मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट अभंग| २१ ते २३ स्फुट अभंग बाळक्रीडा वैराग्यशतक ज्ञानशतक सगुणनिर्गुणसंवादशतक १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ स्फुट अभंग - २१ ते २३ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ स्फुट अभंग - २१ ते २३ Translation - भाषांतर २१संसार देखिला तरी पाहे सार । वाया येरझार पाडूं नको ॥१॥पाडूं नको दुःखसागरीं आपणा । म्हणे नारायणा वोळखावें ॥२॥वोळखावें वेगीं आपआपणासी । संसारीं सुटसी दास म्हणे ॥३॥२२विचारें संसार होतो देशधडी । सोनियची धडी जात आहे ॥१॥डावा तास गेला मोक्षपंथा जातां । विवेक तत्वता याचि नांव ॥२॥सदा श्रीरामाचे भजन करितां । दास म्हणे चिंता दूर होय ॥३॥ २३राम माझा स्वामी राव अयोध्येचा । त्रिदश देवांचा कैवारी ॥१॥कैवारी थोर सामर्थें आगळा । तारिलें चांडाळ वाल्मीकासी ॥२॥वाल्मीकासी फळ जाहालें नामाचें । चरित्र रामाचें शतकोटी ॥३॥शतकोटी रामचरित्र बोलिला । अवतार जाला नाहीं तोंचि ॥४॥नाहीं तोंचि रामचरित्र बोलिला । श्रावण वधिला दशरथें ॥५॥दशरथ राजा तया पुत्र नाहीं । पुत्रशोक पाहीं शाप त्यासी ॥६॥ श्रापाचा आनंद थोर तया जाला । तेणें पोटा आला रामचंद्र ॥७॥रामचंद्रें वनीं ताटीका वधीली । सर्व सुखी केलीं ऋषिकुळें ॥८॥ऋषी संतोषले कर्य सिद्धी जालें । तंव पत्र आलें जनकाचें ॥९॥जनकाचे घरीं मांडलें सैंवर । तेथें ऋषीश्वर पाचारिले ॥१०॥पाचारिले तेथें मार्गीं अवलीळा । रामें चंडशीळा उद्धरीली ॥११॥उद्धरीली रामें गौतमाची वधू । पुढे कृपासिंधु स्वयेंवर ॥१२॥स्वयंवर पण त्र्यबक कठक्षर । राम सुलक्षण सकुमार ॥१३॥सकुमार बाळा जनकनंदिनी । राम चिंतीं मनीं अहर्निशी ॥१४॥अहर्निशी पाहेराम जगजेठी । राजे लक्ष कोटी सांडूनीयां ॥१५॥सांडूनी विक्रम सर्वहि निवांत । धनुष्य अद्भुत देखीयेलें ॥१६॥देखीयेलें कोण्ही कोण्हासी न बोले । तंव राव बोले धिक्कारूनी ॥१७॥धिक्कारूनी बोले जनक सर्वांसी । म्हणे ‘ पृथ्वीयेसी वीर नाहीं ’ ॥१८॥वीर नाही ऐसें विदेही बोलीला । ऐकोनी उठिला लक्षुमण ॥१९॥लक्षुमण उभा सर्वांगे वीरश्री । तंव ऋषेश्वरीं वारीयेलें ॥२०॥वारीयेलें मग दैत्य क्रूरबुद्धी । क्रोधें गर्वनिधी उकावला ॥२१॥उकावला थोर गर्वें लंकापती । भ्रष्टला हांसती सर्व राजे ॥२२॥राजे राजेश्वर पाहाती समस्त । रावणा देहांत काळ आला ॥२३॥काळ आला थोर धनुष्य वाहातां । मग कृपावंता उठविलें ॥२४॥उठविती ऋषी ते काळीं रामासी । देईं रावणासी जीवदान ॥२५॥दान देईं ऐसे ऋषी बोलीयेलें । मग उचलीलें वामांगुष्ठीं ॥२६॥वासांगुष्ठें धनुष्य काढुनी टाकीलें । मग चढउनी वाईयेले ॥२७॥वाईयेलें बळें वोढितां कडाडी । पर्वत घडाडी मेरूशृंग ॥२८॥मेरूशृंगीं थोर कडक विझाला । सैंवरीं जिंकीला पण रामें ॥२९॥रामें भग्न केलें धनुष्य कठोर । सर्व ऋषीश्वर संतोषले ॥३०॥संतोषला राव मांडिला उत्साव । सर्व समुदाय आनंदला ॥३१॥आनंदले सर्व वाद्य येकवेळां । माळ घाली बाळा जनकाची ॥३२॥जनकाची बाळा सैंवर सोहळा । शीघ्र रघुकुळा मूळ गेलें ॥३३॥मूळ गेलें शीघ्र पाचारूं विवाहा । लगबग राया जनकासी ॥३४॥जनकासी थोर आनंद जाहाला । जावई जोडला रामराणा ॥३५॥रामराणा शोभे सर्वांगें सुंदर । वामे सकुमार भूमीबाळा ॥३६॥भूमीबाळा राम शोभे सिंहासनीं । विप्र वेदध्वनी गर्जताती ॥३७॥गर्जताती भाट ब्रीदें वाखणीती । बासींगी फांकतीं रत्नकीळा ॥३८॥रत्नकीळा बहू भूषणें सुंदरें । दिव्य मकराकारें तळपताती ॥३९॥तळपताती माळा पदकीं रत्नकीळा । कासे सोनेसळा कासीयेला ॥४०॥कासीयेली कोस कींकीणी वाजटा । वरी क्षुद्र घटा झणत्कार ॥४१॥झणत्कार वांकी मुर्डीव नेंपुरें । गर्जती गजरें आंदु पाई ॥४२॥पांई चंडशीळा जाली दिव्य नारी । जानकी न करी दंडवत ॥४३॥दंडवंती होती बहुसाल बाळा । म्हणोनी भांगटीळा काढीयेला ॥४४॥काढीयेला मग केला नमस्कार । लावण्य वोहर रम्य शोभा ॥४५॥रम्य शोभा आली मंडपीं वोहरें । चारी मनाहरें शोभताती ॥४६॥शोभती मंडपीं मुक्ताफळ घोष । माळा बहुवस कुसुमाच्या ॥४७॥कुसुमाचो हार शोभती अपार । परिमळ धुसर पुष्ययाती ॥४८॥पुष्पयाती दिव्य पंचक मालती । जाई जुई सेवंती पारीजात ॥४९॥पारिजात गभ केतकी कोंवळें । मोगरे नव्हाळे बकुळ पुष्पें ॥५०॥पुष्पें सुवर्णाचीं करवीर कमळांची । परिमळ द्रव्यांची दिव्य गंधें ॥५१॥दिव्य गंधें माळा सर्वांस सोहळा । सुरंग आगळा तुषाराचा ॥५२॥दिव्यानें भोजनें तृप्त सर्वां जना । सर्वांसी पूजन उपचार ॥५३॥उपचार जाले अंबरीं पूजीले । रायें नीरवीले दुहितेसी ॥५४॥सर्व एकसरें निघाले गजरें । अंबरें धूसरें पूर्ण झाले ॥५५॥पूर्ण चंद्राकारें त्राहाटीलीं छत्रें । थरकती अपारें मेघड्म्ब्रें ॥५६॥मेघडंब्रें माही निशाणें थरकती । रोमांच फरकती देखतांची ॥५७॥देखतांची मार्गें जातां गजभार । निशाणीं अंबर आछ्यादीलें ॥५८॥आछ्यादिलें मार्गें जातां भूमंडळ । रथवरूदळभार चाले ॥५९॥भार चाले पुढें दिव्य सुखासनें । शिबिका आंदणें चौर डोल ॥६०॥चौर डाल जाती मालती कुंजरें । हिंसती गजरें तुरंगम ॥६१॥तुरंग उसाळें जाती अंतराळें । उफाळती बळे दोंचि पांई ॥६२॥दोनी दळें मार्गें जातांई थोकलीं । तेथें आज्ञा जाली विदेहासी ॥६३॥रायें लोटांगण घालुनी समस्तां । म्हणे माझी सीता तुम्हापासीं ॥६४॥ऐसें बोलोनीयां उद्वेगला चित्तीं । वियोगें गळती अश्रुपात ॥६५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP