उत्तर खंड - विवर्त्तबोध
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
विवर्त्तो ब्रह्मणो माया । मित्यवें सकळं जगत् ।
मतमेव स्वरुपाणि । मर्थानामनु भूतित ॥१॥
असी हे सर्व रचना । आलि तुझया अंत:करणा । हें रचावया आनां । अधिकारु नाहिं ॥१॥
हें जैंहोनि जैसें रचलें । तैं होनि तैसें संचलें । पाहे निर्धारें उठलें । एके ची वेळें ॥२॥
जेथ भूमि पडली उचाळ । तें चि जालें कुळाचळ । हे उदकाचे खेळ । स्वभावता ॥३॥
भूवानळाचे संपकें । जे जे मृत्तिका आलखे । ते ते जाणावी खडके । सैल शीळा ॥४॥
जें जें पडलें लवण । दिर्घोदकां सांटवण । ते समुद्र प्रमाण । तें चि दीसीचे ॥५॥
सागरा जावया जळ । मार्गु सरिता सकळ । नसतां पर्वताचे ढाल । कोठे जीरे ते ॥६॥
माया महत्तत्व प्रमाण । हें देह महाकारण । अहंकारु त्रिपुटि कारण । दुजें देह ॥७॥
हरिहर ब्रह्मादिक सुर । हें देवाचे लिंग शरीर । दीपे सरिता सैल सागर । हें चि विराटदेह ॥८॥
या चौदेहाचा निर्धारु । तो हा देवो सर्वेश्वरु । जो विखुरला साकारु । येथवरां ॥९॥
हे माये अंगे रचना जालि । ते माया चि रुपा आलि । कि क्षरुनि वीखुरलि । मायादेवी ॥१०॥
हरिहरादिक सकळ । हें हि मायेचे खेळ । मुख्य ब्रह्म सबळ । तो चि माया ॥११॥
याही मध्यें येक । देखति कर्त्तव्य आत्यंतिक । येक ह्मणति स्वभाविक । रचलें दीसे ॥१२॥
ज्यासी उपाधी ये फळा । ते सारिती कर्त्तव्यासी टीळा । कां जे करणे हरणें हे लीळा । माहामायेची ॥१३॥
या ब्रह्मंडा असी ढीसाळें । भूत देहें सकळें । माया आपुले लिळे । करि हरि ॥१४॥
कुंभ करावया समर्थु । जैसा कां कुळाळाचा हातु । तैसा मायामनें उठतु । ब्रह्मंड गोळु हा ॥१५॥
कां अळंकाराचा विषुरा । करणें येका सोनारा । तेवी उत्पती स्छित संहारा । मूळ माया ॥१६॥
कां सुताचिं अंबरें । जवि विणावी विणकरें । तेवि कर्तव्या निर्धारें । माया श्रेष्ट ॥१७॥
कां मलयाचि लावणि । माळि जाणे खावणि । तेवि या भूताची मांडणि । माया जाणें ॥१८॥
कां काष्टसूत्राचि कळा । हे सूत्रधार्याचि लीळा । तेवी चाली सकळा । सर्वेश्वरी ते ॥१९॥
असी कर्तव्यासी माया । येकी आणिली न्याया । तो या मता छलावया । दुजा उठे ॥२०॥
माया ब्रह्म समरसें । विश्व उठे अपिसैं । ह्मणौनि ते लावितीपिसें । कर्त्तव्यासी ॥२१॥
सृष्टी रचावया कांहीं । मुख्य ब्रह्मीं हेतु नाहीं । येणे चि प्रकारें ते ही । मानावि माया ॥२२॥
मायाब्रह्मां पासुन । आह्मी होआवें उत्पन्न । प्रपंचाचे हि गुण । असें नव्हते ॥२३॥
सूर्यकातां सूर्यकीरणा । भेटतां जन्म हुताशना । यां तिमध्यें कोणा । ईछा होति ॥२४॥
वारि वारयाचें भेटीं । उठति तरंगाच्या कोटी । तेथ कर्तव्याचे पोटीं । कोण बैसले ॥२५॥
कि वसंत तरुचां मिळणि । पल्लव फुटति दाटणि । तेथ कोणाचि हात धरणी । रुपा आली ॥२६॥
किं सींप स्वातिचे वृष्टी । होये मोतीयाचि खोटी । तेथ कर्त्तव्याचि गोष्टी । कोणा नेमें ॥२७॥
पाहे पतिपत्नीपासुन । बाळहोये उत्पन्न । तेथ कोणाचे प्रयत्न । सिधि पावले ॥२८॥
तरी माया प्रपंचु सर्वोत्तमु । हा जाणावा स्वभाव नेमु । कां जे मायेचा भावो कृतधर्मु । कोण्हा नेमें ॥२९॥
मायेंसी सामर्थ्य असतें । तरी कर्तव्यासी रुप होतें । तिचे असामर्थ्य निरुतें । देखिले तेहिं ॥३०॥
जर्हिं सामर्थ्येवीण । माया असती आन । तर्हिं होतें लक्षण । कर्तव्यासी ॥३१॥
हा हो माया आहे ह्मणु । संयोगें सृष्टि मानु । तैं कवलें झाकला लोचनु । आमचा चि तो ॥३२॥
हें विश्वब्रह्म एव्हडें । जे नेदखति बापुडें । तेहि मायेचे पवाडॆ । पढावें सुखें ॥३३॥
महा मायेचें पटळें । जयाचे चक्षुत्व झाकोळे । ते ब्रह्मानंदाचे सोहळे । जाणती कैसें ॥३४॥
जो नाहि ते माया ते साच मानि । तो तो बांधलाचि प्राणि । जैसा ऊँ चके शयनि । भद्रजाति ॥३५॥
जैसा षट्पदु पद्में बांधला । कुरंगु घांटाळीसी आला । दीपु खाजें जाला । पतंगासी ॥३६॥
कणसाळिये बैसे सुका । नादु आला पंन्नका । तैसी माया या लोका । साच मानें ॥३७॥
उठलेंहि इंद्रधनु । सहाते रस्मरज्जुचा गुणु । तरि चि कां साच मानु । येति माया ॥३८॥
मुख्य मायेंचि प्रमाणें । कीति आणु असत्य वाणें । आणिलें तरि कोणें । येशें येती ॥३९॥
मोडावें सशेंसीगें । फोडाविं व्योमलिंगें । गंगे न्यावी अंगे । छायापुरुषाचि ॥४०॥
फेडावें वंध्यजाचें पीसें । तोडावें इंद्रजाळाचें फासे । मलुनि नागवेलि कणिसे । कण घ्यावे ॥४१॥
माया नसे निर्धारें । हें विवर्त्तले मायाकारें । असी निर्वाणि उत्तरें । वेदिं शास्त्रिं ॥४२॥
निर्धारा नाणितां दोरु । सर्पु विवर्ते साचारु । मायादेवीचा निर्धारु । ब्रह्मीं तैंसा ॥४३॥
पाहातां ब्रह्म सकळ । बिवर्तु माया मृगजळ । यास्तव बिवर्त्ताचे फल । नभदृमिं ॥४४॥
असी कां सुक्ती साद्यंत । मिथ्या भासे रजत । या परि मायाभूत । परमेश्वरी ॥४५॥
जैसा नटाच्या वेशु । वरिल दिसे भासु । तेवि आछादिला पुरुषु । माया देवी ॥४६॥
मायेचें दृशपणें । फुंजे ब्रह्मज्ञानें । तो साचा चि लेईला लेणें । वोडंबरीचे ॥४७॥
कां ज्ञानाचें आटोपें । जो मायेसी वासीपे । तो प्राणि रत्नदीपें । पोळला पलें ॥४८॥
कां परब्रह्मांचा पळवी । मायेचा ठाईं दीठी ठेवी । तेणें नभाची चवी । चाखिली दिसे ॥४९॥
कां निरसुनि माया मृगजळ । घेईजे ब्रह्म समूळ । तैं दीप पुष्पाचें अरल । फेडीलें तेणें ॥५०॥
माया मारावी ज्ञानघातें । घ्यावें ब्रह्म चि आईतें । तैं तो बागुलु मारुनि जैतें । सुखी जाला ॥५१॥
हें ब्रह्म चि माया नाहिं । असें जो मानिल देहिं । तेणे पुसीली लीहि । पाण्यावरील ॥५२॥
सर्वे परी माया नसें । ब्रह्म विस्तारलें कैसें । परिणाम कीं असें । घेतलें स्थळ ॥५३॥
पाहातां विवर्त्त लक्षणि असें । माया अनादि साच च असे । येथ प्रमाण दीसे । कांहि येक ॥५४॥
सर्पु आहे साचारु । याचा जाला निर्धारु । तेणें विवर्त्तला दोरु । मानावा सर्पु ॥५५॥
सर्पभय ज्या नरा । तो वांसिपे दोरा । सर्पु ये नेणे त्यासी भेदरा । सर्पाचा काई ॥५६॥
तेवी माया असैल दुसरी । तो चि विवर्ते निर्धारी । हा पक्षु पूर्वाचारी । घेतला सीधिं ॥५७॥
परिपूर्ण विवर्त्तज्ञानी । तो या शब्दातें न मनी । जें कीणें दाटति मेदनी । ते मृगजळ विवर्त्ते ॥५८॥
बागुलु कोणें देखीला । तो बाळकां साचु जाला । तैसा विवर्त्त मानला । तेहीं पुरुशीं ॥५९॥
॥इति मायाविवर्त्त लक्षणं ॥ऽऽ॥
====
आतां परिनामकें मतें । ते हिं आणु दृष्टातें । एक ह्मणति परिनामातें । लंछन असे ॥६०॥
परीनामांचें नीर्धारी । माया प्रत्यक्ष दुसरी । येर्हविं ब्रह्म चि ब्रह्मावरी । परिनामें कैसें ॥६१॥
पयें अंबिल संगमे । परिनामले दधी नेमे । तवि माया मेळें ब्रह्में । प्रपंचु होणें ॥६२॥
ब्रह्म परिनामान । माया दीसे आन । या आक्षपीं वचन । सुचलें येक ॥६३॥
जें क्षीरे क्षीर परिनामलें । दधी क्षीराचें चि जालें । तैसें ब्रह्म विस्तारलें । येथवरी ॥६४॥
ना ना परीनामले यां प्रपंचा । तो ब्रह्म चि होये साचा । माया नाहिं आनाचा । पाडु काई ॥६५॥
आपुलें निजस्वादें परवडि । परिनामले फल दे गोडी । परीनामदशे एव्हडी । दशा नाही ॥६६॥
असें जें परिनामलें । तें ब्रह्मदशेंसी आलें । आणि ब्रह्म चि परिनामलें । गुणाकारें ॥६७॥
॥इति परिनामलक्षण ॥ऽऽ॥
====
परिणामु विवर्त्त वादु । यासी अखंड विरोधु । पण प्रवृध्दि संवादु । देखी असा ॥६८॥
जे वस्तु परिनामली । ते चि विवर्ताअंति देखिली । हें इश्वर रुपें विस्तारली । सर्व श्रृष्टी ॥६९॥
माया प्रपंचु भूतें । ये नामें अप्रमितें । हें अनंत दृष्टांतें । विचारुनि घेणें ॥७०॥
हें ब्रह्म नादि अनंत । जालें आकारवंत । यासी नामें शोभत । माया प्रपंचु असी ॥७१॥
थिजतां घृतांचि येका । नामें खोटि कणिका । तेवी माया प्रपंचु टीका । वस्तुचां ठाइं ॥७२॥
अथवा येक चि सोनें । नामें अलंकार लेनें । तेवी ब्रह्मांसी अभिधानें । माया प्रपंचु असी ॥७३॥
कां येका वृक्षा सकळें । पल्लव पत्रें पुष्पें फळें । तेवि नामें कीडाळे । येक ब्रह्मा ॥७४॥
कां येक चि असतां जळ। नामें कीडाळे । ते माया प्रपंचु सकळ । ब्रह्माभिधानें ॥७५॥
हा निर्धारु होये असा । ते चि जीवा ब्रह्मदसा । विश्व ब्रह्म प्रकाशा । आलेया वरी ॥७६॥
हें विश्व ब्रह्म चि देखिलें । तेथ बोलनें खुटलें । येथ दृष्टांत स्मरलें । ते उभे करु ॥७७॥
जंवरी मा ईश्वरु । तवरी बोलाचा ऊँ डंबरु । हें ब्रह्म चि नेमें तैं पुढारु । बोला कैचा ॥७८॥
जंवरी सुताचा उभारा । तंवरी विनने अंबरा । तेवि विश्व ब्रह्म या उत्तरा । वरि बोलूं नसें ॥७९॥
समुद्र आलेयां आंगा । आपुली गती सांडी गंगा । तेवी ब्रह्म जालेया जगा । बोल राहे ॥८०॥
जंवरी गुलाचा बांधा । तंवरी रसाचा रांधा । तेवी जगब्रह्म परश्रधा । नुठे बोल ॥८१॥
घृत्तलेयांनंतरें । काये दशा ध्यावि क्षिरें । तेवि जग ब्रह्मां पुढारें । बोलने नसे ॥८२॥
जालेयां पूर्ण भोजन । स्वादु देउ नेणें मिष्टान्न । तेवि ब्रह्मी जग जाणौन । बोलनें राहे ॥८३॥
जळ जालेया अंगे । काये होईजे तरंगे । तेवी ब्रह्म जालेया वरी जगे । काये होणें ॥८४॥
खोटि जालेया अलंकारा । पुढां कोण तो उभारा । तेवि जग ब्रह्म या उत्तरा । पुढां नोको ॥८५॥
पूर्णिमेंपर चोखाला । उदो न करी कोण्हिकला । तेवी जग ब्रह्म या आगला । बोलु नसे ॥८६॥
कां परीनामे दसेवरी फळे । स्वादिष्ट नेदिती आगले । तेवी जग ब्रह्मापर नाडले । बोलु कोन्हि ॥८७॥
कां जरा मृत्या परता । विकारु नुठे मागुता । तेवि विश्व ब्रह्म बोलतां । पुढां मौन्य ॥८८॥
कां वेलुवां पर कांहिं । उडाणिका खेळु नाहि । तेवि जगब्रह्मापर लिहि । पुसे बोलाचि ॥८९॥
कां गेलेयां शैलशिखरा । चढावो नाहि सामोरा । तेवी जग ब्रह्म या उत्तरा । पुढां नोको ॥९०॥
जंवरी ब्रह्मीचा अभावो । तंवरि बोलाचा ऊँडवो । जवरी ये देवी देवो । तो चि बोलणें ॥९१॥
जंवरी अविद्या माया वादु । तंवरी बोलाचा संवादु । जंवरी प्रपंचासी भेदु । तंवरी बोलु ॥९२॥
तरि माया नावा चि पुरती । दुसरी नाही निरुति । या प्रपंचाचि जाति । या परी ॥९३॥
ह्मणौनि मायाविर्जित । बोल होति साळंकृत । जे परब्रह्मी साक्षांत । डोल देति ॥९४॥
ब्रह्म विशई सखोलु । तो बोलतांहि नोहे बोलु । कां जे तो सर्वेश्वरी निटोलु । ब्रह्मरुपु ॥९५॥
॥इति विश्वब्रह्मबोध ॥ऽऽ॥
====
असीं प्रबुधें कथनें । तुज कीजतें निरुपणें । परि जेणे वस्तु सुखावणें । तें चि भलें ॥९६॥
तें सुख माहा थोर । सुगम शुध्द साचार । जेथें असति योगेश्वर । सदाकाळ ॥९७॥
ब्रह्मश्रीचें संनिधानें । ज्यां सदा काळु कर्मणें । ब्रह्मस्त ब्रह्मिं नांदनें । निरंतर ॥९८॥
तेणेंचि सुखें ते धालें । तद्रूपो तें चि ते जालें । जे न ढलति कांहि केलें । कालत्रई ॥९९॥
या सुखांचेंनि पाडें । आणिक नेदखों धडे । ते बोले येवढें । गीवसुनि घेणें ॥१००॥
हा शब्दु आपण । घालुनि बोधाचें ईधन । अहंकार प्रेताचें दहन । वोजाकरी ॥१॥
प्रपंच अंगें सर्वे जाली । क्रियाचा घटु विडालि । संसार अस्मीयां तिलांजुळी । देउनि राहे ॥२॥
त्या बोलाचें हातधरणें । चालती पुढील कथनें । त्रिंबकु ह्मणें त्या कारणें । चित देनें ॥३॥
इतिश्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडे विवरणे विवर्त्तबोध नाम पंचम कथन मिति ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP