मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७१ वा| आरंभ अध्याय ७१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ७१ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णपरमात्मने नमः । अंतरबाह्याविवर्जिता । अंतरबाह्यद्योतकसत्ता । स्फुरणमात्रें चिद्विवर्ता । प्रतिपादकता पैं ज्याची ॥१॥तया सन्मया सद्गुरुराया । अनन्यभावें भजलों पायां । आरब्ध व्याख्यान चालवावया । प्रज्ञा सदया मज दीजे ॥२॥सप्ततितमीं नृपांची ग्लानी । दूतें कथिली चक्रपाणी । युधिष्ठिराच्या यज्ञायतनीं । जावें म्हणोनि मुनि वदला ॥३॥हें ऐकोनि उद्धवाप्रती । मंत्र पुसतां रुक्मिणीपती । तेणें उभयकार्यार्थ चित्तीं । निर्धारूनियां ठेविले ॥४॥ते येथ एकसप्ततितमीं । उभयकार्यार्थसाधनक्षमी । मंत्र कथिजेल तो सत्तमीं । श्रवण केला पाहिजे ॥५॥नारदाचें ऐकोनि वचन । इंद्रप्रस्था कृष्णागमन । देखोनि पाण्डवीं आनंदोन । उत्साह पूर्ण पैं केला ॥६॥राजसूयमिषें हरी । पाण्डवां धार्त्तराष्ट्रां माझारीं । कलह रचून भूभार उतरी । अधर्मकारी संहारुनी ॥७॥तेथ मखारंभॆं जरासंघ । गखान्तीं नाश पावेल चैद्य । भीमवचनें गान्धार क्षुब्ध । धरील विषाद कुळहंता ॥८॥इतुकी कथा एकसप्ततितमीं । राया कथील श्रीशुक स्वामी । ते परिसावया सज्जन तुम्हीं । अवधान दिधलें पाहिजे ॥९॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP