मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट अभंग| २५ स्फुट अभंग बाळक्रीडा वैराग्यशतक ज्ञानशतक सगुणनिर्गुणसंवादशतक १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ स्फुट अभंग - २५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ स्फुट अभंग - २५ Translation - भाषांतर २५अज्ञानजनांचे देव नानापरी । त्यांची संख्या करी कोण आतां ॥१॥कोण आतां देव पावेल तयासी । जन्ममरणासी चुकवीता ॥२॥चुकविला देव पाहतां दिसेना । निश्चयो असेना येके ठाई ॥३॥येके ठाईं भाव येके ठांई देव । चुकला उपाव सार्थकाचा ॥४॥सार्थकाचा देव तरीच सांपडे । जरी कांहिं घडे संतसेवा ॥५॥संतसेवा भाव करितां तरले । जन उद्धरलें नेणों किती ॥६॥जन साधूचे संगती । आपुले प्रचीती मुक्त जाले ॥७॥मुक्त जालें ज्ञानें विचारें पाहाता । स्वरूपीं राहतां निरंतर ॥८॥निरंतर देव फुटेना तुटेना । चळेना ढळेना कदा काळीं ॥९॥कदा काळीं देव रचेना खचेना । येईना जाईना निरंजन ॥१०॥निरंजन देव पाहातां दिसेना । परी तो नासेना कल्पकोटी ॥११॥कल्पकोडी गेले देवासी नेणतां । यातना भोगितां जन्मोजन्मीं ॥१२॥जन्मोंजन्मीं देव जवळी चुकला । प्राणी भांबावला मायाजाळीं ॥१३॥मायाजाळें कांहिं उमजत नाहीं । देव ठांई कल्पनेचे ॥१४॥कल्पनचे देव कल्पांतीं नासती । ऐसें वेदश्रुती बोलतसे ॥१५॥बोलतसे श्रुती दृश्य नासिवंत । जाणिजे शाश्वत परब्रह्म ॥१६॥परब्रह्म आहे सर्वत्र व्यापक । तेंचि पाहें येक गुरूमुखें ॥१७॥गुरूमुखें ब्रह्मविचार पाहावा । निश्चयो राहावा निर्गुणाचा ॥१८॥निर्गुणाचा ध्यास निर्गुण करील । मग उद्धरील आपणासी ॥१९॥आपणासी पाहे जो कोण्ही शोधूनी । तो जन्मापासुनी मुक्त जाला ॥२०॥मुक्त जाला देहेसमंध सोडीतां । निर्गुण धुंडीतां निर्गुणची ॥२१॥निर्गुणची स्वयें जो कोण्ही जाहला । तोचि येक भला समाधानी ॥२२॥समाधनी साधु जोडतां संकट । मिथ्या खटपट जेथें तेथें ॥२३॥जेथें नाहिं माया जो मायेवेगळा । ऐसा तो विरळा संतजन ॥२४॥संतजन तोचि जो स्वयें देवची । तेथें ये मायेची वार्ता नाहीं ॥२५॥वार्ता नाहिं ऐसें सज्ञान जाणती । अज्ञान नेणती कांहिं केल्यां ॥२६॥कांहिं केल्यां पापरी पुण्य आचरेना । संसार सरेना दुःखमूळ ॥२७॥दुःखमूळ जन्म ज्ञानें निरसावा । विवेकें पाहावा सारासार ॥२८॥सार निराकार असार आकार । निकारें पार पाविजेतो ॥२९॥पाविजेतो परी अर्थीं विवरावें । विवेकें विरावें स्वस्वरूपीं ॥३०॥स्वस्वरूपीं ज्ञाते जे कोण्ही विरले । स्वरूपची जाले आत्मबोधें ॥३१॥आत्मबोधस्थिति बाणलीसे जया । मज तया माया आतळेना ॥३२॥आतळेना मायाममता अंतरीं । नित्य निरंतरीं निरंतर ॥३३॥निरंतर असे परी तो न दिसे । गुप्त जाला भासे भासमात्र ॥३४॥भासमात्र देहे तया ज्ञानियांचा । अंतरीं सुखाचा सुखमूर्ती ॥३५॥सुखमूर्ती सुखदुःखाविरहित । बोलियेलों हेत कळावया ॥३६॥कळावया हेतु शब्द निःशब्दाची । लक्षें अलक्षाची सोय लाये ॥३७॥सोय लागे तेथें लक्ष ना अलक्ष । देहें पूर्वपक्ष बोलियेला ॥३८॥बोलियेलों शब्द अनिर्वाच्या वाचे । जाणती मुक्तीचे वांटेकरी ॥३९॥वांटेकरी जाले अवस्थेवेगळे । श्रुतीसी ना कळे पार ज्यांचा ॥४०॥पार ज्याचा नाहीं अपार विदेही । देहातीत पाहीं समाधान ॥४१॥समाधान राहे निःसंग राहतां । संग पाहों जातां कासावीस ॥४२॥कासावीस जाले संगाचेनी गुणे । निःसंगची होणें सर्वकाळ ॥४३॥सर्वकाळ संग सोडावा आपुला । मीपणाच्या बोला लागों नये ॥४४॥लागों नये कदा मनामागेंमागें । कल्पनेंच्या त्यागें समाधान ॥४५॥समाधान राहे संतांचे संगती । वस्तुची प्रचीती वस्तुरूप ॥४६॥वस्तुरूप जाला जो कोण्ही साधक । धन्य तोचि येक लोकांमध्यें ॥४७॥लोकांमधें परलोकचि साधावा । भगवंत शोधावा नानापरी ॥४८॥नानापरी सांगें रामीरामदास । भाविकें विश्वास सोडूं नये ॥४९॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP