श्रीगणेशाय नमः ।
अनादिसिद्धा आत्मारामा । श्रीगोविन्दा पुरुषोत्तमा । अशीतितमाध्यायींचा महिमा । श्रोतृसत्तमा परिसविजे ॥१॥
एकोनाशीतिपर्यंत कथा । शुकें निरूपिली नृपनाथा । तेणें आल्हाद पावोनि चित्ता । पुन्हा हरिचरिता पुसतसे ॥२॥
ये अध्यायीं नृपाचा प्रश्न । ऐकोनि निरूपी शुक भगवान । धनार्थी गुरुबंधु ब्राह्मण । त्या गुरुसेवन पुसे हरी ॥३॥
हरिगुणश्रवणीं निज आवडी । म्हणूनि श्रवणेच्छेची गोडी । शुकाचार्या ते कथीं फुडी । तेचि रोकडी अवधारा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP