मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७१ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ७१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ७१ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर नरोष्ट्रगोमहिषखराश्वतर्यनः करेणुभिः परिजनवारयोषितः । स्वलंकृताः कटकुटिकंबलांबराद्युपस्करा ययुरधियुज्य सर्वतः ॥१६॥दासि किंकरी वारांगना । दिव्यनटिनी स्वर्गभूषणा । आरूढोनियां विविध याना । कृष्णाङ्गनानुगा ज्या ॥६२॥विविध यानांची ऐका रीती । एक नरयानीं शोभती । क्रमेळपृष्ठीं विराजती । एक वळघती बलीवर्दीं ॥६३॥महिशारूढा कित्येक दासी । शोभती खरयानें एकीसी । अश्वापासोनि खरींच्या कुसीं । जन्मल्या त्या अश्वतरी ॥६४॥कित्येक वाहिल्या तयांच्या पृष्ठीं । अपरा राजती हस्तिनीपाठीं । एक किंकरी बैसल्या शकटीं । धडधडाटीं पथ क्रमिती ॥१६५॥सालंकृता वसनाभरणीं । उशीरमूळिकादी विविध तृणीं । कठ निर्मिले तिंहींकरूनी । विविधा यानीं गुढारिल्या ॥६६॥आंत बैसल्या बाहिर दिसे । बाह्य जनांतें अंतस्थ न दिसे । कटकुटिकादि आवरणविशेषें । गुप्ता संवृता निजयानीं ॥६७॥कित्तेक कंबळजा तिपट । अंतर्धानीं योजिले स्पष्ट । कित्तेक सूक्ष्म वसनें धुवट । योजिल्या निघोंट जवनिका ॥६८॥सुरंगें विस्तीर्ण चित्रासनें । वसनाप्रकार बृहद्वितानें । विशाळ शिबिरें विविध वर्णे । शकटीं उष्ट्रीं गजपृष्ठी ॥६९॥कनकरत्नरजतपात्रें । ग्रंथितें नरनारींचीं वस्त्रें । सुगंध द्रव्यें चित्रविचित्रें । वोझीं अपरें चालविती ॥१७०॥प्राकारभित्ति जैशा सदनीं । तैशा वसनकंबळात्मका यानीं । कुंड्यात्मकीं शिबिरावरणीं । शकटीं वाहूनि चालवती ॥७१॥बळिष्ठ बळीवर्द जुंथिले शकटीं । सन्नद्ध बद्ध सज्जिले करटी । रथगजाश्वां झोडिती साठीं । चालती थाटीं अनुयायी ॥७२॥ऐसे कृष्णाचे अवरोध । कृष्णानुलक्षें सन्नद्भ बद्ध । विचित्रयानीं कथिले विविध । सेना साद्यंत अवधारा ॥७३॥बलं बृहद्ध्वजपटछत्रचामरैर्वरायुधाभरणकिरीटवर्मभिः ।दिवांशुभिस्तुमुलरवं बभौ रवेर्यथाऽर्णवः क्षुभिततिमिंगिलोर्मिभिः ॥१७॥प्राक् प्रत्यक् दक्षिणोत्तर । बृहत्सेनांचा विस्तार । रचूनि चालिला वीरभार । गमे सागर संक्षुब्ध ॥७४॥कनकदंडी पताकाछत्रें । मेघडंबरें आतपत्रें । रत्नजडितें कार्तस्वरें । कलशशिखरें लखलखिती ॥१७५॥गजादि वरयानीं यूथप । मुख्य जे जे सामंतभूप । चामरें तळपती या समीप । रत्नकल्प प्रकाशती ॥७६॥उत्तमोत्तमें शस्त्रें विविधें । ज्यांतें बोलुजे वरायुधें । सूर्यकिरणांच्या संबंधें । तेजें समुदें भारती ॥७७॥खङ्गमुष्टी रत्नखचिता । चर्मपृष्ठीं चन्द्रान्विता । भल्लफलकावली निशिता । तीक्ष्णीकृता कर्म्मारी ॥७८॥अश्वगजरथादि आभरणें । तीं लोपिती रविकिरणें । वीरा अंगींचें विविध लेणें । दिव्यभूषणें लखलखती ॥७९॥कुंडलें कटकें करमुद्रिका । विचित्र बाहुभूषणें देखा । मुक्ताफळादि अनेका । कंठमाळिका रत्नमया ॥१८०॥कटिप्रदेशी शस्त्रधारणें । चर्मनिर्मित कटिवेष्टणें । रत्नखचितें दिव्यसुवर्णें । बद्ध कृपाणयमदंष्टा ॥८१॥वज्रकिरीट लखलखिती । वर्मे कनकोदकीं झळकती । एवमादिकीं प्रतिबिंबती । प्रचंड किरण तरणीचे ॥८२॥त्यांमाजी दुंदुभीचे घनरव । विविध वाद्यें वाजती सर्व । तेणें तुंबळ चमूगौरव । क्षुब्धार्णवसम शोभे ॥८३॥तिमिंगिलादि यादोगणीं । क्षुब्ध तळपतां झळकती किरणीं । पाच वजेंद्र रत्नमणी । सलील चलनीं लखलखिती ॥८४॥तिमिंगळादि महाविशाळ । उल्लाळ्घेती जळचरमेळ । तेणें चंडोर्मिकल्लोळ । गमती केवळ दळश्रेणी ॥१८५॥ऊर्मींमागें धांवती ऊर्मी । जवीन सेना तैसी भूमी । सिंधुगर्जनान्यायें व्योमीं । कुंजरभेरी दणाणिती ॥८६॥एवं संक्षुब्ध सलिलराशी । बृहत्सेना भासे तैसी । यानंतर तो नारदासी । कृष्ण विसर्जी तें ऐका ॥८७॥अथो मुनिर्यदुपतिना सभाजितः प्रणम्य तं हृदि विदधद्विहायसा ।निशम्य तद्व्यवसितमाहृतार्हणो मुकुंदसंदर्शननिर्वृतेंद्रियः ॥१८॥यदुपती जो कां श्रीभगवान । तेणें नारद सभामान्य । अत्यादरें नमस्कारून । अंगीकारून तत्प्रणीत ॥८८॥निघता झाला इंद्रप्रस्था । उद्योग देखूनि मुनीच्या चित्ता । सर्वेन्द्रियीं आल्हादसरिता । हरिदर्शनें तुंबळली ॥८९॥नारदें घेऊनि हरिकृत पूजा । ऐकूनि व्यवसित मंत्रबीजा । हृदयीं चिंतूनि गरुडध्वजा । जाता झाला नभःपथें ॥१९०॥ऐसा विसर्जून नारद । राजदूतातें गोविन्द । आश्वासिता झाला विशद । तो अनुवाद अवधारा ॥९१॥राजदूतमुवाचेदं भगवान्प्रीणयन्गिरी । मां भैष्ट दूत भद्रं वो घातयिष्यामि मागधम् ॥१९॥अमृतापरिस मधुरोत्तरीं । राजदूतातें श्रीहरी । अश्वासोनि नाभीकारीं । म्हणे अवधारीं प्रतिवचन ॥९२॥जाय नृपांतें कथीं मात । मागधाचा मी करीन घात । तुम्हां कल्याण इत्थंभूत । झालों विमुक्त हें माना ॥९३॥भेऊं नका येथूनि आतां । मागध मारूनि तुम्हां समस्तां । मुक्त करीन ऐसी वार्ता । कथी दुःखिता नृपवर्गा ॥९४॥ऐसें बोलिला जगदीश्वर । ऐकूनि दूतासि आल्हाद थोर । म्हणे साधला शुभावसर । केला निर्धार हृत्कमळीं ॥१९५॥इत्युक्तः प्रस्थितो दूतो यथावदवदन्नृपान् । तेऽपि संदर्शनं शौरेः प्रत्यैक्षन्यन्मुमुक्षवः ॥२०॥ऐसा बोलिला असतां दूत । आज्ञा घेऊनि निघाला त्वरित । सर्व नृपांतें यथावृत्त । कथिलावृत्तान्त अभयाचा ॥९६॥दूतमुखें ते अभयवाणी । ऐकोनि भूभुज हरिदर्शनीं । सप्रेम उत्सुक अंतःकरणं । निजमोक्षणीं मुमुक्षु जे ॥९७॥प्रतीक्षा करिती त्या समयाची । मुक्तता होईल कैं आमुची । शांति करुनि मागधाची । आम्हां सुखाची हरिप्राप्ति ॥९८॥दूतवचनें उत्साहभरित । नृपति झाले ते समस्त । त्यावरी सेनेसीं श्रीकांत । लंघी पथ तें ऐका ॥९९॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP