचि ईश । चालक विश्वास घेईं ध्यानीं ॥५॥जाणूनि हें त्याचे गुण गावे सदा । ऐकावें सर्वदा भागवत ॥६॥कर्णपुटामाजी भागवतामृत । सांठवी तो मुक्त भक्तिलाभें ॥७॥वासुदेव म्हणे ईशपदांबुजीं । होतां चित्तशुद्धि प्रेम जडे ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP