शब्दालंकार - वृत्यनुप्रास

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या -
जेव्हां व्यंजन एकचि अनेक अथवा पुन: पुन्हां येतीं ॥
त्याहो अलंकृतीतें विबुध अनुप्रास वृत्तिचा ह्नणती ॥१॥
श्लोक -
कदां नेणो ओढी शरधिंतुनि काढी शर कदां ॥
कदां धन्वीं जोडी वरिवारिहि सोडी तरी कदां ॥
विपक्षाच्या वक्षावरि विवरलक्षास्तव रणीं ॥
कळे राजेंद्राची त्वरित शरसंधानकरणी ॥२॥
रघुनाथपंडित.

गद्य - जेव्हां एक किंवा एकापेक्षा अधिक व्यंजनें पुन: पुन्हां पुष्कळ वेळां येतात, तेव्हां हा अलंकार होतो.

भूषा-भुजंग-भक्ता. भीतिद भव्य प्रभाव तुज भार ॥
भावी-भयें भवानी-भर्ता भगवान्‍ भुले भला फार ॥३॥
बृहद्दशम.

दुसरे श्लोकांत द्‍ व्‍ क्ष‍ हीं व्यंजनें पुष्कळ वेळां आलीं आहेत ह्नणून हा अलंकार झाला आहे.

ती साध्वी सीतेच्या दिव्यादेहासि दे उटी भव्या ॥
पुष्पांची माळाही कीं जी वाळो नये सदा नव्या ॥४॥
दिव्यरामायण.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP