मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट अभंग| ३१ स्फुट अभंग बाळक्रीडा वैराग्यशतक ज्ञानशतक सगुणनिर्गुणसंवादशतक १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ स्फुट अभंग - ३१ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ स्फुट अभंग - ३१ Translation - भाषांतर ३१सर्वांगें सुंदरू कासे पीतांबरू । विद्येचा सागरू वंदियेला ॥१॥वंदियेली मनीं सरस्वती माता । सद्गुरू समर्था दंडवत ॥२॥दंडवत माझें संतसज्जनांसी । भाविक जनांसी आळिंगन ॥३॥आलिंगन माझे निवालें सर्वांग । भाविकाम्चा संग देईं देवा ॥४॥देई देवा तुझें नाम अहर्निशी । आठवे मानसीं रूप तुझें ॥५॥तुझाची आधार मन अनाथासी । झणी अव्हेरीसी मायबापा ॥६॥मायबाप बंधु स्वजन सांगाती । तूंची आदि अंतीं माहियेर ॥७॥माहियेर माझें पुण्यपरायेण । योगीयांचा मंडण स्वामी माझा ॥८॥स्वामी माझा राम अंतरला दुरी । अवस्था अंतरीं वाटतसे ॥९॥वाटतसे खंती सर्वकाळ चिंतीं । केव्हां कृपामूर्ति भेटईल ॥१०॥भेटईल केव्हां राम माझी माता । जीव हा दुश्चीता सर्वकाळ ॥११॥सर्वकाळ माझे मनीं आठवण । युगांसम क्षण जात आहे ॥१२॥जात आहे वय वेचोनीयां माझें । रूप रामा तुझें दिसेना कीं ॥१३॥दिसेना कीं रूप सांवळें सुंदर । कासे पीतांबर कासियेला ॥१४॥कासियेली आंगीं चंदनाची उटी । मुक्तमाळा कंठीं डोल देती ॥१५॥डोल देती माळा पदकीं रत्नकीळा । मृग नाभीं टीळा रेखियेला ॥१६॥रेखीयेलें भाळीं सुगंध परीमळ । लोधले अळिकुळ झुंकारती ॥१७॥झुंकारती वास घेती अवकाश । राम राजाधीश शोभतसे ॥१८॥शोभतसे माथां मुगट रतनकीळ । कीरीटी तेजाळ रम्य शोभा ॥१९॥रम्य नीमासुर श्रीमुख साजिरें । दिव्य मकराकारें तळपताती ॥२०॥तळपती कुंडलें बाहीं बाहुंवटे । दोर्दंड गोमटे चाप बाण ॥२१॥चाप बाण करीं नवरत्नें भूषण । आणी वीरकंकण कीर्तिमुखें ॥२२॥मुख मुरडुनी सिंह जाती वनीं । जघन देखोनी संकोचले ॥२३॥संकोचले दैत्य पुतळे तोडरीं । गर्जती गजरीं अंदू वांकीं ॥२४॥आंदु वांकीं पाईं शोभे वीरासन । माझे मनीं ध्यान आठवलें ॥२५॥आठवलें रामचंद्रध्यान चित्तीं । सन्मुख मारूती उभा असे ॥२६॥उभा असे सर्व बंधु समुदाव । त्रिकुटीचा राव बिभीषण ॥२७॥बिभीषण आणी किष्किंधेचा राव । सर्व समुदाव वानरांचा ॥२८॥वानरांसहीत राम अयोध्येसी । आनंद जनांसी थोर जाला ॥२९॥जाला यशवंत राम सूर्यवंसी । रामी रामदासीं भेटी जाली ॥३०॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP