आर्या -
तीं तींच अक्षरें जरि वाक्यांमध्यें पुन: पुन्हां येतीं ॥
आदीं मध्यांती तरि अलंकृती तीच यमकसें ह्नणती ॥१॥

श्लोक -
गजगती जगती प्रति दाविते ॥
वसुमती सुमती सुख भाविते ॥
स्वतनुजा तनु जाणतसे धरा ॥
नवरि ते वरिते मणिकंधरा ॥२॥        
वामन.

जेव्हां तीं तींच अक्षरें वाक्यांमध्यें आदीं, मध्यीं, किंवा अंतीं पुन:  पुन्हां येतात, तेव्हां हा अलंकार होतो.

श्लोक (२)
यांत जगती, विते, सुमती, तनुजा, धरा, वरिते हीं
अक्षरें मध्यें व अंतीं पुन: पुन्हां आलेलीं आहेत.

श्लोक -
पुष्पवर्ण नटला पळसाचा । पार्थ सावध नसे पळसाचा ॥
पाहिलें जंव निदान तयाचें । तों दिसे वदन आनंत याचें ॥३॥
वामन.

गद्य - यमकांत ड चे जागीं ल, व, वचे जागीं ब, आणि रचे जागीं ल आले असतां यमक-हानी होत नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP