मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १० वा| श्लोक ११ ते १५ अध्याय १० वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय १० वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर देहः किमनदातुर्वा निषेक्तुर्मातुरेव वा । मातुः पितुर्वा बलिनः क्रेतुरग्नेः शुनोऽपि वा ॥११॥करितां देहाचा विचार । देह कोणाचा साचार । मी मी म्हणती मूख नर । देहप्रकार तो ऐका ॥७४॥गर्भकोशीं जो जननीच्या । वीर्यनिक्षेप करी साचा । तरी हा देह त्यापित्याचा । ठाव कैंचा अहंते ॥१७५॥परावियाचा कळल्यावरी । तादात्म्य मानूनि स्वैराचारी । भरोनि स्वहिता जो न विचारी । मूढ संसारीं तो प्राणी ॥७६॥नऊ मास वाढवूनियां जठरीं । जे स्तनरसें पोषण करी । पाहतां ऐशिये विचारीं । देह निर्धारीं मातेचा ॥७७॥जेणेंकरूनि कन्यादान । वृद्धि पावविले संतान । तरी तो मातामह कारण । देह म्हणून तयाचा ॥७८॥जेणें देऊनि अन्नदान । केलें देहाचें पोषण । तेव्हां त्याचाचि देह जाण । अन्नेंवीण तो कैंचा ॥७९॥अथवा बलिष्ठ धरूनि नेती । दास्यकर्मी विनियोजिती । देह पडला ज्यांचे हातीं । तो निश्चिती तयांचा ॥१८०॥देहमूल्यें जी विक्रीत घेतां । तेव्हां त्याचाचि तो तत्त्वतां । आणिकाची न चले सत्ता । वर्ते सर्वदा तदाज्ञा ॥८१॥अथवा पडे अग्निमुखीं । तरी हा अग्नीचा होय शेखीं । भक्षिजे श्वानशृगालादिकीं । म्हणती विवेकी त्यांचाही ॥८२॥एवं सर्वीं परी जाणिजे । देह काळानळाचें खाजें । श्रीमदांधा प्रकट नुमजे । विशयीं रंजे सुखलोभें ॥८३॥एवं साधारणं देहमव्यक्तप्रभावाप्ययम् । को विद्वानात्मसात्कृत्वा हन्ति जंतूनृतेऽसतः ॥१२॥अव्यक्त म्हणिजे अव्याकृत । तेथूनि देहाचा उद्भव अंत । त्या देहातें आत्मा म्हणत जंतु वधीत तल्लोभें ॥८४॥ऐसें नश्वर साधारण । देह आत्मत्वें मानून । कोण ज्ञानी जंतुहनन । मूर्खावांचून पैं करिती ॥१८५॥असत् म्हणिजे अनित्य देहे । तो मी म्हणोनि कवळी मोहें । ऐसा असज्जन जो आहे । आचरे तो हें दुष्कृत ॥८६॥एवं कथिला जो हा श्रीमद । त्याचा तरणोपाय विशद । स्वयें विचारी नारद । तो विनोद अवधारा ॥८७॥असतः श्रीमदांधस्य दारिद्र्यं परमांजनम् । आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते ॥१३॥असत् म्हणिजे देहात्ममानी । उन्मत्त श्रीमदें करूनी । झांपडी पडिलीसे लोचनीं । सन्मार्ग नयनीं दिसेना ॥८८॥तरी त्या श्रीमदाचीं तुटती मूळें । आणि सन्मार्गीं दृष्टि जेणें उजळे । स्वहितविचारीं उघडती डोळे । आत्मत्व कळे सर्वभूतीं ॥८९॥तें एक दारिद्र्य दिव्यांजन । जेणें सोज्वळ होती नयन । तया दिव्यौषधाचे गुण । विधिनंदन स्वयें वर्णी ॥१९०॥दिव्यांजन म्हणाल कैसें । पूर्वदैवेंचि प्राप्त असे । यत्नें धुतल्याही जें न नासे । गुणीं प्रकाशे बहुविधीं ॥९१॥त्या गुणाचें ऐका कथन । श्रीमद मुख्य जाय झडोन । आपणासमान प्राणि दीन । दरिद्री द्रवोन अवलोकी ॥९२॥म्हणाल दरिद्रियांच्या चित्ता । भूतमात्रीं आत्मसमता । कैसी बाणली सदयता । ते दृष्टांतामाजीं कळे ॥९३॥यथा कंटकविद्धांगो जंतोर्नेच्छति तां व्यथाम् । जीवसाम्यं गतो निंगैर्न तथाऽविद्धकंटकः ॥१४॥मार्गीं चालतां दरिद्री प्राणी । कांटा मोडला सवर्म चरणीं । तेणें दुःखीं म्लानता वदनीं । आली कणकणी सर्वांगा ॥९४॥लंगडा पायीं चालतां अटक । मुख वाळूनि कडू विख । तेणें मागों न शके भीक । जाकली भूक उपवासें ॥१९५॥ऐसा व्याकूळ जो कंटकें । लंगडितां तो इतरां देखे । आपण अनुभविल्यासारिखें । तो ओळखे परदुःख ॥९६॥कांटा देखोनि वांटेवरी । बुद्धिपूर्वक परता करी । म्हणे प्राणी कोणी तरी । व्यथा शरीरीं हे नपवो ॥९७॥अविद्धकंटक तैसा न म्हणे । चाले घालूनि पादत्राणें । कुंप झाडितां पोटीं न शिणे । कंटकाभेणें परदुःखें ॥९८॥जीव आपुला परावा । समान द्ररिद्रियासि होय ठावा । कंटकदृष्टांतें आघवा । बोध जाणावा दःखाचा ॥९९॥क्षुधेतृषेनें पीडितां प्राणी । दरिद्री द्रवे अंतःकरणीं । लज्जाशीतोष्णाची ग्लानि । वस्त्रावांचोनि ओळखे ॥२००॥पूर्वकर्माचा परिपाक । तेणें भोगितो एथ दुःख । पुन्हा नाचरे पातक । हा विवेक ते काळीं ॥१॥आपण दुःख नेदी कोणा । परांचें देखोनि जाकळी करुणा । द्रवोनि म्हणे नारायणा । हे यातना निवारीं ॥२॥ऐशी भूतमात्रीं आत्मोपमा दारिद्र्यांजनें हा प्रकटे महिमा । येणेंचि पावे मोक्षधामा । तोही गरिमा अवधारा ॥३॥चौं श्लोकीं तीं लक्षणें । नारद विवरी अंतःकरणें । भक्तीं विरक्तीं यांच्या श्रवणें । उमज धरणें स्वहिताचा ॥४॥दरिद्रो निरहंस्तंभो मुक्तः सर्वमदैरिह । कृच्छ्रं यदृच्छयाऽऽप्नोति तद्धि तस्य परं तपः ॥१५॥दारिद्र्यांजनें उतरे ताठा । अंगींचा अभिमान पळे मोठा । गर्व धरी जरी करंटा । तरी कोण पोटा मग घाली ॥२०५॥दरिद्रियासि गालिप्रदानें । देतां लागे क्षमा करणें । सहनशीलता येणें गुणें । आंगीं बाणे न साधितां ॥६॥दरिद्रियाची भिक्षाटणीं । नामस्मरणीं रंगे वाणी । न करितां प्रायश्चित्तश्रेणी । पापहानि सहजेंची ॥७॥निज घरीं मागतां भीक । आभिजात्यादि उतरे तुक । विपत्ति भोगितां निःशंक । शीलविवेक वसेना ॥८॥पात्रें वस्त्रें अन्नें सदनें । आचार चाले शीलाभिमानें । तें संभवे दारिद्र्यगुणें । उतरे तेणें शीलमद ॥९॥यथाकाळीं न मिळे अन्न । कधीं पूर्ण कधीं न्यून । कोरडें ओलें शिळें कदन्न । निर्बळ म्हणून निर्मद ॥२१०॥जरी देह झालें तरुणें । दरिद्री जर्जर अन्नाविणें । वयसा मद कैंचा तेणें । रूपें लावण्यें न शोभे ॥११॥दरिद्रियाच्या चौदा विद्या । सर्वांसि भासती अविद्या । कोणासी बोलतां स्वसंपदा । म्हणती मंदा न ओपीं ॥१२॥विद्या शिकोनि सभाग्य झाला । तेचि आणिकां बोधूं आला । ऐसा निंदितां मनीं खिजला । मद गळाला विद्येचा ॥१३॥दरिद्रियासि अवघेचि आप्त । होऊनि ठाकती अनाप्त । गोत्रज मुखातें न पाहत । संगातीत सहजेंची ॥१४॥सत्ता नाहीं दरिद्रिया । येणें ऐश्वर्यमदही गेला लया । एक्या श्रीमदेंचि हे प्राया । येती आया अष्टही ॥२१५॥ऐसा सर्वमदातीत । अनायासेंचि दरिद्री होत । कदापि नाचरे दुष्कृत । जोडे सुकृत सहजेंचि ॥१६॥पोटभरी न मिळे अन्न । तेंचि त्याचें चांद्रायण । कैं भोजन कैं लंघन । धारण पारण हें त्याचें ॥१७॥वस्त्रावीण सक्लेश काया । शीतोष्णपर्जन्य । साहणें तया । हेचि त्याची तपश्चर्या । अन्य कार्या मुनि बोले ॥१८॥नेणे अभ्यंग उद्वर्तन । सुमनें सुगंध अनुलेपन । कैंचें तांबूलादि चर्वण । व्रतधारण हें त्याचें ॥१९॥प्राणि झालिया निर्धन । तो न करितां इंद्रियदमन । आपेंआपचि होय जाण । विषयसेवन न घडतां ॥२२०॥थुंके निर्धना देखोनि वनिता । तेथ कैंची परावी कांता । दीनवदनें कारुण्य करितां । माता ताता जग मानी ॥२१॥सर्वां आळवी मंजुळ शब्दीं । द्वेष कोणाशीं न धरीं कधीं । दारिद्र्यांजनें विशुद्ध बुद्धि । साधनसिद्धि पाववी ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP