उत्तर खंड - स्वधर्मपालन
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
योयं पश्यति सर्वत्र करोन्मुक्तफलाशया ॥
अन्य: संदृशमानोपि भ्रमादन्यो न विद्यतें ॥१॥
हो जी स्वामि श्रीगुरुनाथा । आइकतां आत्मकथा । या संशयाचें माथा । शून्य पडलें ॥१॥
वस्तु पाहातां प्रत्यक्ष । आपण चि होणें सर्वसाक्ष । ये उपास्ति बंधमोक्ष । कोणा नेमें ॥२॥
स्वयें ब्रह्म जेथ होणें । तेथें ये काइसी बंधनें । वासना नुरे मां प्रमाणें । कोणें उरति ॥३॥
हें सर्व येक ब्रह्म । नुरे व्दैत धर्माधर्म । पुण्यें पुण्य कर्माकर्म । कोणां बैसें ॥४॥
आतां ग्रहस्तु आणि इति । दोघां येक चि पांती । निंदा कां स्तुति । एक स्तोत्र ॥५॥
अतज आणि सूवर्ण । येके तुलें प्रमाण । उदार आणि कृपण । येकमार्गीं ॥६॥
भूपति आणि रंक । दोघां आसन येक । सुवर्ण आणि मशक । तुका आलें ॥७॥
अशौच्य आणि कर्मिष्ट । आरोगणें येक ताट । प्रतिमां पाथरा संपुष्ट । येक जालें ॥८॥
संवादु आणि कळि । आरोहण येक डोळि । अरिमित्रां दीवाळी । येकें घरीं ॥९॥
शिष्यु आणि गुरु । दोघां येक बैसकारु । सुरु आणि असुरु । येकें पदिं ॥१०॥
गंगे थिलरीचें पाणि । जाली येकी चि माथनी । भक्तां अभक्तां मिळणिं । येकें भद्रीं ॥११॥
मार्गामार्ग दरुशणादरुशण । वस्तिसी येक ची पाटण । स्वर्गानरकाचें भुवन । हारपलें ॥१२॥
बाहिजबोल आणि वेदु । समतुल्यल्येम आणि वेदू । विलापु हास्य दुख आनंदु । एकस्थानी ॥१३॥
नि:कामु आणि सकामु । उभयां येकु ची नेमु । चिताग्रि आणि होमु । एकक्रिया ॥१४॥
सर्वज्ञु आणि सटु । बैसके येकु चि पाटु । अंबाच्यें आणि चावटु । एकमुखीं ॥१५॥
गति आणि अव गति । येकें तुळिके सेजावती । बंधा मुक्ता येके गती । चालणें जालें ॥१६॥
जीणें आणि मरणें । जालें येक चि साजनें । हविष्य आणि तुष्मानें । एकोदरें ॥१७॥
प्रवृति निवृत्ति । येके हिंदोलां बैसती । सुन्यें स्वरुपस्थिति । येकी असे ॥१८॥
त्वं पदा तत्पदा । जाला येकु चि बांधा । कर्मोकर्माचा धोंदा । येकवटला ॥१९॥
सामान्यें उत्कृष्ट परी । दोन्हि वस्तु येकघरी । भाव अभाव अंबरी । येकें दोन्हिं ॥२०॥
विवर्त्तु परिणामु । उभय वस्तु येक नेमु । भास निर्धारा समु । येक ठावो ॥२१॥
सजाति विजाति । भेद आले येक पांती । क्रोधा आणिक शांति । येक रथु ॥२२॥
वोत आणि प्रोत । हें सर्वही तद्रुत । सुव्रत आणि दुवृत । येकें देविं ॥२३॥
संयोगु वियोगु । यासी येक चि भोगु । असें असोनि जगु । भेदिं कांहिं ॥२४॥
पाहातां मुक्त सर्व जन । कासें संशयबंधन । असें बोले वचन । शिष्य तो गा ॥२५॥
हा सर्व येकंकारु । कां नव्हे वर्णसंकरु । असें आईकुनि गुरु । वासिंपला ॥२६॥
॥ इति शीष्यवचन ॥ऽऽ॥
====
आइकुनि हे मातु । जाला श्रीगुरु विस्मीतु । जें कां हे ज्ञान नव्हे घातु । संप्रदाया ॥२७॥
हे बोल नव्हेति चोखट । प्रत्यक्ष उगवले कालकूट । हें वचन नव्हे वाट । नष्ट बुधीचि ॥२८॥
जेथुनि निगे हे उत्तर । तो कंठ दुवृत्तिचें भांडार । रसना नव्हे हे खगधार । स्वधर्मावरी ॥२९॥
असी शिष्याची वाणि । पडली गुरुचा कांनि । परपुरुषाचि दुतिनी । पतिव्रते जैसी ॥३०॥
विषें व्यापिले मिष्टान्नें । कि स्यामळें पिळी लंसने । किं त्या पापाचि वचने । पवित्र क्षमें ॥३१॥
तैसा सद्ररु कांटाळला । परि सर्वही कोपु साहिला । पाठिं बोलतां जाला । मंझुला वचनी ॥३२॥
मग ह्मणे गा शिष्या । तुज आणिलें ब्रह्मपक्षा । परि आह्मि हें समष्या । दाविलि नाहि ॥३३॥
जे या कर्मातें टाळावे । वर्णाश्रम वाळावें । नाहि बोलिलों गाळावें । स्वधर्मातें ॥३४॥
सर्वात्मा सचिदानंदु । सर्वथा दाविला अभेदु । परि याधर्माचा सन्मंधु । तोडिला नाहीं ॥३५॥
तुं अकस्मात येकसरिसें । घेउनि उठलासि कैसें । पशु विचरति तैसे । विचरावें ह्मणौनि ॥३६॥
तरि गा श्रृष्टि करिता प्रजापति । प्रजा रचुनि क्षिति । विश्वा घातली सुति । वर्णंधर्माचि ॥३७॥
कर्म रचिलें आधि । पाठी प्रजाची वृधि । हे पूर्विचि केली अवघी । विश्वजनकें ॥३८॥
श्रौत स्मार्त नित्य नैमितें । कर्में प्रसीधें विहितें । विधी निषेद अनंतें । तैं चि नेमिलें ॥३९॥
हे प्रभुचि आज्ञा । पूर्विची केलि संज्ञा । ते करीतासी अविज्ञा । तो तु ची भला ॥४०॥
तुझें बोले साचारु । तैलोकीं वर्णसंकरु । होये तैं हा सुषें विचारु । गांठी बांध ॥४१॥
या बाहिरमुदां उतरिं । तु चि पडसी बाहिरीं । परि हें विश्व स्वाचारी । चळे ना ढळें ॥४२॥
जो स्वज्ञाति वाळि । अन्य ज्ञाति कवळि । तो प्राणिं कोण्हें काळिं । पवित्र नव्हे ॥४३॥
असा प्राणि अचोखटु । त्याचा होये घटस्फोटु । त्या पतिताचा विटु । उभये लोकीं ॥४४॥
आचार वेव्हार प्रायश्चीत । याची कारणें चालत । यास्तव स्वधर्मरहीत । होउ नये ॥४५॥
जे निर्धारें ब्रह्मीष्ट । तेही होति कर्मभ्रष्ट । तै ते लोकाचारी सुष्ट । कोण ह्मणें ॥४६॥
तरि तुजहोनि समर्थ । पूर्वि बोलिले परमार्थ । त्याचे त्यासी काये हितार्थ । कवळे नव्हते ॥४७॥
ब्रह्म हरिजात सनिलु । यांसी न लगे संसारमळु । तर्हिं वर्णधर्माचा सलु । रक्षिला तेहीं ॥४८॥
हे मुष्यकरुनि देव । शुक वामादि रुषि सर्व । उरग नृप गंधर्व । यक्ष सीध ॥४९॥
इत्यादि ब्रह्मीष्ट तेवढें । संशयो चि घालिति पुढें । कां जें वर्णु धर्मु वाढे । तो तो महिमा ॥५०॥
जो या भेदाचि पाळि । जो धर्माधर्मु दुआळी । तो ये श्रृष्टींचि नवाळी । गौळ न दिसे ॥५१॥
मनु भानु जनकादिक । देखति ब्रह्म चि सकळैक । केधवांहीं कर्मंनिंदक । नव्हती चि ते॥५२॥
ते ब्रह्मस्छित वर्त्तती । दाटोनि कर्म अनुष्टीति । कां जें हें लोकप्रवृत्ति । राखता भलिं ॥५३॥
देवें पूर्ण ब्रह्मिष्टें । झांडोनि अकर्माचे सरोटें । लाविलें स्वधर्माचे वाटॆ । सर्व जन ॥५४॥
सर्ववणिं सद्भावें । ब्रह्म सर्विं अनुष्टावें । आपुला धर्मिं चालावें । नेम जाले ॥५५॥
जो अतिशयें ब्रह्मदृष्टा । त्यासी विशेषें कर्मप्रतिष्टा । कां जे बोइला श्रृष्टा । तें चुकों नये ॥५६॥
जे ज्याचे आचार । ते त्या गौरवाकार । हें अगडेंसी उत्तर । आदि प्रभूचें ॥५७॥
यास्तव व्दीजवर्ण । ते शट् कर्मि प्रविण । एहिं न संडावें आसन । स्वधर्माचे ॥५८॥
शुचिवस्त्र संध्यास्नान । यज्ञोपवीत पौड्रधारण । भक्ति नेम अनुष्ठान । हा श्रृंगारु तया ॥५९॥
दान दमन दया । अति अळंकारु तया । परा वानि जैसया । केदनि मनि ॥६०॥
कंठाभरणें वेद श्रृती । दाटल्या येति स्मृति । पदें व्याख्यान विप्तती । कळसु क्रिया ॥६१॥
जरि वेदति वेदमुखें । जगीं ब्रह्म दाटलें देखे । तरी कळसावरी सुखें । हा चि मनी ॥६२॥
जो वेदु त्यासी प्रमाण । तें चि त्यासी आचरण । जे ज्याचें दरुशन । तें चि त्यासी भलें ॥६३॥
आतां क्षत्रियाची कर्में । तें चाळावीं रजोधर्में । तेहि दुसरीयाचें नेमें । विटाळु मानावा ॥६४॥
ते ब्राह्मणाहुनि अध । यासी बोलिले व्रतबंध । ते वर्णि त्रीविध । कर्म नेमलें ॥६५॥
त्यासी वेदादिक पठन । निश्चय बोलिले यजन । मुमुक्षु महादान । करावें तेहीं ॥६६॥
तेहि प्रतिग्रहो नेघावा । आणि मंत्रु न संघावा । वैश करुनि देवा । नेंदावे कोन्हा ॥६७॥
तेही प्रजातें पालावें । दुष्ट नष्टा पीडावें । मित्रासी असावें । अंगसंगे ॥६८॥
तेही कासभास रक्षावी । प्रतिज्ञा प्रयत्नें पाळावी । तेही काळाहि नेदावी । शरणागतें ॥६९॥
तेही न संडाव रिपुव्देशा । रणि रिंगावें सहसा । तेथ या देहाचि आशा । धरुं नये ॥७०॥
थोडें बहु आपें परु । हा सांडोनि विचारु । सन्मुख रणि जुझारु । रणशौरा तो ॥७१॥
पश्चिमे उगवे तरणि । क्षिति सांडि सहस्रमणि । कां भरला उलंडी पाणि । वारानिधि ॥७२॥
जर्हिं नभि उडे मेरु । जर्हिं विष दे हीमकरु । तर्हिं न पाहे रणशुरु । मागील वास ॥७३॥
गजदंति शस्त्रघातें । सन्मुख विडारति आंते । खंडे खंडे असंक्षाते । अंगे सुटती ॥७४॥
ते स्वशतें स्वर्गु घेती । इंद्रु हातें लोटीति । वरी ब्रह्मज्ञानें संसृती । चुके त्याची ॥७५॥
वैश धर्म प्रमाण । सामान्य पक्षयजन । दया देहदमन । बोलिलें त्यासी ॥७६॥
कृशी वाणिज्यें दोन्हिं । वैश्यभाग भर्वसेनी । तेही अन्य धर्माचि भरणि । भरुं नये ॥७७॥
शुद्र धर्मकारण । स्वभावतां घ्यावे दान । महाकर्माचें अनुष्ठान । तयां नसे ॥७८॥
महाकर्म वैश्यां नाहिं । ते केवी बोलिजे शुद्रदेही । शुद्रांता स्वधर्मु तोहिं । असा असे ॥७९॥
तिं वर्णाची सेवा । त्यां हा धर्मु बरवा । अन्य धर्माचा हेवा । न कीजे तेंही ॥८०॥
हे चि देव इदुहितें । हें चि बोलिलें भगवद्रीते । जें स्वधर्मा परुतें । चांग नाहिं ॥८१॥
परधर्मु अलोलिंकु । तो नव्हे मोक्षदायेकु । आपुलें धर्मं परलोकु । प्रात्पु होये ॥८२॥
असो येरां उपन्याती । जे जे धर्म आहेति । तेणें चि त्याची गती । नेमस्त असे ॥८३॥
तीर्थ व्रत दया दान भक्ति । हे ग्राह्य सर्व ज्ञाती । वरी असीजे ब्रह्मस्छीति । हा विशेषगुण ॥८४॥
जें ब्रह्मीष्ट निर्मळ । ते स्वभावता भजनशीळ । कां जे व्रथाचारु सकळ । पालणे तेंही ॥८५॥
ब्रह्मीष्ट कर्में सांडीति । मा तें अघोर रीघती । हे ना तर्हिं चाळिती । स्वधर्मातें ॥८६॥
आपुली सांडीता याति । हे चि लोकी अपकीर्ति । आणि आपुले सुहृद वंचिति । आपणातें ॥८७॥
असें आपलें अपिमान । देखती आपले लोचन । या जीवित्वापरीस मरण । तें चि भलें ॥८८॥
आपुली अपकीर्ति येसणि । रुढ होये ये मेदिनी । तें आपणे आपुला श्रवणि । आईके जेव्हां ॥८९॥
तेव्हां कृष्णमुख करावें । कां भलतें प्रयत्नें मरावें । वांचुनि तोंड दावावें । हे तों न घडे ॥९०॥
कदाचि हें सर्व जन । बोलैल तोंड राखुन । परि अपरोक्ष उमति गुणागुण । राहाति तैसें ॥९१॥
यास्तव गुह्यरुपें सुजाणि । भ्रमण करावें पटनि । जन बोलति दोसणि । बुधि घेणें ॥९२॥
आइकुनि कीर्तिचि मातु । मिसीये घालावा हातु । अपकीर्ति तैं पायांतु । मुख घालिजे ॥९३॥
यास्तव ज्ञाति राखावि । स्वधर्मि वस्ती घ्यावी । हा चि निर्धारु जीबिं । असो देणें ॥९४॥
हा धर्मु आचरतां देहिं । होईल दु:ख साहावें तेहीं । या धर्माचें भय कांहिं । धरुं नये ॥९५॥
येथ तुजा कोण विचारु । करुं पाहासी वर्णसंकरु । हा अंत्यजाचा आचारु । घेऊं नये ॥९६॥
तुं बोलतासी जो योगु । तो कपालिकां आला भागु । जे सर्वज्ञाति संसर्गु । करावा तेहि ॥९७॥
उत्तम मध्यम कनिष्ट । तया नाहिं सुष्ट दुष्ट । पुण्य पाप भ्रष्टाभ्रष्ट । ते जाणति चि ना ॥९८॥
तेहीं आणौनि नाना रसु । हा चि करावा उपदेशु । जना दावावा विश्वासु । ये चि ठाईं ॥९९॥
तैसे चि मद्यपानि अंतज । ज्ञातिहिन भ्रष्ट सहज । त्यांसीं कांहिं निर्बिज । ज्ञान उठे ॥१००॥
ते वाचेचेंनि बले । युक्ति सिधांताचेंनि मेळें । स्वाचारवंतासी खलें । मांडोनि ठाति ॥१॥
अन्रुत्यें असत्यें प्रमाणें । तैसी आणिति अनुमानें । जातिशंकराचें माने । आंगि जडिति ॥२॥
तैसें चि वर्णभ्रष्टयुक्त । बाह्य शास्त्री होति शक्त । आपण ह्मणविति मुक्त । नाडिति येरां ॥३॥
तरी मातु भगिनी दुहिता । मीत्र बंधु पुत्र पिता । आहार वेव्हार चिंता । स्मरु असे ॥४॥
इत्यादि याचें सर्वज्ञान । आणि आचरति आने आन । तुं त्या दुर्बुधाचें वचन । आइकु चि नोको ॥५॥
जे शुधाशुधरहित । तैं कोण्हिं इंद्रियेगळित । मनहेतु विवर्जित । माहायोगी ॥६॥
गळित पत्राचिये परी । जे असती संसारी । ते नेणती कुसरी । पवित्रापवित्र हें ॥७॥
जैसें जे जे पडे क्षीति । तें अव्हेरु नेणे पुडती । तेवि त्या सीधाचे स्थीती । निवाड नसे ॥८॥
शुधाशुध अविचारें । सर्व सोषावे दिनकरें । कां पवित्रा पवित्रें जठरें । दाहावें सर्व ॥९॥
कां शुचि आणि चांडाळ । हें कांहिं चि नेणि जळ । कां निष्टानिष्ट सूक्ष्म स्थूळ। नेणें प्राणु ॥१०॥
छेदुक पाळकु असे । दारुचां ठाईं कहि नसे । कीं व्याप्य अव्याप्य प्रकाशें । जाणिजेते चि ना ॥११॥
तैसें ते सदा आनंद । यौगी नेणति भेदाभेद । रिपु मित्र हरुष विषाद । हे त्यां कैचें ॥१२॥
ते लाविले मार्गें चालति । बैसवीलें ठाईं बैसती । मुखी घातलें करीति । चवर्ण त्याचें ॥१३॥
शीतोष्ण निंदां स्तुति । रम्यारम्ये गत्यागति । हे सर्व विस्मृति । तया पुरुषा ॥१४॥
जे हि जालयां दशा । येथ विचारु घालितां कैसा । तो तो मनलयों चि असा । दीठि दिसे ॥१५॥
येवढें दशे वर्त्तति । परि ते वर्णाचारी न शोभती । तेहि प्रवेसीलें अन्न नेघती । सदाचार ते ॥१६॥
ते देवाचिये परी । अखंड पुजावे स्वाचारी । परी मोकलें त्या भीतरी । असनें नसे ॥१७॥
ब्रह्मीष्टा इंद्रीय़े गळितां । सरी नाहिं उभयतां । येकु सचिळु असुच्येता । येका असे ॥१८॥
तो अंतरी परस्तु सचिळु । परी वर्ण दीसे मळु । आणि ब्रह्म विदु केवळु । सांडी मांडी नेणे ॥१९॥
सदा ब्रह्मिं ब्रह्मविद । देखती विश्वेसी अभेद । परि ते राखति व्दंद । जना पुरुतें ॥२०॥
कां जे सृष्टिकर्त्याचि अगड । राखति मानौनि गोड । निकें धरीति तोंड । वेदशास्त्राचें ॥२१॥
फलासक्त नि:काम बुधी । अखंड वर्त्तती विधि । तरी कायी यें कर्मबुधी । ब्रह्म नव्हे ॥२२॥
कर्म ब्रह्म समान । कोण्हा येकाचें वचन । परी ब्रह्म तुळे आन । गणि जै तें नसे ॥२३॥
विचाराचें पालडां । कांहीं मने पाहों धडां । तो या ज्ञानासी तुके एव्हडा । कोन मिळे ॥२४॥
स्वधर्म नियम साधनें । तीर्थे क्षेत्रें व्रतें दाने । योग तपे प्रयाने । आश्रम मार्ग ॥२५॥
याचि पालडां आणिक । कर्म धर्म उपाधिक । पठण आचार वेदिक । क्रिया कलाप ॥२६॥
शास्त्रें पुराणें इतिहास । वेद वित्पति अभ्यास । महाविद्या चतुर्द्दश । याचि पालडां ॥२७॥
भूभ्रमण प्रदक्षणा । दया दान दमन । सम समादि साधन । प्रत्याहार ॥२८॥
भय लक्ष साधी सीधी । हटयोगु काष्टी निरोधी । ध्यान धारण समाधी । याचि धडां ॥२९॥
नवही भक्ती यावरी । कळसु ठेविजे मुक्ति च्यारी । हव्यें कव्यें याहिवरीं । दयादमनें ॥३०॥
हें सर्वत्र येकीकडे । नेमुनि येक पालडें । आणिं येकलें येकें धडॆं । ब्रह्म ज्ञान ॥३१॥
तें ज्ञान अधीक । उंचलों न सके हें अनेक । हें जड तें तुळीक । साम्यें कैचें ॥३२॥
जड तें जालें हळुवट । हळु मूळिं घनवट । सजाति सामर्थ्यें बरवंट । कोण तुके ॥३३॥
जंवरी भेदु या पालडां । तंवरी नुचले तो धडा । कां जें संशयो तेव्हडां । उणावो आणि ॥३४॥
या सर्वा शीरी पवित्र । पडॆ नि:कामनेचें पत्र । तरी ते धडे सतंत्र । उचले कांही ॥३५॥
जेवी व्दारके देवेंसी । तुकां अटलि तुलसी । ब्रह्मज्ञान हे तैसी । नि:काम बुधी ॥३६॥
ब्रह्मज्ञान नि:कामता । मिळीण येती उभयेता । तैं त्यां एरां समतां । रुप होये ॥३७॥
ऐसया बुधी सर्व चाळी । तो सभाग्यें भूतळीं । कर्म ब्रह्माची झळाळी । आंगी दावी ॥३८॥
यास्तव ब्रह्मीष्ट पुरुश । स्वाचार मानि शेष । निशेषें आचरति निर्द्दोश । गौरवे जेतें ॥३९॥
आणि आत्मभ्रष्ट मूढजन । ते हें न मनिति प्रमाण । त्याचें विदृप आंगलक्षण । सर्वत्रीं दिसे ॥४०॥
ब्रह्मिष्ट देखति समान । भेदें नेघति वर्णावर्ण । परि तैसें आगें आचरण । तया नाहिं ॥४१॥
जैसी मर्यादेचि अगड । समुद्र राखे अवघड । ना न रखे तै काय आड । मर्यादा राहे ॥४२॥
कां दीवसाचि अगड राखोनि । पूर्वे उगवे तरणी । ना नुगवे तरी काये बांधोनि । आणिल पूर्व ॥४३॥
नेमु राखोनि काळकूटी । देवें धरीलें आपुला कंठी । टाकी तरी काये कवंटी । देवासी ते ॥४४॥
कां शेषें वोड उणि फणि । अगडा रक्षिली धरणी । ते टाकीतां काये परतूनि । माथा बैसे ॥४५॥
तेंवी यां ब्रह्मीष्टां । राखणें हें चि काष्टाअं । कां जें वर्तावें शुष्टां । कर्मामध्यें ॥४६॥
ते हें नि:कर्म देखती । तर्हिं कर्ममर्यादा रक्षिती । आचार लावणार्थ आचरति । अशक्त फळें ॥४७॥
पाहे पां स्वधर्माचा डांगु । येणें डागिला सर्व जगु । हा ठाईचा आंगलगु । फीटो नेणें ॥४८॥
जो जाति जडला आहे । तो फेडीतां भला नोहें । हा धुतां जडोनि राहे । अनाचारु ॥४९॥
हें असावें स्वाचार लासे । धुतां अनाचारु कोठु बैसेम । तो काळांतरें कां प्रयासे । कदाही न फीटे ॥५०॥
स्वाचारु सांडो जाणे कोडॆं तें अवश्यें बाहिर पडे । पाठीं त्या मेल्याहि नातुडें । वर्णसुख ॥५१॥
दरुशणें मुख्य करुनि । जें वर्तति वर्ण टाकोनि । ते प्रति धरीतां कोण्हे वर्णि । केव्हांहिं न येति ॥५२॥
दाहिल्या घटाचें ठिकरें । मृत्तिके नमिळे निर्धारें । तैसें तें वर्णबाहिरें । वर्णधर्मा नये ॥५३॥
अधर्मु आंगिकारितां जाण । ब्रह्मीष्टां लागे लंछन । कर्मिष्टां तरि पतन । भर्वसेनि ॥५४॥
कर्मा कर्माचें कळकटें । या जनाचे आंगि आपटॆ । परि हें सर्वथा न घटें । आत्मनिष्ठा ॥५५॥
येथ संसारु दिसे वावो । तेथे या सर्वा कैंचा ठावो । तर्हिं स्वधर्मांचा पावो । मोडों नये ॥५६॥
जी जी संतहो तुह्मी साक्ष । हे विश्व ब्रह्म अपरोक्ष । तरि पतन कां मोक्ष । कोण देखे ॥५७॥
तेथही नि:काम बुधि । कर्में करावीं आधीं । असे जे तुह्ममधी । शोभा पावे ॥५८॥
कदाचि माझें वचन । हा मानिल अप्रमाण । तुमचें बोलें निक्षेपण । दृढ होईल ॥५९॥
रे रे शीष्या बुधीमंता । हें चि मनि धरि आतां । हा स्वधर्मु चाळितां । भलें असें ॥६०॥
पाहे पक्वदशे वेदु । करीतां ब्रह्मानुवादु । दाखवीला अभेदु । एकु आत्मा ॥६१॥
तर्हिं कर्माचा हातु । न सोडी तो धीमंतु । मध्यें येरांचि मातु । काये तेथें ॥६२॥
यास्तव हालों नये चालों नयें । सांडो नये मांडो नये । उंच निच बोलों नये । सिध्दवस्तु ॥६३॥
आहे असावें ये चि स्छिति । हें चि सार गा शीष्यमूर्ति । कांहि हि विकल्प पुडती । धरु नये ॥६४॥
स्वधर्मावरी विहिते । कर्में होति शोभीवंतें । कां जें तें फलाशा रहितें । ब्रह्मदग्धें ॥६५॥
ईहलोकीं परस्थानी । वाचति परार्थ दोनि । ते तुं आचर भर्वसेनी । शोष्याराजा ॥३६॥
ब्रह्म जालयां नाहि उरि । हा निर्धारु सर्वें परीं । तर्हिं हेतु धरुनि स्वाचारी । राहे आतां ॥६७॥
श्री सिध्देशाची अगड असी । निश्चयें राखावी मानसी । त्रींबकु ह्मणें अहिर्णिशी । हें चि चुकों नये ॥१६८॥
इति श्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडविवरणे स्वधर्मपालन योगोनाम त्रयोदश कथन मिति ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP