मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६६ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ६६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय ६६ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर पौण्ड्रकोऽपि तदुद्योगमुपलभ्य महारथः । अक्षौहिणीभ्यां संयुक्तो निश्चक्राम पुराद्द्रुतम् ॥११॥आपण द्वारके धाडूनि दूत । कृष्णसंग्राम आणिला उदित । ऐसें देखोनि उद्योगवंत । झाला त्वरित पौण्ड्रक तो ॥७९॥रथियांमाजी महारथ । कारुष महावीर विख्यात । दोनी अक्षौहिणींसहित । समरा त्वरित निघाला ॥८०॥पुरापासूनि बाहेरी । द्वय अक्षोहिणी दळभारीं । निघाला विद्युल्लतेचे परी । प्रतापगजरीं वाद्यांच्या ॥८१॥छत्रें चामरें निशाणें । ध्वज पताका आतपत्राणें । महावीरांचीं आस्फोटनें । सिंहनाद किङ्काळिया ॥८२॥मदें मातले कुंजर । गर्जना करिती भयंकर । अश्वहेषितें परम क्रूर । करिती केकार रथनेमि ॥८३॥प्रतापें झणाणिल्या गजभेरी । अपरा क्रमेळपृष्ठीवरी । अश्वढक्के ठोकिती गजरीं । अम्बर रणतुरीं । कोंदलें ॥८४॥पणव टिविटिवीं तिडिमिडी । शृंगें बुरगें बांकें त्रिमोडी । शंख भेरी काहळा डफडीं । कडोविकडी मृदंग ॥८५॥ताळ घोळ चंग वीणा । वाजताती रणप्रवीणा । वीरश्रीद्योतक वाद्यें नाना । वाजतां सेना मातली ॥८६॥ग्रीष्मकाळींचे मेघ उठावे । तैसे वीर दाविती यावे । यंत्रध्वनींच्या भयानक रवें । कांपे आघवें भूचक्र ॥८७॥तस्य काशीपतिर्मित्रं पार्ष्णिग्राहोऽन्वयान्नृप । अक्षौहिणीभिस्तीसृभिरपश्यत्पौण्ड्रकं हरिः ॥१२॥प्रबळवाहिनीवेष्टित भंवती । कारुषें ठाकिली समरक्षिति । तयाचा मित्र काशीपति । तत्पक्षपातीं निघाला ॥८८॥तीन अक्षौहिणी दळ । काशीपतीचें महाप्रबळ । पृष्ठभागीं रक्षणशीळ । झाला केवळ पौण्ड्रक तो ॥८९॥द्व्यक्षौहिणी कारुषी सेना । तदर्ध काशिपतीची पृतना । एवं त्र्यक्षौहिणीगणना । एक व्याख्याना या करिती ॥९०॥एवं ऐसा वेष्टितचमू । पौण्ड्रकातें पुरुषोत्तमु । आयुधें आभरणेंही कृत्रिम । देखता झाला तें ऐका ॥९१॥शङ्खार्यसिगदाशार्ङ्गश्रीवत्साद्युपलक्षितम् । बिभ्राणं कौस्तुभमणिं वनमालाविभूषितम् ॥१३॥कौशेयवाससी पीते वसानं गरुडध्वजम् । अमूल्यमौल्याभरणं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥१४॥कृत्रिम शंख पाञ्चजन्य । अरि म्हणिजे सुदर्शन । नंदकनामा जो कृपाण । असि म्हणूनि बोलिला ॥९२॥शार्ङ्ग कोदंड कौमोदकी गदा । इत्यादि कृत्रिम वैष्णवायुधां । कौस्तुभ ललाम भृगूच्या पदा । मिरवी सर्वदा हृत्कमळीं ॥९३॥माळा आपाद वैजयंती । वनमाळादि चिह्नें समस्तीं । मंडित देखे कारुषाप्रति । स्वयें श्रीपति समरंगीं ॥९४॥कौशय परिधान पीताम्बर । उत्तरीय केला अपर । ध्वजीं रेखिला विनताकुमर । कुण्डलें मकराकृति घडणी ॥९५॥अमूल्य मोलागळीं आभरणें । मुकुट मुद्रिका करकंकणें । केयूराङ्गदें पदभूषणें । मेखळे खेवणें रत्नांचें ॥९६॥इत्यादि कृत्रिमाभरणायुधीं । पौण्ड्रकातें कैवल्यनिधि । सम्मुख देखोनियां युद्धीं । हांसे त्रिशुद्धि घनघोषें ॥९७॥दृष्ट्वा तमात्मनस्तुल्यवेषं कृत्रिममास्थितम् । यथा नटं रंगगतं विजहास भृशं हरिः ॥१५॥आपुली प्रतिभा जैसी अपर । तैसा कृत्रिम वेष समग्र । बाणला ऐशातें श्रीधर । देखोनि गंभीर हांसतसे ॥९८॥रंगामाजी यथासांग । नाटकी नटोनि दावी सोंग । विडम्ब आपणातुल्य अव्यंग । देखोनि श्रीरंग हास्य करी ॥९९॥ऐसा समरीं पौण्ड्रकाप्रति । आत्मतुल्य कृत्रिमाकृति । पाहोनि हांसिला श्रीपति । स्फुरिला निगुती मग शंख ॥१००॥पाञ्चजन्याची गर्जना । ऐकोनि क्षोभली पौण्ड्रकसेना । घ्या घ्या म्हणती हाणा हाणा । शस्त्रें खणखणा प्रेरिती ते ॥१॥कैसीं शस्त्रें कोणे रीती । अरिवर्ग हरीतें हाणिती । तें तूं ऐकें परीक्षिति । म्हणे सुमति शुक वक्ता ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP