मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १० वा| श्लोक ५ ते ७ अध्याय १० वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय १० वा - श्लोक ५ ते ७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५ ते ७ Translation - भाषांतर यदृच्छया च देवर्षिर्भगवांस्तत्र कौरव । अपश्यन्नारदो देवौ क्षीबाणौ समबुध्यत ॥५॥शुक ह्मणे गा कौरवपति । प्रथम प्रश्नाची निवृत्ति । मदोन्मत्तां गुह्यकांप्रति । कामभ्रांतीं अनुमजु ॥१३॥तंव अकस्मात नारदमुनि । दैवें आला ते काननीं । षड्गुणैश्वर्याची श्रेणि । ज्याचे वचनीं सुरसिद्ध ॥१४॥ब्रह्मवेत्ता विरागवंत । ब्रह्मावबोधें दृश्यीं रमत । वेदविहितीं अतंद्रित । तो महंत देवर्षि ॥११५॥भक्तांमाजीं अग्रगणी । नित्य निरत हरिकीर्तनीं । तानमानीं सामगानीं । चक्रपाणिप्रियकर ॥१६॥मदिरोन्मादें व्याकुळ । मन्मथमार्गणें विव्हळ । सुरतकर्दमें झाले समळ । नेत्रकमळ नुघडती ॥१७॥ऐसा नारद अकस्मात । तेथ पावला कृपावंत । तेणें देखिले मदोन्मत्त । दोघे सुत धनदाचे ॥१८॥देखोनि तयांच्या इंगिता । त्यांची पूर्वापर अवस्था । कळों सरली बुद्धिमंता । त्या महंता मुनिवर्या ॥१९॥चकारार्थें सुरकामिनी । त्याही मुनीनें देखिल्या नयनीं । पुढें वर्तली जैशी करणी । ते ऐकें श्रवणीं कुरुनाथा ॥१२०॥तं दृष्ट्वा व्रीडिता देव्यो विवस्त्राः शापशंकिताः । वासांसि पर्यधुः शीघ्रं विवस्त्रौ नैव गुह्यकौ ॥६॥काय तिहीं अनार्य केलें । किमर्थ मुनीनें शापिलें । ऐसें राया त्वां जें पुशिलें । तें परिशिलें पाहिजे ॥२१॥मुनीतें देखोनि स्वर्गांगना । गुह्यकांशीं क्रीडतां नग्ना । होऊनि अत्यंत लज्जायमाना । सवेग वसना वेढिती ॥२२॥मुनीचें मानूनि शापभय । सव्रीडिता दीनप्राय । देखोनि त्यांवरी मुनिवर्य । सहसा सदय न कोपे ॥२३॥परी ते उन्मत्त गुह्यक दोन्ही । नग्न निःशंक येतां मुनि । उभारल्या स्मरकेतनीं । पाहती नयनीं ओथरलें ॥२४॥कामच्छत्रें उभारिलीं । नेत्रकमळें ओथरलीं । ऐशी अवज्ञा मुनीची केली । नाहीं धरिली शंकाही ॥१२५॥नाहीं नमन अभ्युत्थान । नाहीं स्तवनादि सन्मान । न करिती वस्त्रेंही परिधान । शिश्नोत्थापन दाविती ॥२६॥ऐसें अयुक्त घडलें त्यांसी । द्विविध कथिली तुझी पुसी । कैसा नारद कोपला म्हणसी । त्या प्रश्नासि अवधारीं ॥२७॥तौ दृष्ट्वा मदिरामत्तौ श्रीमदांधौ सुरात्मजौ । तयोरनुग्रहार्थाय शापं दास्यन्निदं जगौ ॥७॥दोघे देखोनि मदिरामत्त । श्रीमदांध धनदसुत । शापामाजीं अनुग्रहार्थ । काय विवरित मुनिवर्य ॥२८॥जो विवरणरूप नारदगीत । पंधरा श्लोक शापें सहित । श्रोतीं होऊनि सावचित्त । तो वृत्तांत परिसिजे ॥२९॥विचार विवरूनि दिधला शाप । केंवि म्हणावा तो सकोप । शापें क्षाळिला उन्मादलेप । परम सकृप मुनिवर्य ॥१३०॥श्रीमदाची होय निवृत्ति । भगवद्दर्शनाची अलभ्य प्राप्ति । पुढें अभंग सप्रेमभक्ति । ऐशी युक्ति विवरिली ॥३१॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP