मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८० वा| श्लोक १६ ते २० अध्याय ८० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८० वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर त्रीणि गुल्मान्यतीयाय तिस्रः कक्षाश्च सद्विजः । विप्रोऽगम्यान्धकवृष्णीनां गृहेष्वच्युतधर्मिणाम् ॥१६॥द्वारकादुर्गरक्षणकामें । भंवतीं प्रबळ सेनागुल्में । त्रय लंघिलीं द्विजसत्तमें । श्रीकृष्णनामें चिन्तूनिया ॥७२॥पदोपदीं नामस्मरण । करित चाले तो ब्राह्मण । त्यातें देखूनि करिती नमन । वृष्णि यदुगण भोजान्धक ॥७३॥ऐसें गुल्मत्रय लंधिलें । पुढें द्वारकापुर देखिलें । ब्राह्मणोत्तमें मनीं भाविलें । साफल्य जालें जन्माचें ॥७४॥द्वारकापुरनिवासिजन । कित्तेक दूरस्थ ब्राह्मण । तिहीं सहित द्विजवर पूर्ण । द्वारकाभुवन प्रवेशला ॥१७५॥प्रथम दुर्ग प्रचंड पवळी । गोपुरीं पताका विचित्र चैलीं । द्वास्थ बैसले प्रतापशाली । नामावळी मुखें पढती ॥७६॥द्विजें देखूनि तयां प्रती । म्हणे द्विज प्रवेशीं निषेधिती । ऐसी शंका मानी चित्तीं । तंव ते बंदिती द्विजवर्या ॥७७॥आमुच्या स्वामींचें दैवत । म्हणोनि द्विजातें नमिती द्वास्थ । प्रवेशविती नगरा आंत । द्वितीय गोपुरा पावविती ॥७८॥तेथही चंद्रप्रचंड वीर । द्वास्थ बैसले प्रबळतर । तिहीं देखतांचि द्विजवर । नमिती सादर होत्साते ॥७९॥तेही कक्षा लंघूनि विप्र । तृतीय देहळी प्रति सत्वर । सवें समस्त द्विजांचा भार । घेऊनि सादर प्रवेशला ॥१८०॥तीन्ही कक्षा लंघूनि पुढें । ब्राह्मण जातां निजनिवाडें । भोजान्धकवृष्णिवाडे । देखीले उघडे दारवटे ॥८१॥पारका वरा प्रवेशूं न शके । ऐसे रक्षक बैसले निके । अच्युतधर्मी यादव असिके । द्विजवर देखे प्रति सदनीं ॥८२॥ऐसीं यदुगणांचीं सदनें । द्विजे पुरस्थां पुसूनि वदनें । द्व्यष्टसहस्र कृष्णायतनें । दाविती नयनें जय विप्रा ॥८३॥गृहं द्व्यष्टसहस्राणां महिषीणां हरिर्द्विजः । विवेशैकतर्म श्रीमद् ब्रह्मानंदं गतो यथा ॥१७॥सोळा सहस्र सदनें ज्यांत । ऐसें एकायतन प्रशस्त । गोपुरद्वारीं बैसले द्वास्थ । निर्भय तेथ द्विज आला ॥८४॥द्वास्थीं देखूनि द्विजा प्रति । नमस्कारिला सप्रेमभक्ति । काय इच्छा असेल चित्तीं । कृपामूर्ती ते सांगा ॥१८५॥येरु म्हणे कृष्णदर्शना । जावयाची असे कामना । द्वास्थ म्हणती कीजे गमना । जनार्दना भेटावया ॥८६॥कृष्णसदनीं निषेध नाहीं । विशेष ब्रहमणालागि पाहीं । आवडे त्या प्रवेशा गेहीं । वसे सर्वीं ही सर्वात्मा ॥८७॥ऐसें ऐकूनि द्वास्थवचन । संतोषलें द्विजाचें मन । सोळा सहस्र सतींचें भुवन । प्रवेशून पुढें पाहे ॥८८॥कृष्णमहिषी सहस्र सोळा । त्यांची भुवनें देखोनि डोळां । ब्राह्मणातें आनंद जाहला । म्हणे सुकृतें सोहळा देखिला हा ॥८९॥त्यां माजि कोणे एके सदनीं । ब्राह्मण पाहे प्रवेशोनी । तंव ते श्रीमत्सर्वाभरणीं । वैकुण्ठाहूनि वर विभवें ॥१९०॥सदनीं प्रवेशतां द्विजवर । देहस्मृतीसी पडला विसर । ब्रह्मानंद योगेश्वर । पावतां शरीर जेंवि विसरे ॥९१॥शरीरीं बाणली पराकाष्ठा । चिन्मात्रैकस्वरूपनिष्ठा । होतां आकल्प भवभ्रमकष्टा । सहित चेष्टा पारुषल्या ॥९२॥कोण्हे एके सदनीं द्विज । प्रवेशला सहजीं सहज । तंव तेथें रुक्मिणी अधोक्षज । तेजःपुज्ज पर्यंकीं ॥९३॥देखतां काष्ठा लागूनि ठेली । देहस्मृतीची भावना गेली । जाणूनि प्रभूनें त्वरा केली । तेही कथिली जातसे ॥९४॥तं विलोक्याच्युतो दूरात्प्रियापर्यङ्कमास्थितः । सहसोत्थाय चाभ्येत्य दोर्भ्यां पर्यगृहीन्मुदा ॥१८॥मंचकासनीं रुक्मिणीसहित । बैसला असतां श्रीअच्युंत । दुरूनि ब्राह्मण अकस्मात । देखूनि त्वरित धाविन्नला ॥१९५॥परमानंदावाप्ति द्विजा । ऐसें कळलें अधोक्षजा । मंचकीं सांडूनि विदर्भात्मजा । धांविला सहजानंदात्मा ॥९६॥मंचकातळीं घालोनि उडी । विप्रापासीं अतितांतडी । येऊनि त्यातें परमावडी । कारुण्यप्रौढी द्रवूनियां ॥९७॥ब्राह्मण कवळूनि दोहीं बाहीं । सप्रेम आलिंगला हृदयीं । आनंद उथळला माजि दोहीं । कथिला कांहीं तो न वचे ॥९८॥सरव्युः प्रियस्य विप्रर्षेरङ्गसङ्गातिनिर्वृतः । प्रीतो व्यमुञ्चदब्बिन्दून्नेत्राभ्यां पुष्करेक्षणः ॥१९॥विप्रां माजि ऋषीवर । प्राचीन सखा जो प्रियकर । तदंग आलिंगूनि दृढतर । सुखें निर्भर हरि जाला ॥९९॥परमप्रीती गहिंवरून । आनंदाश्रु टाकिती नयन । भक्तवत्सल श्रीभगवान । पुष्करेक्षण परमात्मा ॥२००॥अथोपवेश्य पर्यङ्के स्वयं सख्युः समर्हणम् । उपहृत्यावनिज्यास्य पादौ पदावनेजनीः ॥२०॥या नंतरे निज मंचकीं । विप्रा बैसवी स्वहस्तकीं । अर्पूनि उपायन कौतुकीं । चरणक्षालन आदरिलें ॥१॥तया ब्राह्मणाचे चरण । क्षाळी स्वहस्तें जनार्दन । हृदयीं धरी आलिङ्गून । मौळ नयन परिमार्जी ॥२॥मग ते प्रतिष्ठूनियां पीठीं । पादावनेजन धरी मुकुटीं । जयाचे पवित्रतेचिये साठीं । अखिल सृष्टी पूत करी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : June 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP