उत्तर खंड - वासनानिरसननाम
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
य इंद वसनात्यागी स जीवन्मुक्त उच्यते ॥
निर्मूल कानात्यक्ता वासनाया: सतं गत: ॥१॥
गुरुशीष्या पूर्ण सीधी । इंद्रिये बुडाली आत्मबोधीं । आंगी बैसली समाधि । निर्विकल्प ॥१॥
तवं इंद्रियें चेईली कीरु । शिष्यें धरीला स्मरु । तर्हिं पूर्णता संचारु । आंगीं असे ॥२॥
शिष्यु आनंदें माजला । गुरुचें प्रेमें दाटला । चरणिं माथा ठेविला । स्तुती करीतु ॥३॥
मग बोलों प्रांभिलें । जी म्यां स्वरुप देखिलें । सर्व संधि दाटलें । सपुरपणें ॥४॥
असो हें शीष्यव प्रेम आलें । आठहि सात्विक उदैलें । कैसें पूर्ण अवतरलें । आंगी त्याचा ॥५॥
असा शिष्याचा माजु । वरी ब्रह्मानंदाचा फुजुं । ते देखुनि गुरुराजु । बोलता जाला ॥६॥
बा रे तुं भला ज्ञातारु । वरि आनंदाचा संचारु । पूर्ण ब्रह्मीं निरंतरु । सुखावलासी ॥७॥
जें मिं ब्रह्म देखे माझें । हें मन लोधलें तुझें । पाहातां हेंहि वोझे । ब्रह्मविषईं ॥८॥
तु ब्रह्म साचार । तरि काये देखिलें येर। तुझा तुं उत्तर । तुज कासे ॥९॥
तु अभेदें ब्रह्मलिंग । घॆसि सुखाचा वोढंगा । हा स्वगतभेद आंगा । आला तुझ्या ॥१०॥
वस्तु जालयां वासना उरे । तें हें सुख आहे बा रे । हेतुसहित ब्रह्म पुरे । ते चि दशा ॥११॥
जेवि साकरेचे प्रव्हाण । माजी भरे लवण । ते समुद्र तरावा ह्मणौन । आंतु रीगे ॥१२॥
तें त्या दोही उरी नुरे । पण समुद्र होये साचकारें । असी होये ते बा रे । पूर्णदशा ॥१३॥
मुख वासना वीरे । मन आटे तिचेंनि पदरें । जैसें नेईजे जठरें । कर्पुंरातें ॥१४॥
मन वासनेंचेंनि मेळें । वर्त्तति इंद्रिये सकळे । वासनां न लागतां चि गेलें । इंद्रियग्रामु ॥१५॥
हा इंद्रिग्रामु जळे । विशयांचा थंडीचा उन्मळे । तै तुं गंगामन जळे । सहित आटे ॥१६॥
तैं नग्र उरे वासना । तैं चि निष्काम कामना । तैं चि उन्मन मना । होये निकें ॥१७॥
जेवि आटलेयां निर । गंगा उरे सुकोदर । तेवो हे वासना विकार । सांडोनि राहे ॥१८॥
ते हे वासना सबिज । निष्काम उरलि तुज । तेणें आत्मबोधु निज । सुख घेसी ॥१९॥
ते या सुखासीं आधारु । वासना नाहि करुं । पाठिं सुखबोधें धीरु । धरिजें जैसा ॥२०॥
क्षिरिं साकर मिळे । तिचें जडपण गळे । पण गोड्पण आगळे । उरे तेथें ॥२१॥
कां जळि लवण वीरें । आकार तुक दोन्ही सरें । परि क्षारपण सहित उरें । उदक चि तें गा ॥२२॥
नाना द्रव्यांच्या आहुति । सघृतिं होमितां हुति । ते ग्रासुनि येक मूर्ति । ज्वालनु उरे ॥२३॥
तैसा हा ज्ञानबोधु हुतासु । ग्रासी व्दित प्रपंच भासु । तोहि निमतां भस्म लेशु । वासना उरे ॥२४॥
येथ पर्यंत वासना । निमती आलिया स्छाना । प्रकाशु सांडौनि निर्गुणा । असी होये ॥२५॥
जो वासनेचा आळगिला बोधु । तो चि हा तुज आनंदु । जो नुरोनि उरलेपणें स्वादु । ब्रह्मीचा जाणसी ॥२६॥
पूर्वापर मागां पुढा । रचना डंबरु जेवढा ॥ तो हा वासनेचा धडा । उतरला असे ॥२७॥
परि गा दिपु स्रेहें प्रकाशे । स्नेहाचा अंति प्रकाशु नाशे । या मना होय तैसें । वासनायुगें ॥२८॥
या वासना सन्मधि । व्दैत संपादिलें वेदिं । तवं देखिले अनादि । पूर्णब्रह्म ॥२९॥
बोलिला बोल न बोलनें । हें समर्थाचे उघानें । तरि नेति नेति दोन्हिं बोला विवंचनें । हा विशेषु काई ॥३०॥
येकें व्दैताव्दैत वेचिलें । दुसरेंनि वसनेतें पुसीलें । ये वासनें चि करितां घेतलें । येवढें वेदें ॥३१॥
ये वासनें आधि रुप करुं । पाठीं नाहिं करुनि सारु । जेणें चेतला ईश्वरु । तो अंकुरु हें ॥३२॥
निर्गुणीं माहा ठिशाळ । ते वासना वोतली सकळ । मूळ कर्माचें मूळ । हें चि होये ॥३३॥
तृष्णादिकें अनेगें । ते ये वासनेचि अंगें । आत्मा वासनेंसंगें । संसार काढि ॥३४॥
वासुदेवो हे वासना । हा बोलु आणु प्रमाणां । त्या देवा चेतवीति चेतना । हे चि देवी ॥३५॥
ब्रह्म प्रवृत्ति लाविलें । माये अविद्यें रुप केलें । तिनि देव नाचवीलें । या चि देवी ॥३६॥
तुं ह्मणसी मन वाडें । तरी हें मशक बापुडें । हें आधारें वावडें । वासनेंचें ॥३७॥
पुरुशु आणि प्रकृति । ईच्या अंगुलिया धरीति । पाठि दोघे चालति । प्रवृत्तिमार्गे ॥३८॥
स्थूळ सूक्ष्म कारण । हे च चेष्टवी आपण । त्रीपुटी मुख्य तिन्हि गुण । हें चि खेळणी ॥३९॥
धर्माधर्मु ये दोन्हि । हें चि चालवि हातधरणिं । कर्माकर्मा संजीवनी । हे चि माउली ॥४०॥
संकल्पविकल्प तानुलि । दोन्हिं हें चि प्रसवली । प्रवृत्ति निवृत्ति वाईली । ईचां हें चराचर ॥४१॥
मनें सृष्टी संहार । तेया चि वेष्टीले रुषेश्वर । गुंतलें हें चराचर । इचें चि जालीं ॥४२॥
ते हे वासना असी । विस्तारली जैसी तैसी । रुप परी या निर्धारीतां ईयेसी । रुप नाहिं ॥४३॥
पाहातां निर्धारी ठावो । हे वासना समूळ बावो । जैसा सर्पाचा पावो । बोलिजे जगीं ॥४४॥
जैसा बागुलु साचारु । कीं वांझेचा कुमरु । तैसा मानावा निर्धारु । वासनेचा ॥४५॥
प्रबुधिं पूर्णप्रकाशीं । वासना देखीली असीं । सूर्यबिंबा जैसी । पडसाइ बैसे ॥४६॥
स्वभावें प्रपंचरचना । वासना ये प्रमाणा । तैं त्या उदकाच्या फेनां । लोणी आलें ॥४७॥
वासना मोक्षातें दावीं । अथवा बंधु होउनि गोवी । तैं स्वप्रविषें मानवी । मृत्य पावला ॥४८॥
ये वासनेंचें बळें । ब्रह्मप्रवृत्ति चळे । हें विनोदाचें टवाळें । आह्मि केलें ॥४९॥
हे वासना येसणि । पाहों पाहिजे नयेनी । तैं मृगजळें रयेनी । हातु दीधला ॥५०॥
ये वासनेंचि करणि । हें मिं बोलिलों वचनिं । हे दीपपुष्पाचि वोवनी । कंठि घातली ॥५१॥
हे सर्व ही वासनां । बोले माझी रसनां । ते कासविच्या स्तनपानां । पवाडली साच ॥५२॥
ये वासनेंचां मेळिं । मुख माझें जालें बळिं । तें गगनातें चघळि । असें गमे ॥५३॥
वासनां असीं निर्धारीं । आह्मीं धरीली होति करी । तें चंद्रकराचि दोरी । धरुनि चढलों ॥५४॥
साच मानुनी वासनां । आह्मि आणिलि प्रमाणा । हा वंध्यापुत्र पाळणा । प्रेयें दिला ॥५५॥
आह्मि बोलिलों वासनें । हें अभ्रावरी केलें लेखणें । वासनां निर्धारीं आरोहनें । स्वस्कंधि जाले ॥५६॥
बोलिलो वासना प्रसंगु । हा वळिला मृगजळाचा वोघु । किं नभी घेतला मागु । जार गर्जनेचा ॥५७॥
गंधर्वग्रामि वस्ति जैसी । वासना मानावी तैसी । हा व्योमदारु आकाशीं । सफलु जाला ॥५८॥
हा छायापुरुशां केल श्रृंगारु । उतरलों रोहिणीसागरुं । किं प्रतिबिंबाचा करु । धरुनि चालिलों ॥५९॥
कीं चढवीला इंद्रधनुशाचा गुणु । वरि वोढिला बलिबाणु । संग्रामि घेतला प्राणु । बागुलाचा ॥६०॥
तलवा गंगावन उठे । व्योमि मार्गु पायेवटे । मयोरा देखणें प्रगटे । आंगीचा डॊळां ॥६१॥
वासना सांच आहे । तरी ससेयाचे सींग कां नोहें । हां हो पवनतांथु काये । विनों नयेति ॥६२॥
वासनावस्तु आकळि । तैं चंद्रदुहिला काउळिं । तैं की दुहितेजें झांकोळि । सूर्यबिंबा ॥६३॥
जळिं बिंबे सविता । तो बिंबु साश्वतु असता । तैं निशि तमातें मानीता । कोणु लोकु ॥६४॥
जळिं चित्ररेखना । तैसी तत्स्वरुपीं वासना । काये विद्युप्रकाशे जना । दीवसु होये ॥६५॥
ब्रह्म ब्रह्मातें नेणें । ते जीकीलें वासनें । तै कमळतंतुचि बंधनें । जालि गजां ॥६६॥
भुजंगाची त्वचा । गरुडा भवंडी कुंचा । तैं हे वासना ब्रह्मींचा । अधीकारु घेति ॥६७॥
उर्णनाभीचा तंतुवारु । धरुनि चढे माहामेरु । तै वासनाठवकिं ब्रह्मसागरु । सामावेता ॥६८॥
कूर्माचया क्षीरा । वोडवीजे ब्रह्मांडाचा डेरा । किं अजागळकें सागरा । भरु पाहिजे ॥६९॥
जें जें वासनाविषिं निर्धार । तें समस्त गंधर्वपुर । बिदि चोहटे बिढार । मिळे तेथें ॥७०॥
इंद्रजाळ सागरा । घालुनि गाळावें मकरा । पण वासनेचा दोरा । कोठेंहि न लभे ॥७१॥
तेवि वासनेचि महंता । धरुं तरि नये हाता । नाशुं तरि नाशितं । येश नाहि ॥७२॥
आकाशातें विंधिता । बाणु चि पडे रिता । कां साउलीये झोंबतां । प्रोढि जाये ॥७३॥
गांधेलाचें मोहाळिं । भरती मधाचि तळिं । तै वासनाकरे दिवाळिं । होति आह्मा ॥७४॥
सत्यार्थि असत्यें बैसे । असत्या असत्यें ये कैसें । बागुले मारिलें असें । दोन्ही वावो ॥७५॥
अरुपा आंगीचि त्वचा । हा बोलु होता साचा । तै कां आह्मि वासनेचा । सांडीतो पक्षु ॥७६॥
वासना निरसीली या परी । पुसीली गगनीचि मकरी । ना कोकमा देविचां डोंगरी । वनवा लाविला ॥७७॥
तुझी वासना निरसली । हे मज असी गमली । धोउनि चोखाळ केली । सूर्याची कळा ॥७८॥
कोंडा काढिला मुक्तिका । रंगें राविले पावका । की जीव रत्नाची टीका । वोपेंसारिली ॥७९॥
हें चांदिणें पीकवीले पणिं । रात्री पाडिली उलथोनि । किं ताउनि मुक्तमणि । पाणि पाजिला ॥८०॥
वासना निरसली यापरी । जें नाचलों आपुले च शींरी । तें निरसलिं जाणॊं सागरीं । इडाळीजे आपणां ॥८१॥
॥इति वासना ॥
====
तुज वाटैल संदेहो । मूळ वासने नाही ठावो । तरी मीं पणें देवो । चेतला कैसा ॥८२॥
तरी वासनेंविण सर्वेश्वरि । आंगीं जालि उभारीं । हा बोल निर्धारी । साच मानि ॥८३॥
तें स्वये चि शिष्यवरा । ब्रह्म आले विकारा । जैसा कां विवर्तु सागरा । आंगी उठे ॥८४॥
ब्रह्मव्दारीं शीष्यमूर्ती । नाद अनुहात उठती । तो कोणाचें हाती । वाजवणें होये ॥८५॥
कां सर्पा नाहीं पाये । परी आगें चि चालणें होये । तैसें करणें आहे । ईश्वराचें ॥८६॥
निर्धारु मानुनियां बुधी । तु ही घे आत्मसीधी । मि ब्रह्म हे उपाधि । उरों नेंदि ॥८७॥
वसनानिरास पक्षु । परिसोनि बोले शिष्यु । जी मिं सर्वसाक्षु । जालों बापा ॥८८॥
वासनांव्दैत मूळिं नसे । माझें प्रेम उठलें कैसें । नमन हि कीजे असें । ठेविलें नाहि ॥८९॥
तेथें माझें प्रेम असें । तुमच्या पायां तळी घुसे । हें जळ जळें जैसें । सेवीजत ॥९०॥
वासना व्दैत निरसीलें । तें च गुरुशीष्यपण गेलें । तर्हिं प्रेम इतुलें । कैंच मज ॥९१॥
तुमचें पादरक्षण । तें आमचें हृदयभूषण । तुमचें आसन । नमस्कारुं आह्मिं ॥९२॥
कीं तुमची मागमोडी । भावें करुणिं घालों घडी । लाधलों घेउं आवडी । चरणतीर्थ ॥९३॥
हे दैवापरवडी कैची । जे सेवा घडे स्वामि तुमची । आमतें कुळदेवत हें ची । आले रज ॥९४॥
जी अखंड तुमतें स्मरु । हा नेदावा विसरुं । यास्तव माझा नमस्कारु । अंगीकारावा ॥९५॥
तुह्मी ह्मणाल ये शरीरीं । आहे संशयाचि उरी । परी हें नाहि निर्धारी । स्मरलें येक ॥९६॥
परि जे उरी आहे मना । ते पुसैन भवभंजना । न पुसतां कल्पणां । धाये कैसी ॥९७॥
आतां जें बोलिजे तें काबाड । गोसावि ह्मणतील हे जड । पण न कलतां कोड । न पुरैल माझें ॥९८॥
जी जी सिध्देश अनुगृहीता । जें जें आलें माझ्या चित्ता । तें तें निरुपावें ताता । या पुढिलां प्रसंगी ॥९९॥
असी करुनि विनंति । शिष्यु बोलैल पुडती । त्रिंबकु ते करील निश्चेति । राजयोगी ॥१००॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडे विवरणे वासनानिरसननाम व्दादश कथन मिति ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP