मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८० वा| श्लोक १ ते ५ अध्याय ८० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८० वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर राजोवाच - भगवन्यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः । वीर्याण्यनन्तवीर्यस्य श्रोतुमिच्छाम हे प्रभो ॥१॥श्रीयोगीन्द्रा भो भगवंता । यावत्काळ मुकुन्दचरिता । तुवां कथिलें तें ऐकतां । न बणे चित्ता संतृप्ति ॥५॥यावत्काळ जितुकीं चरितें । मजला कथिलीं कृपावंतें । तयां वेगळीं जीं उर्वरितें । सुकृतभरितें मज सांगा ॥६॥रामचरितप्रश्नावडी । ते तां पूर्ण केली फुडी । या वरी मुकुन्दचरिता गोडी । चाखवा रोकडी मम श्रवणा ॥७॥म्हणसी जन्मापासूनि सकळ । कथिला श्रीकृष्णकथारोळ । कोणते उरले या वेगळ । कथूं केवळ तुज ते मी ॥८॥अनंतवीर्य जो श्रीहरी । त्याचीं वीर्यें अनंतपरी । वदतां वेदाची वैखरी । न पवे पारी पूर्णत्वें ॥९॥अनंताचीं अनंत वीर्यें । मर्त्यनाट्यें केलीं कार्यें । मज कथवीं योगिवर्यें । जीं अमर्त्यभुवनीं स्पृहमानें ॥१०॥वीररसाचें पारणें । हरिचरितात्मक केलें श्रवणें । या वरी सप्रेम रसाकारणें । अंतःकरण लिप्साळु ॥११॥म्हणसी तुझिया मनोगता । सारखी मज कैंची वक्तृता । भगवन्संबोधना अतौता । कथिला पुरता तव महिमा ॥१२॥आणि प्रभो या संबोधनें । तुझें प्रभुत्व मजकारणें । कळलें असाधारणपणें । म्हणोनि श्रवणेच्छा उपजे ॥१३॥भूतभविष्यद्वर्तमान । परिच्छिन्न अविच्छिन्न । हें तुज विदित अद्यतन । तो तूं सर्वज्ञ योगीशा ॥१४॥म्हणसी श्रवणीं रसोत्पत्ति । तेणें घडे विषयावाप्ति । तन्निरासें कैवल्यप्राप्ति । चिद्रसरति अंतरते ॥१५॥तरी यदर्थीं अकें स्वामी । ऐसा महिमा मुकुन्द नामीं । मुकुन्ददात्री ऐसी वाग्मी । मोक्षकामीं आश्रयितीं ॥१६॥मुकुन्दनामश्रवनपठनें । अविरतस्मरणें ध्यानें स्तवनें । नेदी निःश्रेयसाविणें । हे मी जाणे तव कृपा ॥१७॥कर्मकर्त्ता तो देहात्मा । तत्फलभोक्ता तो जीवात्मा । कर्मविमोचक परमात्मा । जातें महात्मा श्रुति म्हणती ॥१८॥त्या महात्म्याचें अवतारचरित । परिसतां श्रवण विषयासक्त । होतां होतीं भवनिर्मुक्त । विषयातीत विश्वग पैं ॥१९॥विषयसेवनें विषयनिवृत्ती । फावतां विमुख कैं कोण होती । यदर्थीं ऐकें माझी विनती । म्हणे भूपती मुनिवर्या ॥२०॥को नु श्रुत्वा सकृद्ब्रह्मन्नुत्तमश्लोकसत्कथाः । विरमेत विशेषज्ञो विषण्णः काममार्गणैः ॥२॥उत्तमश्लोक जो श्रीधर । तच्चरिताचे कथनोद्गार । श्रवण करूनि एकवार । कोण पां चतुर विरमेल ॥२१॥म्हणसी एकवार हरिगुणश्रवणें । चतुर विराम न पवती मनें । तरी वारंवार श्रवणें पठनें । विराम पावणें घडे कीं ॥२२॥तरी ऐकें गा ब्रह्मनिष्ठा । पुण्यश्लोकावतारचेष्टा । वारंवार श्रवणाविष्टा । भवभ्रमकष्टा विसरविती ॥२३॥सच्छब्द जें शाश्वत ब्रह्म । मर्त्यनाट्यें तें कुढावी धर्म । तैं शोभवी रूपनाम । सगुण सप्रेम मन मोही ॥२४॥श्रवणगोचर रसाळ गमती । प्राकृतजनमनाप्रति वेधिती । विषयतृष्णा विच्छेदिती । निर्वाणप्राप्तिकर कीं ना ॥२५॥त्याचिया कथा त्या सत्कथा । भवभ्रम भंगिती ज्या ऐकतां । गमती प्राकृत जनपदवार्ता । परि त्या तत्वता श्रुतिगम्या ॥२६॥विषयरसाचे अभिज्ञ । अभ्यासनिष्थ शब्दशास्त्रज्ञ । त्यांहूनि अध्यात्मप्रवीण प्राज्ञ । अपरोक्षज्ञ त्यांही वर ॥२७॥शाब्द अध्यात्म अपरोक्ष । साद्यन्तप्रवीण कुशल दक्ष । विशेषज्ञ तेचि मुमुक्ष । रस अशेष अनुभविती ॥२८॥ऐसिये विशेषज्ञकोटी । माजि विषयरसज्ञपरिपाटी । विवरूनि निश्चयात्मक जे गोठी । करूनि पोटीं दृढ धरिली ॥२९॥विषयरसाचिया सेवनें । कैवल्यसुखा आंचवणें । विषयत्यागें जिताचि मरणें । तेव्हां वरणें अमृतत्व ॥३०॥यत्तदग्रेविषमिव । विषयत्यागें भावी जीव । पूर्ण लाभतां विरागविभव । तैं हें वास्तवसुख जोडे ॥३१॥ऐसा निश्चय कैवल्यलाभा । तेथ हरिगुण शाब्दिक विषयशोभा । केंवि दाविती कैवल्यप्रभा । श्रवणवल्लभा होऊनियां ॥३२॥इंद्रियां जितकें रसाळ रुचे । तितुकें बीज भवभोगाचें । तरी हरिगुणश्रवणें साधकां साचें । केंवि मोक्षाचें फळ लाभे ॥३३॥तरी ऐकें गा देशिकाग्रणी । इन्द्रियें सकाम विषयग्रहणं । तिये रंगतां हरिगुणश्रवणीं । निष्काम होऊनि उपरमती ॥३४॥हरिगुण कामाचे नाशक । भववैरस्यें चिन्मात्रसुख । देती ऐसा पूर्ण विवेक । निश्चयात्मक बुध गाती ॥३५॥चिमकराबुसादिकांच्या कंदा । तैलाभ्यंगवणी देती प्रमदा । तें जीवनचि परि तन्मूलच्छेदा । करी विरुद्धा भजूनियां ॥३६॥तेंवि हरिगुण विषयरूप । इंद्रियां रुचतां ससाक्षेप । तैं कामाचें करपे रोप । निष्काम चिदूप स्वयें करी ॥३७॥काममार्गणीं जे गांजले । सुख भावूनि दुःखा भजले । तापत्रयावळें भाजले । जे निर्वुजले भवभंवरा ॥३८॥तेथूनि आपुली व्हावया सुटिका । त्रासें बोभाती कारूणिका । म्हणती धांव धांव गा देशिका । सोडवीं रंका भवग्रस्ता ॥३९॥तो ऐकूनि करुणास्वरू । कृपाळु पेलूनि कृपेचें तारूं । स्वयें होऊनि कर्णधारु । काढी सत्वरु भवभग्ना ॥४०॥ काममार्गणीं पूर्वीं त्रासिले । हें न विसरे कांहीं केले । अतद्बोधें प्रणतपाळें । बोधितां उपजलें वैरस्य ॥४१॥ऐसा साद्यंत अपरोक्षज्ञ । काममार्गणीं परम विषण्ण । सारवेत्ता विषयवितृष्ण । केंवि हरिगुण न सेवी ॥४२॥तस्मात हरिगुणश्रवण त्याचें । विषयविरागें जीवन साचें । नवविधभजनें इन्द्रियांचें । साफल्य वाचे नृप बोले ॥४३॥सा वाग्यया तस्य गुणान्गृणीते करौ च तत्कर्मकरौ मनश्च ।स्मरेद्वसन्तं स्थिरजङ्गमेषु शृणोति तत्पुण्यकथाः स कर्णः ॥३॥मृत्युलोकीं जन्मती प्राणी । विराजमान पटुतरकरणीं । त्यांमाजि धन्य तेचि वाणी । जे हरिगुणगणीं रंगली ॥४४॥जिनें हरिगुणांचें कथन । करूनि अनुग्रहिले सज्जन । तेचि वाचा धन्य धन्य । म्हणे विचक्षण परीक्षिति ॥४५॥अपर वाचा ते कुत्सित । निन्दादोषपंकें लिप्त । जगाचें उपसी नरकमूत । धिग् धिग् पतित वक्तृत्व तें ॥४६॥धन्य धन्य तेचि कर । जे कां हरिभजनीं सादर । अनलस्यें निरंतर । करिती व्यापार भक्तीचा ॥४७॥चळा अचळा हरीच्या मूर्ति । जिये क्षिती तयांची वसती । तेथ मंदिरें निर्माण करिती । सप्रेम स्वहस्तीं संतोषें ॥४८॥किंवा आयतीं सम्मार्जून । टाकिती उत्कर विसर्जून । रंगवल्ली रेखिती पूर्ण । परम धन्य ते हस्त ॥४९॥पादार्चनीं उद्वर्तनीं । अर्ध्यपाद्याद्युपचारदानीं । स्रक्चंददनपुष्पार्पणीं । विलसती पाणी ते धन्य ॥५०॥विप्र प्राज्ञ अथवा गुरु । यांच्या दास्यीं जे तत्परु । यथाशक्ति परोपकारु । करिती ते कर धन्यतम ॥५१॥जे श्रान्तांचे श्रम परिहारिती । याचकाभीष्ट अवंचक देती । भीता अभयप्रद जे होती । धन्य त्रिजगतीं ते हस्त ॥५२॥जे पद तुळसीवृंदावना । कीं जे हरि गुरु वसत्या सदना । सत्क्षेत्रात्मक पुरपट्टना । प्रदक्षिणा करिताती ॥५३॥कीं चालतां तीर्थाटनीं । हरिकीर्तनीं गमनागमनीं । सद्यज्ञाच्या अवभृथस्नानीं । करिती धांवणी ते धन्य ॥५४॥अनाथाचिया रक्षणा । धांवूनि पावती तत्क्षणा । क्षुधिता तृषिता अन्नजीवना । सादर दाना पद चलती ॥५५॥धन्य धन्य तेचि पद । याहूनिही जे सुकृतप्रद । पदोपदीं पाहूनि विशद । जीवां दुःखद न होती जे ॥५६॥हरिभजनार्थ अधोद्वारें । जियें पवित्रें शौचाचारें । अस्पृष्ट कामादि दुर्विकारें । धन्यतरें म्हणिपती तीं ॥५७॥ऐसें पंचधा कर्मकरण । यातें प्रवर्तक जें कां मन । तेंही तेव्हांचि धन्य धन्य । संकल्पशून्य जैं होय ॥५८॥स्थावरजंगमीं ज्याचा वास । सर्वात्मक जो जगन्निवास । तदनुलक्षें भवभ्रमास । विसरे भेदास ग्रासूनी ॥५९॥जलावबोधें जलतरंग । भिन्न दिसतां भेदभंग । स्थावरजंगमात्मक जें जग । अभेद श्रीरंग जें जाणें ॥६०॥तयाचि बोधें हरिगुणश्रवण । सप्रेम करिती धन्य ते कर्ण । जेणें वेधे अंतःकरण । पुण्यपावन जिया कथा ॥६१॥हरिगुणकीर्तनश्रवणापुढें । कैवल्यसुखही ज्यां नावडे । प्रेमोन्मादें होती वेडे । धन्य निवाडे ते श्रोते ॥६२॥उवरितें जीं ज्ञानकरणें । धन्य होतीं ज्या आचरणें । जें नृप सांगे शुकाकारणें । सावध परिसणें तें श्रोतीं ॥६३॥शिरस्तु तस्योभयलिङ्गमानएत्तदेव यत्पश्यति तद्धि चक्षुः ।अङ्गानि विष्णोरथ तज्जनानां पादोदकं यानि भजन्ति नित्यम् ॥४॥स्थावरजंगमलिंगमात्र । व्यापक जो कां सर्वेश्वर । त्याते लक्षूनि निरहंकार । नमी तें शिर धन्यतम ॥६४॥याजुष नामक रौद्रीयसूक्तीं । वेदीं नमिल्या ज्या ज्या व्यक्ति । चराचरात्मक अभेदमूर्ति । एकात्मस्थिति लक्षूनि ॥६५॥तयाचि बोधें सचराचर । नमी लक्षूनि सर्वेश्वर । निरसूनि भेदात्मक अहंकार । तें धन्य शिर श्रुतिमान्य ॥६६॥म्हणाल करणत्व नाहीं शिरा । तरी येथ लक्षिलें अहंकारा । सर्वग लक्षूनि सर्वेश्वरा । सचराचरा नत जो कां ॥६७॥चक्षुरिन्द्रिय तेंचि धन्य । स्थावरजंगमीं हरि लक्षून । अभेदबोधें समसमान । विवर्तमान अनादरी ॥६८॥विद्याविनयसंपन्न विप्रीं । धेनुश्चपचश्वानसूकरीं । समदर्शीं ते पंडा खरी । पंडितांमाझारी प्रशंसिली ॥६९॥तस्माच्चराचरीं समदर्शन । लक्षिती ते धन्य नयन । विवर्तजनितभेदभान । अप्रमाण जिये दृष्टी ॥७०॥ लोकसंग्रहार्थ मात्र । प्रवृत्तिबोधें कर्मसूत्र । लक्षूनि होती कर्मतंत्र । येर्हवीं सन्मात्र स्वप्रसिद्ध ॥७१॥अविभक्तंच भूतेषु । विभक्तापरी जो परेशु । लक्षूनि भजती जे चक्षु । तेचि डोळसु मी मानीं ॥७२॥तैसेंचि धन्य त्वगिन्द्रिय । सचेताचेत प्रतिमाद्वय । लक्षूनि केवळ विष्णुमय । कवळी अद्वय जाणोनी ॥७३॥विष्णूचें कां वैष्णवाचें । पादोदक जें स्पर्शे साचें । तेंचि त्वगिन्द्रिय भाग्याचें । हरिभजनाचें फळ लाहे ॥७४॥विष्णुपदजल भागीरथी । तेथ गात्रें जीं निमज्जती । तेंवि धन्यतम होती । विष्णुभक्तधिकारें ॥७५॥भागीरथी एके प्रान्तीं । वैष्णवांची सर्वत्र गति । त्यांच्या पादोदकें जीं भिजती । तियें अंगें होतीं धन्यतमें ॥७६॥व्यापनशीळ जो कां विष्णु । वैष्णव तद्बोधें परिपूर्णु । विष्णुमयचि जग अभिन्नु । जाणोनि निमग्न जे होती ॥७७॥सर्व विष्णुमय जगत । ऐसा निश्चय ज्यांचा सत्य । तेचि यथार्थ विष्णुभक्त । पदजल पूत तयांचें ॥७८॥तेणें जीं जीं आंगें भिजती । तीं तीं धन्यतमें म्हणिजती । ऐसी दृढतर माझी मती । म्हणोनि विनती करितसें ॥७९॥विष्णुपादोद्भवा जाह्नवी । स्थूळबुद्धी तीर्थगौरवीं । विश्वतस्पात् इये नांवीं । जो गोसावी सर्वगत ॥८०॥त्यातें लक्षूनि भजती भक्त । ते सर्वत्र पदजलपूत । भेदभ्रमें भ्रमती भ्रान्त । अल्पज्ञ अभक्त एकदेशी ॥८१॥अभक्तांचिया तरणोपाया । पूर्णही तीर्थाटनादिचर्या । करिती धर्म स्थापावया । परि ते आर्या आर्यतम ॥८२॥असो त्वगिन्द्रिय जें कां धन्य । तें हें केलें निरूपण । यावरी रसना तेचि धन्य । प्रसादसेवनें संतृप्त ॥८३॥घ्राणही धन्यतम तेंचि । हरिपादार्पित श्रीतुळशीची । सौरभ्यता सेवूनि साची । लाहे सुखाची संतृप्ति ॥८४॥एवं करणसमुच्चय । सर्वदा विष्णुभजनमय । विलसे तोचि धन्य होय । हा अभिप्राय येथींचा ॥८५॥यालागीं श्रीकृष्णाचें चरित । मज निरूपा अतंद्रित । ऐसें शुकेंद्रा प्रार्थित । कौरवनाथ सप्रेमें ॥८६॥म्हणूनि शौनका नैमिषवनीं । सूत निरूपी सत्रसदनीं । तें परिसावें श्रोतृजनीं । सावध होऊनि क्षण एक ॥८७॥सूत उवाच - विष्णुरातेन सम्पृष्टो भगवान्बादरायणिः । वासुदेवे भगवति निमग्नहृदयोऽब्रवीत ॥५॥विष्णुभजनीं इंद्रियवृत्ति । सर्वही रतल्या सप्रेमभक्ति । यालागिं विष्णुरात परीक्षिति । व्यासादि म्हणती मुनिवर्य ॥८८॥तया विष्णुरातें नृपवरें । सम्यक बरविया प्रकारें । प्रश्न केला अत्यादरें । कथिला विस्तारें जो हा तुम्हां ॥८९॥ऐसिया प्रश्नें बादरायणि । पुसिला असतां सादरपणीं । मानसें निमग्न जाहला कृष्णीं । प्रेमा देखूनि भूपाचा ॥९०॥सप्रेम सादर मिळतां श्रोता । पूर्णानंदें न भरे वक्ता । तैं तो जाणिजे अवधा रिता । वृथा वक्तृता पैं त्याची ॥९१॥इक्षुदंडनिष्पीडना । काष्टयंत्रें करितां जाणा । कर्कश शब्द गोचर श्रवणा । तेंवि व्याख्याना जो बोधी ॥९२॥क्षूरसाची नेणे चवी । कर्कश भ्रमणें ध्वनी उपजवी । तैसा वक्ता निमग्न भवीं । श्रोत्या गोंवी जठरार्थ ॥९३॥तैसा वक्ता नव्हे शुक । श्रोत्या करूनि श्रवणोन्मुख । चाखवी बोधें चिदात्मसुख । परम पीयूष पूर्णत्वें ॥९४॥स्वयें निमग्न परमानंदीं । तन्मय करी जो संवादी । तो परीक्षितीच्या प्रश्नवादीं । हृदयारविन्दीं निवाला ॥९५॥ N/A References : N/A Last Updated : June 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP