उत्तर खंड - सचिदानंदनिरुपण
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
सचिदानंदरुपाय ब्रह्मणे मूर्त्तिधारिणे ॥
क्षराक्षरपरायेति नमस्ते परमात्मने ॥१॥
आतां सांगो तिन्हि पदें । जे ज्ञान विषयीं अगाधें । अति पूर्ण प्रसीधें । आद्यें सर्वा ॥१॥
येकाग्र करुनि मन । आईक एक एक वचन । हे भर्वसेंनि कथन । आलोढयें करि ॥२॥
हें कळलेंया बरी । उकले सर्व उभारी । आतां आईक निर्धारी । पदत्रयें ॥३॥
परमात्मा सचिदानंदु । तो पदत्रईं अनुवादु । यव्दिषयीं संविदु । करुं तुज ॥४॥
सर्वांमध्यें कारण । तें सब्रह्म संपूर्ण । याचें करुं निरुपण । यथास्थित ॥५॥
जेथ खुंटले बोलणें । तें अनुभवें जानणे । परि जाणनें नेणनें । हें हि नसे ॥६॥
चिदा पूर्वि जैसें । ब्रह्म शुध प्रकाशे । तें चि सत्पद असें । ओळखावें ॥७॥
चिब्रह्मपरिपूर्ण । जे शाश्वत सघन । सर्वास्त समान । चित्पद तें ॥८॥
जो सर्वात्मकु शुधु । सर्वा पुरोनि अभेदु । ते तृतीय आनंद पद । ऊँ ळखावे ॥९॥
सद् सर्वत्र संचले । चिद् पूर्ण दाटलें । सर्वस्थ रुपासी आलें । तें आनंद पद ॥१०॥
सदा चिदा उभयेता । द्रष्टा आनंदु देखता । जो जाला निर्मिता । मायाब्रह्मांडेसी ॥११॥
ये तिन्हिं पदे संचली । एकांतु येकें दाटली । अद्यापी नाहिं निवडली । भेदवाजें ॥१२॥
जैसें ब्रह्म निर्गुण । तैसें चि चैतन्यें पूर्ण । शुध सुख समान । या चि परी ॥१३॥
सुत वस्त्र व्यंजन । तिघा एक चि प्रमाण । साकर रुप गोडपण । तुल्यें तिन्हि ॥१४॥
सद् सुन्यें नासाकार । तें उत्तम सर्वाचें सार क्षराक्षरापर । परंत ते ॥१५॥
जैसें जांबुनदी सोने । तें वानवळिसि तुकनें । तेवि ब्रह्मिं द्रुष्टांतु देणे । आथि चि ना ॥१६॥
अमृताचा डोहो जैसा । उपमितां नये आनसा । ब्रह्मीं दृष्टांतु तैसा । देतां नये ॥१७॥
लोपुनि पूर्ण सविता । दिपु प्रकाशु पावता । तैं दृष्टांतु नेमता । परब्रह्मीं ॥१८॥
आपुला पानि पाहातां । काये दर्पणाचि चिंता । तैसें दृष्टातें घेतां । नये ब्रह्म ॥१९॥
प्रत्यक्ष व्यापीलें गगनें । तें घ्यावें दृष्टांते कोणें । ये भूमितें पुसों जाणें । कोणां ठाया ॥२०॥
जें स्वयें प्रकाशे । तें घ्यावें कोणें सायासें । या स्वशरीरातें पुसे । तें चि मूर्ख ॥२१॥
जें ब्रह्मज्ञानें आंधलें । जयासी ब्रह्म न कळे । ते चि लाविती डोळे । ब्रह्मविषई ॥२२॥
प्रकाशलियांहि भास्करा । असाहि जो पुसे एरा । तो जातिअंधु चि एरा । बोलुं नसे ॥२३॥
तेवि असुनि ब्रह्म सकळ । जो नेदखे प्रांजळ । त्याच्या ज्ञानाचे फळ । विजुळाकार ॥२४॥
जो ब्रह्मज्ञाता ह्मणौन । बोले चांचरतें वचन । तया मूर्खासी प्रमाण । कोण देखे ॥२५॥
असोनि मार्ग दळलें । जो चाले खोवित पाउलें । तो अंधु येणें बोले । विश्वासावें ॥२६॥
तैसा सदिसर्व जनु । जो बाह्यरुप प्रमाणु । तो प्रापंचिकु वाचुनु । बोलो नये ॥२७॥
तें लिजें निर्गुण । परि सर्वातरबाह्यपूर्ण । साश्वत सर्वसमान । सर्वाद्य हें ॥२८॥
हें वेदाचि परमकाष्टा । वेदांतु या तळिचा द्रष्टा । दरुशणाहिं श्रेष्टा । तें आद्या हें ॥२९॥
हें पुलिंग ना स्रिवाचक । व्दिभाव ना नपुंसक । जैसें तैसें सकळैक । पूर्ण ते हें ॥३०॥
हे सर्व साक्षात्कार। दाटलें पूर्ण निरंतर । तर्हि बोलिजे हें उत्तर । न साहें येथे ॥३१॥
हे चि बुधि आलि वेदा । बोले सर्वेसी भेदा । तत्व निर्धारा आनंदा । रुप केलें ॥३२॥
“ आनंद मित्येकं ब्रह्म ” । हें चि वेदां आलें वर्म । शब्द धर्म आश्रम । येथ चि वरि ॥३३॥
यास्तव हें सकळ । ईश्वरी चि भज शीळ । चिब्रह्मी निर्मळ । ज्ञान याचें ॥३४॥
मौन्यमुद्रा या पुढें । शब्दु तो येथे चि बुडॆ । ना नोको ह्नणु आतुडें । सुखें तें येथें ॥३५॥
घॆतां देतां नये ह्मणौनि । वासिपुनि सांडीसी झणि । आहे ते भर्वसेनी । हें चि सर्व ॥३६॥
हें पूर्ण नित्यें प्रकाशे । परि बोलतां नये जैसें तैसें । कां घेईजे देईजे असें । अपूरें नव्हे ॥३७॥
कर्मयोगु साधि लक्ष । तें न साहे प्रत्यक्ष । तुं निवांतु कां गा अधोक्ष । राहिलासी ॥३८॥
तरि पाहे पां तुझा पराकर्मु कैसा । घॆ कां सांडी या आकाशा । पाठिं आमचा पक्षु सहसा । मिथ्या मानि ॥३९॥
तें व्योम प्रमाणुत्वें हिन । असें सद् संपूर्ण गहन । तें घेईजे देईजें कैसेंन । दाटलें सर्व ॥४०॥
पाहे या भूतासी महत् भूतें । अंतरबाह्यें वेष्टीतें । परि आदि पश्चात् या तें । कोणें देखिलें ॥४१॥
तैसे आनंदे वेष्टीत सकळ । हे धिमंतां दृश्य निर्मळ । परि त्याचा पारु समूळ । कोण्हि नेणें ॥४२॥
तैसें देव रुषी वेद शास्त्र । हें यासी चि देखे सर्वत्र । पण या देवाचें चरित्र । कोण्हां न कळे ॥४३॥
जे माया शुधसत्वात्मक । ते या चि अंगशक्ति सकळैक । यासी व्यक्ति हे कौतुक । आहे ह्मणावे ॥४४॥
तिसीहि हा निर्धारे नाकळे । पाहातां दृष्टीहि पांगुळें । विचार विषई झांकोळे । मन तिचे ॥४५॥
आतां सर्वे ये खालुति । तेयाचा पारु कें जाणती । तर्हि येणें चि वेष्टिलि आहाति । हा निश्चयो असो ॥४६॥
आनंदा संलग्र चिद् । तें स्वभावें अमर्याद । दाटले असे अभेद । निरंतर ॥४७॥
ते वस्तुसी घ्यावे द्यावें । धरावें कां सांडावें । या बुधि कोण्हें भावें । नातुडे हें ॥४८॥
जैसें पडलेयां एकार्णविं । तोए धरे सांडे केवी । तैसें चिद्स्वभाविं । सर्वभूतां ॥४९॥
यासीही आदि केवळ । तें सद् सर्वत्रीं सकळ । जैसें तरंगातें जळ । तजु नेणें ॥५०॥
जेवि कणिके आणि घृता । तेवि ते सर्वभूता । येरि उपमा समस्ता । बाह्यरुपा ॥५१॥
गुळाचा बांधा मोडे । हेम भूषणीं विघडे । समुद्रिं सामुद्रिक खडॆ । बाहिर पडति ॥५२॥
वेगळे दीसति अळंकार । बिंबाहि येतिकर । कर्दळीचे पदर । निवाड देती ॥५३॥
जीवां ब्रह्मा तैसा । पाडु नाही सहसा । हा जलाचा आवर्त्तु जैसा । जळामध्यें ॥५४॥
ना ना घृति घृत कनिका । घृता चि मध्यें सर्पिका । तैसें तें सायें सकळैका । साश्वत असे ॥५५॥
इत्यमादि उपमा । न साहे सदा अनुपमा । सर्वही प्रमाणें सीमा । न पवति त्याची ॥५६॥
तुलें घालुनि कांटाला । उलथुं पाहिजे अंत्राळा । कां अंधकारु अंजुळा । उपसोनि घेणें ॥५७॥
तै संदि सर्व नेम । असो तें क्षराक्षर परम । हें संचलें अनुपम । परब्रह्म ॥५८॥
या सदा चेतव्य भाव । तें चिद् चैतन्यें सर्व । म्हणसी मायीक नाव । परी माया नव्हें ॥५९॥
तें चिद्रूपासी मूळ । येणें कल्पीसी सबळ । तें ब्रह्म चि केवळ । चिद् घन हें ॥६०॥
हें सदा कार्य जाण । आनंदाचें कारण । जगाचें जन्मस्थान । परवस्तु हे ॥६१॥
जेथुनु उठे विचारु । जो ‘मि’ येणें आकारु । तो जाण ईश्वरु । सुखानंदु ॥६२॥
सदिं चिदिं प्रगटला । कांहि अहंता आथीला । ब्रह्मश्रीसी आनंदला । ह्मणौनि आनंदु तो ॥६३॥
तो ईश्वरु सत्यें आहे । हें ईतुकें चि त्यासी साहे । हा अन्यें विचारीं नोहे । कोन्हें काळिं ॥६४॥
स्थिति विकारु नेमला । परि नाहिं येकदेशी निवडला । अपुरें पणाच्या बोला । नातळे हा ॥६५॥
स्थिति आहे नसे । चिदा न साहे असें । परंत भर्वसे । निर्विकार होये ॥६६॥
निर्गुण सदोदित सगुण । हें पदत्र याचें लक्षण । एका एक गहन । अभेद तर्हिं ॥६७॥
ते स्वभावता संपूर्ण । साश्वत प्रसिध पुराण । जेथ शब्द वर्ग वर्ण । असति चि ना ॥६८॥
नसे मात्रुका अंक बिंदु । ना बोलाचा सन्मंधु । तो गोसावी सब्दंधु । वोळखा ॥६९॥
तेथ भूतें ना अहंकारु । तो प्रकृति ना परमेश्वरु । भाशु आभासु आकारु । कांहिं नोहे ॥७०॥
असी धातु सांगतां । विकल्पु होईल चिता । तो नसे चि हे आतां । भाविल कोण्हि ॥७१।
तरि तो चि आहे साचारु । न साहे काहि निर्धारु । तरि सर्वाचा अंकुरु । तेथें चि उठला ॥७२॥
परि गा सर्वही निर्धारें । नाहि जालें प्रपंचाकारें । तें पूर्ण हें अपूरें । एके सवा ॥७३॥
समुद्र उदरीं निर्मलु । थडीये होये आदळु । तैसा एकी कडा मलु । उठला यासी ॥७४॥
सद केउतें चेतलें । तें चिदघन दाटलें । चैतन्यें नाव पावले । चेतलें ह्मणौनि ॥७५॥
जैसें जळांतु मगरें । कां नभगर्भि नभचरे । तैसी भूतें निरंतरे । चैतन्यगर्भि ॥७६॥
असें जें सर्वत्रीं अभेद । तें निश्चयें जाणावें चिद । हे होये व्दितीये पद । लक्षणें ॥७७॥
सदचिद पूर्ण प्रकाशु । रुपां आला सर्वसु । जो जाला उदासु । जगत्रयीं ॥७८॥
जो आपुलें निजसुखें । आपुलें निजरुप देखें । ते मीं ह्मणौनि तोखे । पुरुषु तो गा ॥७९॥
जो दोहीं पदातें देखे । ते चि ह्मणौनि तोखे । ब्रह्मश्रीयेचेंनि सुखे सुखावला जो ॥८०॥
जाणें सर्वाचा संवादु । यास्तव तो सुखानंदु । हा तृतीय पद अनुवादू । केला आह्मिं ॥८१॥
हें श्रीशंकराचें वचन । असें जाणावें भर्वसेन । परि याहि वेगळें आन । घॆति एक ॥८२॥
जे श्रृष्टीचालक देव तिन्हि । ते सचिदानंद भर्वसेनि । हे कीति एकाचि वाणि । रुढ असे ॥८३॥
तरिं तेथ प्रयंकु ब्रह्मांडा एवढा । महतत्वें गुंफीला गाढा । तेथ जाली पासोडा । महामया ते ॥८४॥
ईश्वरु ये सेजेवरी । येथ कल्पिता अनेत्र बोवरी । हें पुरैल किंवा चातुरीं । विचारावें ॥८५॥
आत्मा निर्विकारु पुराणें । एर विकारी सगुणा । हें पहावें विचारुन । विव्दज्जनि ॥८६॥
आणि रुद्रु उपदेशी कार्तिका । जे मिं आदिकरुन मशका । मृत्युमार्गु सकलैका । नेमस्त असे ॥८७॥
ज्यासी उत्पत्ति स्थिति विनाश । तें आत्मेंनि चले सर्वस । चळतें चाळितां सास । होये कैसें ॥८८॥
आत्मा शाश्वत पूर्ण । तें दशा पावती आन । तैं स्वस्कंधी आरोहण । जाले चि किं ॥८९॥
भक्ति धर्माचेंनि फलें । देव मुक्ति दानें आगलें । सेवा जानुनि नृपकुळें । तुष्टती तैसें ॥९०॥
असा नव्हे तो परमात्मा । जो सर्वासम सर्वसीमा । असो हे येक प्रवर्त्तलें विषमा । पदप्रमाणासी ॥९१॥
जे आदि ब्रह्म ईश्वरु । तो आनंदु साचारु । या खालुता विचारु । पदव्दयाचा ॥९२॥
आदि खंडी सठें कथन । तेथेंहीं केलें निरुपण । मंदबुध्दीचे ज्ञान । दुसीलें वोजा ॥९३॥
ईश्वरु आनंद पद । त्याचि माया ते चिद । क्षर प्रवत्ति सद् । नेमिलें तेही ॥९४॥
ईश्वरपर नाही आन । जेही असा केला पणु । त्याचा बोलाचा सीणु । ब्रह्मविदां ॥९५॥
तरि बृहदर्णिकीचें बोलनें । केलि पुरुषाचि लक्षणें । नेमला अक्षर पणें । परमेश्वरु तो ॥९६॥
तरि क्षराक्षरांसी आनु । पुरुषु असे कारणु । भगवद्रीते भवभानु । हें चि बोलिलें ॥९७॥
यास्तव पदत्रयें निर्धारु । आह्मिं केला साचारु । त्या वेगळा विचारु । घॆऊ नये ॥९८॥
॥इति पदत्रयनिर्धार ॥
====
क्षर:सर्वाणि भूतानि ’ । असी परमेश्वराचि वाणि । याच अर्थु घेति प्राणि । क्षरभुतें ॥९९॥
परि जें क्षरलें सर्वगुणें । ये भूतें चळति जेणें । भूत प्रवर्त्तले तो वोळखने । क्षर असें ॥१००॥
॥येथ निर्धारु ॥
====
त्या पुरुषाचें ज्ञान । हें ही करुं निरुपण । जें अतीपाडें गहन । सर्वामध्यें ॥१॥
दोनि पुरुषव्यक्ति । रुपा आले प्रवृत्ति । ते आइक यथास्थिति । चित देउनि ॥२॥
येक पुरुष क्षरु । जो क्षरला अहंकारु । चहुं भूतग्रामि साचारु । पुरोनि उरला ॥३॥
कीति येकाचें बोलणें । जें क्षर सर्वभूतें नेमनें । हें प्रमाण न मनें । श्रीशंकरासी ॥४॥
पुरुषु येकविध वचन । भूतप्रकृति भिन्न भिन्न । यास्तव जेणें भूताचें लक्षण । तें चि क्षर ॥५॥
दुजा अक्षरु कूटस्थु । जो मायांतर समस्तु । थीरु थावरु स्वस्तु । सर्वांतरु ॥६॥
याही आन पुरुषु असे । तो सदेशु सर्वत्रीं वसे । याचें गुणकीर्त्तन कैसें । कोण जाणें ॥७॥
ज्याचेंनि सतामात्रें । चळती ये सर्वत्रें । तें पुरुषु अन्यत्रें । पुरुषनामेम ॥८॥
असतां प्रपंच सन्मधें । जयासी प्रपंच न बाधे । वेधति ना प्रकृतिचेनि वेधें । ते चि पुरुष ॥९॥
जो पुरुष तो चि देवो । असा मानवा दृढावो । आतां सांगीजैल भावो । कर्मत्रयांचा ॥११०॥
॥इति पुरुषत्रये ॥ऽऽ॥
====
जो सच्चिदानंदु परमेश्वरु । तेथ नसे कर्माचा संचारु । तरि जेथ उठे विकारु । तेथवरि कर्म ॥११॥
हो हो आं हे चि सहि । निर्गुणि कर्मलेशु नाहि । एर कर्में वाचुन काहिं । चेष्टो नेणें ॥१२॥
आणि जेथुनि विस्तारले जग । येव्हडी वस्तु जे चांग। ते हि कर्माचें अंग । ऊँळखावे ॥१३॥
तरी गा कर्म सर्वाचें मूळ । कर्मापासुनि सकळ । कर्मावांचुनि केवळ । अंकुरें कैसें ॥१४॥
ब्रह्मीं कर्म अकुरें । कर्म ब्रह्मिं थावरे । ब्रह्म कर्म ये उत्तरें । साचें होती ॥१५॥
आणिक प्राणि जे कर्म आचरे । ते वासनेचां प्रमाणि भरे । ते चि क्रियमाण थावरें । संचित होउनि ॥१६॥
या संचिताचा रासिवटा । प्रारब्ध लावें सुनिष्टा । येणें जीउ चाले वाटा । संसाराचे ॥१७॥
क्रियमणाची परवडी । इह जन्मी घे गोडी । ते ठेवीतसे जोडी । पुनर्जन्मी ॥१८॥
क्रियमाणें संचित । संचितें प्रारब्ध उगवत । प्रारब्धें अंकुरत । क्रियामाण ॥१९॥
किति येकाचें मत । जे शरीर तें संचित । येक शरीरी नेमित । प्रारब्ध कर्म ॥२०॥
तरि गा शरीर जें आचरॆं । तें क्रियामाण निर्धारे । या चि राशितें चातुरे । काये ह्मणिजे ॥२१॥
तरि तें चि संचित शुध । कर्म उगवे प्रारब्ध । पूर्वा पासुनि लब्ध । तें आंगी बैसे ॥२२॥
हे कर्म माळिका असी । ऊँळखावी अप्रयासी । ज्ञान दीपकें प्रकाशी । हें चि असे ॥२३॥
मागील पावो पुढां रीगे । पुढील होये मागें । असें चालने संसारमार्गे । कर्मपंथी जीवां ॥२४॥
कोल्हाटि कंदुक चाळित । एकु एकावरी चाळत । तेवी कर्म ये लोटीत । येकासी येक ॥२५॥
कां गोचाळयाचें परी । कर्मदेह भरोवरी । कर्ममार्गाची कुसरी । असी असे ॥२६॥
जे जें कीजे तें तें कर्म । थावरें तें नोहे अकर्म । कर्मत्रयाचॆं वर्म । असें असे ॥२७॥
भविं गुंतावया प्राण । नसे दुसरें बंधन । मोक्षासी कारण । हें चि होये ॥२८॥
उर्धगतीसी कारण । सफल नोहे आन । भोगावया पतन । हें चि बीज ॥२९॥
जन्ममरणाचे धारसा । यासी चि टीळा सारीजे असा । अजन्म पद प्रकाशा । हे चि दिवि ॥३०॥
असें हे नेणतां येक । होति कर्मवंचक । ते ज्ञाति कर्मि सकलिक । शोभा नेदिति ॥३१॥
जीउ जीवात्मा देह इंद्रियें । इत्यादि सर्व कर्म होये । या वेगळें कोणें काये । तजीलें नकले ॥३२॥
ज्यासी सत्कर्मांचे अधिकार । ते स्वभावें सुंदर । येर प्राणि उखर । रुपहिन ॥३३॥
कर्मावांचुनि पांहि । धात्रुसीही रुप नाहीं । सत्कर्म ते सर्वाहीं । श्रेष्ट असे ॥३४॥
पदरिं बांधला मुलामा । तो कार्यार्थीं न पवे महिमां । ठेविल्यांहि रत्नधर्मा । साचारा नये ॥३५॥
तैसें अनभ्यस्त आचरे । तें चि बाह्यकर्म निर्धारें । कर्म तें साचोकारें । जाणिजें असें ॥३६॥
मोटे वृशभ धरिले । असें जे चुकले । ते नि:कर्म बोलिले । कोण्हिं पुरुशिं ॥३७॥
कुरुक्षेत्रिं द्रव्य ठेविलें । तैसें सत्कर्म जालें । तें चि सुहृदजना वाटीलें । नि:कर्म तें ॥३८॥
सत्पात्रिं दीजे दान । यापरी कर्म प्रमाण । विकर्माचें लक्षण । या वेगळें तें ॥३९॥
जैसें सुवर्णशुध नानें । तें नव्हें अधिक ना उणें । भागजनीत जाणनें । सत्कर्म तें ॥४०॥
कल्पतरु चितामणि । पुरवीति ते आईणि । विकर्म तें सुजाणि । जाणिजें असें ॥४१॥
सुषुप्ती स्मरु नसे । परि संतोसु निर्धारें असे । नि:कर्म ते हें असें । वोळखावे ॥४२॥
पावकी पोतासाचें ईधन । पाहता न दिसे आन । येवढी दशा घॆउन । सत्कर्म बैसे ॥४३॥
असो हे संचित ज्ञाने जलें । क्रियमाण श्रधागले । पाठिं जाळिली पटकुळे । प्रारब्ध तैसी ॥४४॥
किं बीजें जाळिली अग्रिमुखीं । दीसती आकृति सारिखि । परी भुरोपनि कृखि । नेदिति हातु ॥४५॥
कां दाहिला दोरु । वळु दिसे साचारु । तो बंधनकार्या निर्धारु । धरील कैसा ॥४६॥
जैसी कां दग्धांबरे । दीसति घडीयेचें आकारें । परि परिधाने साचारें । नोहति त्यांचि ॥४७॥
कां मारिलें सोनें । जर्हिं दिसैल आपुलेनि वानें । परी पीटोनि भूषणें । नोहति त्यांचि ॥४८॥
नि:काम बुधि कर्म तैसें । तें ब्रह्मरुप ब्रह्मिं बैसें । पुनरपी परतेना असें । नेमलें आहे ॥४९॥
गंगा मिळलि सागरिं । जळ पडलें गाभारिं । या परी रति न धरि । ब्रह्मीचें कर्म ॥५०॥
असो हें हिं न संभवे । तरि प्राणिये येक करावें । देह प्रयानि धरावें ईश्व्रातें ॥५१॥
हें सोपारें धर्म । याचें तुज सांगों वर्म । देहांति इछिलें कर्म । फळ देतसे ॥५२॥
संचिताचा भोगु पुरे । प्रारब्ध कर्म समूळ सरे । तेव्हां जीव निर्धारे । सांडिती देह ॥५३॥
तै क्रीयमाण समस्त । होउनि राहे संचित । ते ईछिलें पुरवीत । प्राणियासी ॥५४॥
कां जें आपण श्रध्देसी केलें । ते आज्ञाधारक आपुलें । ते पुरवैल इछीलें । देहांत समई ॥५५॥
देहस्त इछिलें न पाविजे । कां जें पुढां आणिक निफजे । देहाचा अंति पाविजे । भर्वसेनि ॥५६।
जें मन वासनेसीं उरें । तें भोगावें निर्धारें । हें प्राण प्रयाणा वाचुनि दुसरें । फळासीं नये ॥५७॥
जयां नसे ब्रह्मज्ञान । त्यांसी हें शोभे निरोपन । जें जन्म आणि मरण । घेउनि बैसले ॥५८॥
आतां जे परीनामले । जे आपण चि तद्रूप जाले । तें कर्मा अकर्माचे वोले । विरुढती काई ॥५९॥
तेहीं जें देखीलें मत । तें हीं सांगो साक्षांत । जे मिळे शुकित श्रोणित । ते संचित बोलती ॥६०॥
तेथुनी जे आकारले । हस्तपादादि अवयवा आलें । जें विकारिं वर्ते तेतुले । प्रारब्ध कर्म ॥६१॥
हें हें क्रियेसी सरे । तें क्रियमाण निर्धारे । अजन्म पद चि उत्तरे । असी बोलती ॥६२॥
जें तत्वरुपीं लीन । ते जन्म नेदखति आन । तयाचें दशेचें वचन । असें चि असे ॥६३॥
असो जे सचिदानंद भेदें । तुं मानिसी तिन्हि पदें । परी ये जानावीं सुविदें । येकें चि तिन्हि ॥६४॥
तुज न कळे तरि येक करुनी । पदें दाखऊं तिनि । सचिदानंद मिळणी । असी असे ॥६५॥
बाल तरुण जरा । जन नेमि भास्करा । परि तो सूर्यो स्वशरीरा । पालटो नेणें ॥६६॥
जैसा मातृकात्र इ ऊँकारु । रेखा त्रइ नकारु । तैसा आत्मा साचारु । पदत्रई ॥६७॥
उदकीं तरंग आवर्त्त कल्लोळ । अनिल उत्पन्न प्रभाज्वाळ । तैसें पदत्रईं नीर्मळ । परब्रह्म ॥६८॥
स्वादु श्वेतु गंधु कापुरा । सुत बिंबे रंध्रे अंबरा । तेवी आत्मया संचारा । पद त्रईचा ॥६९॥
हेमिं वर्ण रुप भूषण । चोहटें बींदी घरेंसी पाटन । तैसें आत्मस्वरुप प्रमाण । पदत्रई ॥७०॥
किं सूत ताना पाजनी । तिघां येक चि मांडनि । सच्चिदानंद मिळनि । तैसी असे ॥७१॥
कळा शीत माधूर्य । हें चंद्रबिंबाचें कार्य । असे देखति चातूर्य । पदत्रय ॥७२॥
पदांतिचा अनुवादु । तर्हिं आत्मा चि अभेदु । बाहालि रवाली स्वादु । तुपा जैसा ॥७३॥
तैसा आत्मा पदत्रई । या चि परी सर्वांचा ठाई । पाहातां हे विश्व काई । वेगळें असे ॥७४॥
यास्तव समष्टि । जेहि देखिली वृष्टी । ते भेदाची संकष्टी । न पडति कहीं ॥७५॥
सचिदानंदभेदु नसे । सिध्दांति देखीलें असें । परी हा प्रपंचु प्रत्यक्ष दीसे । भेदाकारें ॥७६॥
सर्वेश्वराचि महिमा । प्रपंचु न पवे सीम । तेथ जीव आत्मधर्मा । केवि येती ॥७७॥
तरि गा मध्यखंडि कथनि । जीवु दाखविला नयनी । तो कां ये वस्तु वाचुनि । वेगला जाला ॥७८॥
उत्पत्ति स्छिति विनाशे । प्रपंचाहि भेदु नसे । हें हि निर्धारें असें । मागां कळले ॥७९॥
असें सर्वहि प्रकारें । नाहि ब्रह्म दुसरे । नाना मतांचि वोडबरें । सरलि येथें ॥८०॥
ये शव्दिकें प्रमाणें असी । परि जेव्हां प्रत्यक्ष देखसी । तेव्हां प्रपंच जीव ब्रह्मेंसी । नेमु होईल ॥८१॥
तें पुढां अकरावा कथनी । प्रत्यक्ष दविजैल नयनी । तेव्हां भेदासी भाजनी । सहज होय ॥८२॥
आतां नेमु येथुनि । निर्धारु बोले वेदवानि । ते या पुढीला कथनी । प्रगट करुं ॥८३॥
ते या पुढें संविदें । बोलों ब्रह्मप्रतिपादक पदें । जेणें धालि उपनिषदें । ते लक्षणें ॥८४॥
माझे अशक्तवाणि । काये होईल श्रुतिचि उधानि । काय सूर्य तेजाचि खानि । आंगे उपसे ॥८५॥
परि ग्रंथ शोभे कारणें । साक्षि अनुश्रुतिवचनें । संसारमल क्षालनें । होईल तेणें ॥८६॥
तें यजुर्वेदिचें चतुर्द्दशमकांड । साक्ष येईल अतिगोड । तेथ वाचेचे पुरैल कोड । त्रिंबकु ह्मणें ॥८७॥
इतिश्री चिदादित्ये प्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडे सचिदानंदनिरुपण नाम अष्टमकथन मिति ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP