मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १० वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय १० वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय १० वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर नमः परमकल्याण नमः परममंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः ॥३६॥नश्वर देहादि सौभाग्य पूर्ण । मूर्ख मानिती तें कल्याण । त्या देहासि येतां मरन । तैं अकल्याण अवघेंची ॥६॥तैसींच स्वर्गादि अनेक भुवनें । जोडतां कल्याण मानिजे मनें । तीं नासती काळकलनें । अकल्याणें ते काळीं ॥७॥परमकल्याण तुझे पाय । जेथ न रिघे काळभय । संबोधनार्थ नामधेय । परमकल्याण हें तुज साजे ॥८॥भेद तितुका अमंगळ । ज्यामाजीं अनेक विकल्पमळ । अभेद आत्मा तूं निर्मळ । परम मंगळ तुज नमो ॥९॥तुझा निवास चराचरीं । भूतभौतिकव्यक्तिमात्रीं । यालागीं वासुदेवनामोच्चारीं । तुज मुरारि नमितसों ॥४१०॥कामा प्रवेश नाहीं जेथें । निष्कामसुखाचें पूर्ण भरितें । अनुचंबळत नोहे रितें । नमूं शांतातें त्या तुज ॥११॥सांप्रत यदुकुळीं अवतार । घेतला उतरावया धराभार । तोचि तूं हा यदुप्रवर । नमस्कार यदुवर्या ॥१२॥ऐसें करूनि स्तवन नमन । आतां संबंधपरिज्ञान । व्हावया स्नेहाभिवर्धन । करिती कथन गुह्यक ॥१३॥अनुजानीहि नौ भूमंस्तवानुचरकिंकरौ । दर्शनं नौ भगवत ऋषेरासीदनुग्रहात् ॥३७॥आम्ही मणिग्रीव नलकूवर । तुझिया अनुचराचे किंकर । आपुले जाणूनि अभय कर । ओपीं सत्वर श्रीपते ॥१४॥भूमन् ऐसें संबोधन । करावयाचें हें कारण । जें तूं आत्मा अपरिच्छिन्न । अमल सर्वज्ञ स्वप्रकाश ॥४१५॥देशें काळें तुझें ज्ञान । आवरिलें न वचे जाण । कालत्रयीं सनातन । प्रकाशघन चिन्मूर्ति ॥१६॥यालागीं अनुचरकिंकर आम्ही । सर्व विदित हें तुजला स्वामी । काळाचिये ही अतिक्रमीं । न पडे भ्रमीं तव बोधें ॥१७॥रुद्र तुझा जो अनुचर । आम्ही तयाचें किंकर । कीं बिभीषणाग्रज कुबेर । आम्ही कुमार तयाचे ॥१८॥द्रविणपति गुह्यकपति । कुबेर उत्तरेचा दिक्पति । ज्यासि तुझी सप्रेम भक्ति । आम्ही संतति तयाची ॥१९॥नारद तुझा परम प्रिय । त्याच्या अनुग्रहें साधलें कार्य । देखिलासि तूं वृष्णिधुर्य । पुन्हा अनार्य हें न घडो ॥४२०॥देवर्षींच्य अनुग्रहेंकरून । तुझें आम्हांसी हें दर्शन । महाद्भाग्यें झालें जाण । दुष्टाचरण पुन्हा न घडो ॥२१॥कंटाळलेती दुष्टाचरणा । तरी काय आवडे तुमच्या मना । ऐसें पुससी जनार्दना । तरी ते प्रार्थना ऐकावी ॥२२॥वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायां हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः ।स्मृत्यां शिरस्तव निवासजगत्प्रणामे दृष्टिः सतां दर्शनेऽस्तु भवत्तनूनाम् ॥३८॥अनुचरकिंकरांलागीं आम्हां । इतुकें देईं मेघश्यामा । सर्वेंद्रियांचा अक्षयप्रेमा । असो जगदात्मा त्वत्पर ॥२३॥तुम्हीच प्रेमा धरा म्हणसी । तरी इतुकें इयेविशीं । जैसें वर्षल्या जीवनासी । दाही दिशीं विखुरतो ॥२४॥कीं पर्वताग्रींच्या धात्रीफळां । पतनें न घडे एकवळा । तैसा मानसा विषयव्याकुळा । न वचे लाविला अनुराग ॥४२५॥भजनमार्गीं सप्रेम करणें । प्रवर्तती हें तुमचें करणें । यावेगळें अंतःकरणें । अभिलाषणें आन नको ॥२६॥मयूर नाचे देखोनि घन । निम्न भूभागीं जीवन । ना तरी चंचरिकाचें गमन । पंकजवन लक्षूनी ॥२७॥बाळें वांचती स्तनपानें । जळें जीजे यादोगणें । तेंवि आमुचीं सप्रेमकरणें । तुझेनि भजनें तोषोत ॥२८॥ह्म्सालागीं मानसा गोड । सुगंधें पुरे षट्पदकोड । तेंवि तव प्रेमें सुरवाड । वाटो वाड मम करणा ॥२९॥कोणे करणीं कैसें भजन । म्हणसी तरी तें विज्ञापन । सेवेसी कीजेल त्या प्रमाण कृपावरदानें ओपिजे ॥४३०॥तव गुणकथनीं रंगो वाणी । प्रियकर तव कीर्ति हो श्रवणीं । परिचर्येच्या कर्मीं पाणि । चरण स्मरणीं मम रंगो ॥३१॥गोडी साखरेचिये अंगीं । तैसा जगद्रूप तूं जगीं । त्या जगत्प्रणामालागीं । उत्तमांगीं प्रेम असो ॥३२॥तुझ्या मूर्ति सचेतन । ज्ञानी योगी भगवज्जन । त्यांचें प्रियतम दर्शन । आम्हांलागून घडों दे ॥३३॥देव द्विज पतिव्रता । तीर्थें क्षेत्रें माता पिता । तुझ्या प्रतिमा चेताचेता । नेत्रीं तत्त्वतां रुचों दे ॥३४॥एवं तव कीर्तीचें श्रवण । तव गुणांचें संकीर्तन । तव चरणांचें नित्य स्मरण । पादसेवनपूर्वक ॥४३५॥हस्तीं घडो तवार्चन । दास्यरूप कर्माचरण । जगद्रूपी जगज्जीवन । सख्यनमन आत्मत्वें ॥३६॥व्यक्ताव्यक्त तुझिया तनु । पाहतां निरसोनि अभिमानु । घडो आत्मनिवेदनु । तुझिया चरणप्रसादें ॥३७॥एवं नवविध भजन आम्हां । वरें ओपीं पुरुषोत्तमा । यावेगळा आमुचा प्रेमा । भवसंभ्रमा न रमों दे ॥३८॥श्रीशुक उवाच - इत्थं संकेर्तितस्ताभ्यां भगवान् गोकुलेश्वरः ।दाम्ना चोलूखले बद्धः प्रहसन्नाह गुह्यकौ ॥३९॥शुक म्हणे कौरवमौळि । दांवें बांधिला जो कां उखळीं । लीलानाट्यें गोवळमेळीं । स्वयें गोकुळीं क्रीडतां ॥३९॥त्याकारणें त्या गुह्यकीं । नारदकृपेचे ओळखीं । स्तवनीं नमनीं करूनि सुखी । प्रेमोत्सुकीं प्रार्थिला ॥४४०॥नमनें स्तवनें संकीर्तनें । सप्रेमभक्ति अभ्यर्थनें । तोष पावोनि अंतःकरणें । हास्यवदनें हें बोले ॥४१॥श्रीभगवान् उवाच - ज्ञातं मम पुरैवैतदृषिणा करुणात्मना । यच्छ्रीमदांधयोर्वाग्भिर्विभ्रंशोऽनुग्रहः कृतः ॥४०॥षड्गुणांचा ऐश्वर्यराशि । श्रीभगवान तो गुह्यकांसी । म्हणे तुमच्या वृत्तांतासी । मी मानसीं जाणतसें ॥४२॥जैसें तुमचें विगर्हित । देखोनि नारद करुणावंत । पूर्वकृतानुग्रहार्थ । मदोपहत करावया ॥४३॥तुम्ही श्रीमदें मदांध दोन्ही । मद उतरावयालागूनी । दारिद्र्यांजन विवरूनि मनीं । तुमच्या नयनीं लेवविलें ॥४४॥त्याचें करावया पथ्य । स्थावरयोनि केली प्राप्त । दिव्य क्रमिल्या अब्दशत । रोग समस्त शमेल ॥४४५॥तेणें निर्मळ होईल दृष्टि । घडेल वासुदेवाची भेटी । पूर्वींच विदित मज हे गोठी । सर्वरहाटी समवेत ॥४६॥दिव्यशताब्दें भरलीं पूर्ण । झालें दुर्मदक्षालन । जाणोनि मुनीचें वरवचन । दिधलें दर्शन तुम्हांसी ॥४७॥तुझें दर्शन सर्व जनां । एथ होतसे जनार्दना । म्हणाल दुर्जनाचिया मना । सद्भावना कां नोहे ॥४८॥तरी अविद्यासुषुप्ति झांकी दृष्टि । तेणें दिसती स्वप्नसृष्टि । वास्तवबोधें न घडे भेटी । जंव न प्रकटी रवि नेत्रां ॥४९॥तेंवि अविद्यामायापटळें । झांकले आहेत ज्यांचे डोळे । गुरुभास्करें दृष्टि नुजळे । तंव त्यां न कळे मम महिमा ॥४५०॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP