मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७१ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ७१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ७१ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर दोर्भ्यां परिष्वज्य रमामलालयं मुकुंदगात्रं नृपतिर्हताशुभः ।लेभे परां निर्वृतिमश्रुलोचनो हृष्यत्तनुर्विस्मृतलोकविभ्रमः ॥२६॥दोर्भ्यां म्हणिजे दोहीं बाही । रमानिलय जें निर्मळ पाहीं । श्रीकृष्णहृदय तें आपुलें हृदयीं । धर्म लवलाहीं आलिंगी ॥३७॥कुरुवंशीं जो सार्वभौम । भविष्यमाण राजा धर्म । तेणें आलिंगूनि मुकुंदवर्ष्म । जाला निःसीम हुतशुभ ॥३८॥आयसा आलिंगी स्पर्शमणी । अशुभ काळिमा तेचि क्षणीं । सांडूनि निवडे स्वर्णपणीं । दिव्याभरणीं हेम जैसें ॥३९॥तेंवि कवळूनि मुकुंदगात्र । निष्पाप झाला युधिष्ठिर । सबाह्य परमानंद प्रचुर । नयनीं पाझर प्रेमाचे ॥२४०॥हषनिर्भर झाली तनु । तेणें रोमांचपुलकोद्गमन । आपादमस्तक स्वेदजीवन । विश्रांतिपवनें सकंप ॥४१॥श्वासविगत लागली काष्ठा । विस्मृत लौकिक विक्रम चेष्टा । बाणली कृष्णवैधैकनिष्ठा । अखिल कष्टां नष्टत्व ॥४२॥कृष्णालिंगनीं ऐसी दशा । धर्मा झाली कुरुनरेशा । त्यानंतरें भीम कैसा । भेटला ईशा तें ऐका ॥४३॥तं मातुलेयं परिरभ्य निर्वृतो भीमः स्मयन्प्रेमजवाकुलेंद्रियः ।यमौ किरीटी च सुहृत्तमं मुदा प्रवृद्धबाष्पाः परिरेभिरेऽच्युतम् ॥२७॥आपुल्या मातुळाचा पुत्र । कृष्ण परमात्मा त्रिजगन्मित्र । आलिंगूनि त्याचें गात्र । झाला चिन्मात्रमय भीम ॥४४॥प्रेमवेधें हरिली स्मृती । विराली देहभावाची ज्ञप्ति । आनंदजीवनें नेत्र ढळती । परम विश्रांती उपलब्ध ॥२४५॥लवण भेटतां स्वकारणा । विसरे आंगींच्या कठिनपणा । तेंवि करणां प्राणांसह अभिमाना । माजि चैतन्या नुरणूक ॥४६॥भीम भेटला ऐसिये परी । मग अर्जुनें आणि माद्रीकुमरीं । सोयरा जिवलग श्रीमुरारी । सप्रेमभरीं अलिंगिला ॥४७॥त्र्यंबकीं लागतां घन वांकुडी । गौतमीपात्र भरे तांतडी । तेंवि अष्टभावांची प्रवृद्ध प्रौढी । नेत्रीं अनुघडी सुख बाष्पा ॥४८॥अच्युतालिंगनें ऐसीं स्थिती । माद्रीकुमारांसी अर्जुनाप्रति । जालियावरी परिष्वंगरीती । कौरवपति अवधारीं ॥४९॥अर्जुनेन परिष्वक्तो यमाभ्यामभिवादितः । ब्राह्मण्येभ्यो नमस्कृत्य वृद्धेभ्यश्च यथाऽर्हतः ॥२८॥आधीं वंदूनि ब्राह्मणां । मग भेटावें कुरुनंदना । ऐंशिया क्रमाच्या लंघना । घडलें कृष्णा या साठीं ॥२५०॥पाण्डवांचा प्रेमोत्कर्ष । देखोनि कळवळिला जगदीश । धांवूनिं वंदितां धर्मास । तेणें परेश वरि धरिला ॥५१॥क्षेमालिंगनीं भेटतां धर्म । वयें आगळा जाणोनि भीम । कृष्णें करूं जातां प्रणाम । धरी तो वर्ष्म उचलूनी ॥५२॥भीमें आलिंगिला कृष्ण । अर्जुनें वंदितां श्रीकृष्णचरण । कृष्णें समयवस्क तो जाणून । क्षेमा कवळून सुखी केला ॥५३॥त्यानंतरें माद्रीपुत्रीं । श्रीकृष्णाचरण उत्तमगात्रीं । स्पर्शोनि बाष्पोदकें नेत्रीं । द्रवतां भूपात्रीं क्षाळिले ॥५४॥कृष्णं स्पर्शोनियां करतळें । अबघ्राळ केलीं उभयमौळें । मग वंदिलीं द्विजांचीं कुळें । त्यावरी नमिले कुरुवृद्ध ॥२५५॥प्रधान मंत्री अमात्य सचिव । नगरनागरिक महाजन सर्व । तिहीं वंदितां द्वारकाराव । सम्मान यथार्ह त्यां दिधला ॥५६॥त्यावरा राजे माण्डलिक । कृष्णदर्शनें पावले हरिख । नभिते झाले एकें एक । तो हा श्लोक अवधारा ॥५७॥मानिनो मानयामास कुरुसृंजयकैकयान् । सूतमागधगंधर्वान्बंदिनश्चोपमंत्रिणः ॥२९॥कुरुदेशींचे सामंत पृथक । सृंजय कैकय कोसल प्रमुख । उभे ठाकूनि कृष्णसम्मुख । दंडप्राय नमिताती ॥५८॥त्यांमाजि पूर्वीं वृद्धमान्य । त्यांतें तैसाचि सम्मान । देऊनियां जनार्दन । संतोषविता जाहला ॥५९॥पुढें सूत मागधबंदी । कौतुकें दर्शक जे विनोदी । एवं उपमंत्री इत्यादि । पाहोनि संधी स्तव करिती ॥२६०॥वंदूनि श्रीकृष्णाचे चरण । सूत मागध बंदिजन । विद्योपजीवी प्रशंसन । करिती सगुण प्रकटूनी ॥६१॥मुदंगशंखपटहवीणापणवगोमुखैः । ब्राह्मणाश्चारविंदाक्षं तुष्टुवुर्ननृतुर्जगुः ॥३०॥मुरजमंदल मृदंगजजाती । कंबु कल्याणरवें गर्जती । चर्मपिनद्धपटहपंक्ती । ढक्के दुंदुभि पणवादि ॥६२॥ब्रह्मविपंची रुद्रवीणा । शारदा वल्लकीवादनप्रवीणा । सप्तस्वरीं गायनरचना । सारमंडळें सुरतंत्री ॥६३॥मुखश्वासपूरित वाद्यें । तद्विद वाहूनि दाविती विद्ये । घंटा जेंगटें झल्लरी शब्दें । ताळ कांसोळ किंकिणिका ॥६४॥वदना स्पष्ट अष्टोधारी । वेणु वाजती सप्तस्वरीं । नटवे नटिनी नृत्यकारी । नृत्य करिती चपळांगीं ॥२६५॥सप्तस्वरीं गंधर्व गाती । किन्नर किन्नरी ताल धरिती । दिव्याप्सरी नृत्य करिती । रंग भरिती त्रौर्यत्रिक ॥६६॥सूत मागध बंदिजन । करिती वंषप्रशंसन । भाट बिरुदावळीचें पठन । करिती वदनीं दीर्घस्वरें ॥६७॥शांतिपाठ कल्याणसूक्तें । पढती द्विजवर्य वेदोक्तें । एक पढताती निरुक्तें । सांगोपांग वेंदांगें ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP