उत्तर खंड - ब्रह्मचतुष्टय
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
देवाश्चमुनय: सिध्दा नागा विद्याधराअपि ॥
ज्ञातंच करणं शुध्दं ब्रह्मचातुष्कमुत्तमं ॥१॥
असें परीचें कथन । तुज केलें निरुपण । पाहे पां यदर्थी भीन्न । ब्रह्म नव्हे ॥१॥
तर्हि ब्रह्म चतुर्विध । असें देखती प्रबुध । तें परीस एवंविध । सांधीजैल ॥२॥
पूर्वखंडी दुसरें कथन । तेथें केलें निरुपण । तें कलों आलें पण । सविस्तर आतां ॥३॥
तें एक एक मत । एक एकां प्रमाणभूत । भागा आलें सदंत । एकां एक ॥४॥
पूर्ण ब्रह्म साक्षांत । जे ईश्वरी सर्व भूत । हें ज्ञान सदंत । येक घेती ॥५॥
एकां ऊँ कार प्रमाण । घॆति मात्रुका विवरण । एकां साकारिं भजन । भावयुक्त ॥६॥
एक शरीर ज्ञानी । बैसलें यातें चि घेउनि । याच्या ऊँळखी करुनि । दे ऊ आतां ॥७॥
आपादतळमस्तक । सर्व शरीर सुचक । तिर्थे क्षेत्रें वृंदारक । देहिं घेति ॥८॥
दीपें खंडें भुवने । सरीता सींधु उध्यानें । स्वर्गे पाताळें प्रमाणें । देही घेती ॥९॥
पींड ब्रह्मांड माया भुतें । देही देखती नाना मतें । आन कांहि यापरुतें । न मनिति ते ॥१०॥
॥इति देहज्ञान ॥ऽऽ॥
====
स्वरुप ज्ञानि असे नर । जे घेती देव देवाचे अवतार । लिळा चरित्रें निरंतर । प्रिये तया ॥११॥
श्रोतें स्मार्त नित्य नैमिते । कर्मे करीति आर्तवंते । तीथें क्षेत्रें तपें व्रतें । प्रेमें करीती ॥१२॥
वेदशास्त्र पुराणें । मानिती पूर्वप्रणितें वचनें । प्रतिपूजा भक्ति ध्यानें । सुखी होती ॥१३॥
प्रत्यक्षाकारा वाचुन । दुजें नाहि प्रयोजन । जेणें जीवा उधरण । तें हें चि मानिति ॥१४॥
॥इति स्वरुप ज्ञान ॥ऽऽ॥
====
आतां ऊ काराचें ज्ञान । घॆति मात्रुका प्रमाण । प्रणवपादिं उत्पन्न । सर्व देखती ॥१५॥
जें पिंडाब्रह्मांडाचें मूळ । जेथुनि श्रृति सुस्मृति सकळ । ते क्षराक्षर केवळ । ऊँ कार ब्रह्म ॥१६॥
सर्व अर्थ याचां पोटी । या पासाव शब्दश्रृष्टी । तया प्रीये हे चि गोष्टी । प्रणवाची ॥१७॥
॥इतिशब्दज्ञान ॥ऽऽ॥
====
साक्षात् ज्ञानप्रकाशु । उभयपदिं विलासु । सचिदानंदु जगदीशु । अक्षरु अव्यक्तु ॥१८॥
ब्रह्मांड पीपलिका अंती । देखती अभेद मूर्ति । सर्व अर्थ प्रवृत्ति । नेमिति तेथें ॥१९॥
वृष्टी हो कां भल तीउती । परी सिंधुमार्गें त्याची गती । तेवी ब्रह्मी चि देखती । भूतकर्में ॥२०॥
वापी कूप तटाका । भेदु नसे उदका । कांकण कला विमुद्रिका । हेमाकृति ॥२१॥
ज्योति ज्वाळ प्रभा । मुख्य पावकाचि शोभा । तैसा परमार्थु वल्लभा । ब्रह्म निष्टा ॥२२॥
॥इति साक्षात् ज्ञान ॥ऽऽ॥
====
देह ज्ञानाहोनि सार । स्वरुपब्रह्म सुंदर । कां जें आधारें चराचर । जीव श्रृष्टी ॥२३॥
तत्वश्रृष्टी परीस । शब्द ब्रह्म सुरस । कां जें हा ऊँ कारु चि सर्वस । विस्तारला ॥२४॥
ऊँकारपरीस साक्षात्कारु । तो अतिमानें सुंदरु । कां जें परमार्थु साचारु । सर्वत्रासीं ॥२५॥
ईतिचतुष्ट निर्धारु ॥ऽऽ॥
====
देहज्ञानविचारु असा । करुणि देहाचा आरिसा । मध्यें पाहे प्रकाशा । आलें विश्व ॥२६॥
देहिची साधी साधनें । एकां ये चि प्रमाणें । येक एथीचें थानमानें । संतोशती ॥२७॥
काष्टि भाति भूजंगी लोळि । इत्यादि कर्में एक बळि । एक कंठी पोटी मुळि । देति बंध ॥२८॥
वैश्य करुणि मारुतगति । मनें खटु चक्रें भेदिति । जीव्हाग्रे सेवीति । चंद्रु येक ॥२९॥
चक्रमाळिका ज्ञान । हें एक मानिति प्रमाण । दशदेहेंविवरण । एका गोल ॥३०॥
एका इंद्रियें व्यापारु । देहें विषयें विकारु । पंचभूतात्म निर्धारु । निर्धारें एकां ॥३१॥
एका अजपा जपुप्राण प्रमाण । एका बाह्यभ्यंतर विवरण । उत्पति स्छिति संहारण । मानी एकां ॥३२॥
आत्मा परमात्मा अविद्यादिक । हे देहि देखती येक । आपादस्तळमस्तक । श्रुचना एकां ॥३३॥
हे तो मागा समूळ । आह्मिं बोलिलों प्रांजळ । तें मध्यखंड सकळ । कळलें तुज ॥३४॥
इति शरीरब्रह्म ॥ऽऽ॥
====
स्वरुप ज्ञान तें असें । देहापुज्यें देहे दिसे । देह उधरे देहावशें । स्वरुप तें गा ॥३५॥
येक जीव खानि योनि घेति । एक देवी देवतें ध्याति । भक्ति धर्म तपवृत्ति । भावो एकां ॥३६॥
एकां कर्म धर्म यज्ञ दान । एका तीर्थि तीर्थराजीं भजन । देवत्रयादिकांचे पूजन । मानें येकीं ॥३७॥
ब्रह्मांड विराट हिरण्येंगर्भु । एक ध्याति आदिप्रभु । एक घेती लाभु । याच्या विकाराचा ॥३८॥
माया शीवात्मक शीव्र शरीर । येक हे शुचिति निरंतर । या सर्वा मिळोनि साकार । ब्रह्म होये ॥३९॥
इति स्वरुपब्रह्म ॥ऽऽ॥
====
आतां शब्द ज्ञान नावें । एकीं तंत्र मंत्र उपदेश घ्यावे । कथा गोष्टीचें हावे । भरावें एकीं ॥४०॥
गीत वाद्य रग रसु । येकां येथे चि उल्हासु । वेद शास्त्र पुराणिं विश्वासु । एकां पुरुषा ॥४१॥
येक मूळ घेति बावनाक्षरें । एक सार्ध त्रिमात्रा विकारें । एक मुख्य ऊँक कारें । त्रुप्त होती ॥४२॥
हें आदिखंडि उत्तम । कथन चालिलें अष्टम । तें यथाज्ञानें नेम । विज्ञानेंसी केलें ॥४३॥
॥इति शब्दब्रह्म ॥ऽऽ॥
====
आतां ब्रह्मसाक्षात्कारु । तो हीं सांगो साचारु । पूर्णज्ञान निर्धारु । जेणें होये ॥४४॥
एका प्रकृतिचें ज्ञान । एका मानें त्रिगुण । अहंता शक्ति विवरण । मानें एकां ॥४५॥
पूर्णपणें शिष्यराया । एका मानें मुख्यमाया । एकाचें ज्ञान सावया । सर्वेश्वरी ॥४६॥
एक पूर्णतेचेंनि भरें । परमात्मा देखति बा रे । एकाचें ज्ञान निर्धारे । पदत्रयीं ॥४७॥
एक तत्वार्थी वर्त्तत । एक क्षराक्षरीं सदंत । एक देखति साक्षांत । आदि ब्रह्म ॥४८॥
चतुर्विध शिष्याराया । पूर्णज्ञान होये जया । तो सर्वज्ञु सावया । बहुता मध्यें ॥४९॥
यांतिल एकाधें ज्ञान । जयासी होय प्रमाण । बहुतामध्यें जाण । तो हि भला ॥५०॥
॥इति साक्षात् ब्रह्म ॥ऽऽ॥
====
उत्तमे मध्यम कनिष्ट । चौथे तें याहि निष्ट । ते विचारसंयुक्त दृष्ट । करुं तुज ॥५१॥
जीवजीवात्मा परमात्मा । अविद्या कर्म उत्पत्ति स्छिति प्रळय धर्म । हें ज्ञान अति उत्तम । शरीरब्रह्मिं ॥५२॥
अजपा अक्षरें प्राण प्रमाण । गुणकार्यकारण । चहुं देहाचें ज्ञान । हा मध्यम पक्षु ॥५३॥
चक्रें देहें थानें मानें । हें कनिष्ट वोळखणें । भुजंगि कर्मादि साधनें । कनिष्टाकनिष्ट ॥५४॥
॥शरीरन्यायें ॥
====
ब्रह्मा विष्णु महेशु । ईश्वरु शिवु सर्वेशु । या षटु तत्विं प्रकाशु । तो उत्तम पक्षु ॥५५॥
हिरण्येंगर्भें विराट । देखे सविस्तर प्रगट । निवडे शरीर घटाघट । मध्यमु तो हा ॥५६॥
प्रतिमा देवि देवतें । पितर ग्रहें मूर्त्तवंतें । मन गोउनि सेवी यातें । कनिष्ट ते चि ॥५७॥
भूत प्रेत झोटिंग । याचि सेवा अनेग । हें कनिष्टाकनिष्ट चांग । ह्मणों नये ॥५८॥
॥इति स्वरुपन्यायें ॥
====
आतां ऊँ कारि उत्तम । नादबिंदु अक्षर नेम । विश्वरुप आत्मधर्म । शुध्दवट ते हे ॥५९॥
चहुमात्राचें विवरण । होये यथाविध ज्ञान । श्रुति कार्यकारण । मध्यम ते हें ॥६०॥
अक्षरीं गणकिं आद्याशुं । पुराण श्रृति विश्वासु । मंत्र तंत्र सर्वेशु । कनिष्ट पक्षु ॥६१॥
कथा गोष्टी विप्रीत । घेनें आदरें स्वचित । हें जाणावें निभ्रांत । कनिष्टकनिष्ट ॥६२॥
॥इति शब्दें न्यायें ॥
====
ब्रह्म अविनाश सचिदानंद । अक्षर अखंड पूर्ण अभेद । होये तद्रत मानस हे शुध । उत्तम होये ॥६३॥
महतत्व माया प्रकृति । अहंताक्षर आदि व्यक्ति । येथें प्रेरिजे युक्ति । मध्यम ते हें ॥६४॥
तम तेजी नीगे मन । कां अहंकारिं भरे ज्ञान । सुन्याचें प्रतिपादन । कनिष्ट ते हें ॥६५॥
या वेगळा मिथ्याभासु । याचा मानिजे विश्वासु । तो जाणावा सर्वसु । कनिष्टाकनिष्टु ॥६६॥
॥इति साक्षांत न्याये ॥
====
उत्तम पक्षु अलोलिकु । जो वस्तुचा ठाइं सम्यकु । मध्यमहि भव नाशकु । संशय रहितु ॥६७॥
कनिष्टीं मन विश्वासु । कनिष्टाकीनष्टीं भववासु । यातु मानैल सुरसु । तो वेचुनि घेणें ॥६८॥
हा चतुर्विध ब्रह्मानुवादु । नंदि भ्रृंगीचा संवादु । उपदेशी विश्वकंदु । तया दोघा ॥६९॥
एवं तेवं विचारा । जे येईल शिष्येवरा । तें चि ब्रह्म निर्धारा । सुगम हो ॥७०॥
आमचा हा चि निर्धारु । बोलों जो होये साक्षातकारु । वेदशास्त्र विचारु । साक्षि आनावा ॥७१॥
॥इति निर्धारु ॥
====
यावरी बोले सीक्षु । मि होये सर्वसाक्षु । तो पातें वेद पक्षु । प्रगट करावा ॥७२॥
जी हा कोठोनि वेद उचारु । वेदासी कोण आधारु । वेदकर्त्ता थोरु । कोण पुरुषु ॥७३॥
वेदीं काय कारण । वेदु थापिते कवण । आणि वेदिं निरसन । काये जालें ॥७४॥
वेदाचि धाव कोठें । वेदु कोणें ठांई खुटें । आणि वेदांकित भुकवटे । कोठवरी ॥७५॥
तव गुरु ह्मणे गा आत्मजा । तुवा प्रश्न केला वोजा । तो संदेहना निरसनार्थ काजा । सांगो आतां ॥७६॥
ज्या देवाचे च्यारी चरण । तिं चरणापासुन । प्रलय स्थिति उत्पन्न । तेथुनि सर्वा ॥७७॥
असें याचे च्यारि पाद । तेथुनि रुपा आले च्यार्हि वेद । यासी आधारु व्दंद । बोलावया ॥७८॥
बृहस्पतिपासुनि । वेद प्रगटले विभुवनि । यास्तव पूज्य सर्व स्थानि । गुरु तो सर्वा ॥७९॥
परमेश्वराचा निश्वासु । ते वेद हा विश्वासु । भुवनत्रईं वासु । वेद पुरुषाचा ॥८०॥
वेद धर्त्ता प्रजापती । त्याचां चहुंमुखीं वस्ती । वेदा निजदेवो गभस्ती । वोळखावा ॥८१॥
नाना अवतार घेउनु । वेद थापी नारायणु । चहुं वेदासी प्रमाणु । वेदु होये ॥८२॥
वेदु अनाचारातें निरसीतु । पारकातें उत्थापीतु । चाले सलु मोडीतु । अकर्माचा ॥८३॥
वेदु कर्मातें चालि । सत्कर्मांचा दीपु उजलि । हव्यकव्यादिकें पालि । निरंतर ॥८४॥
जो सर्वाचे अंतस्थान । तो ईश्वरु वेदासी कारण । परीणामदशे प्रमाण । याचें चि केलें ॥८५॥
देखुनि चैतन्य पूर्ण । निवालें वेदाचें मन । या परतें तें वचन । मौन्य पडे ॥८६॥
निर्गुण तें अमर्याद । तेथें खुटले अनुवाद । ह्मणौनि चैतन्यब्रह्मी वेद । लीन जाले ॥८७॥
वेदु सर्वांसी उत्तम । परी जे आचार वर्ण धर्म । तयासी निर्धारें सीम । वेदाआज्ञेची ॥८८॥
॥ इति वेद विचारणा ॥
====
ये श्रृष्टी च्यारी पंथ । ते सांगो यथास्छित । आदि शंकराचें मत । आहे जे ते ॥८९॥
वर्णपंथु भेदपंथु । अभेदपंथु निर्वाणपंथु । या चौपंथाचा अर्थु । सांगो आतां ॥९०॥
कर्मपंथु वर्णाचारु । जांबुव्दीपी साचारु । यासी प्रमाण विचारु । असा असे ॥९१॥
कास्मिरापासुन कावरु । मह्द्य पाहाटु हीमांधरु । तेथुनु गंगा सागरु । जगंनाथु ॥९२॥
त्यापासुनु श्वेतबंधु । तेथुनु हरिग्रामु प्रसिधु । व्दारकेपासुनु सींधु । संगम वरी ॥९३॥
सिंधुसंगमापासुन । पुन: कास्मिभुवन । हे कर्मभूमि कारण । शृष्टिमध्यें ॥९४॥
योजनें सार्ध सोळाशतें । याचें प्रमाण निरुतें । साडेंपांचसें गावें तेथें । मध्यरेखा ॥९५॥
यामध्यें चौ वर्णाचें आचरण । हा वर्णपंथु कर्मभुवन । वेदशास्त्र पुराण । या चि मध्यें ॥९६॥
आणि कृष्णमृग जेथवरी । कर्मभूमि तेथवरी । हे मर्यादा कर्माचारि । नेमली असे ॥९७॥
पश्चिमाब्धि वायव्यदेशी । वेदकर्म निंद्ययासीं । हा भेदु पंथु भेदासी । आधार भक्ती ॥९८॥
ये पंथी सर्वा येकांकारु । ध्याति येकु चि ईश्वरु । असा वर्णरहितु साचारु । भेदपंथु हा ॥९९॥
तेथ भक्त नेमले सहस्रवरी । पण राहाणे भेदा चि माझारी । व्देषाव्देषु यांचा घरि । विशेषें असें ॥१००॥
आतां अभेदपंथी । यकविधकर्म येक चि भक्ति । त्या सकळांचे मति । भेदु नाहिं ॥१॥
ते येकविध सर्व । येक धर्मु येक भाव । आचारा अनाचाराचें नाव । ते जाणति चि ना ॥२॥
जेथें कोन्हें हि प्रकारे नसे ज्ञान । ज्यासी पशुचा तरी आचरण । तो निर्वाण पंथु अप्रमाण । सृष्टी मध्यें ॥३॥
वर्णाचारापरीस । यवनाचार बहुवस । या हि अधीक निरस । तो अनाचारु ॥४॥
अनाचारहोन । पश्वाचारु गहन । या चौ पंथा आन । समर्थु पंथु असे ॥५॥
सर्वामध्यें सत्यर्थु । तो चि पंथु समर्थु । पुससी तरी इत्यर्थु । सांगो त्याचा ॥६॥
हिमाद्रिपासुनि मेरु । हा देवपंथु साचारु । उत्तम मेरुपाठारु । हा चि असे ॥७॥
हा पंथु सर्वां आगला । परि न्ब कळे याचि लीळा । मिं बोलिलों हा जीवाळा । वेदां शास्त्रांचा ॥८॥
येर जीव गहन । बोलावया काये कारण । वेदपंथु अप्रत्यक्षमाण । नरपंथु रोकडा ॥९॥
ये परीचा पंथु वादु । गौरीहराचा संवादु । ग्रंथी जाला अनुवादु । त्रिंबकु ह्मणे ॥११०॥
इतिश्री चिदादित्ये प्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिधेशोपदेश पूर्णानंदे अवसानखंडे ब्रह्मचतुष्टय नाम षष्टम कथन मिति ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP