संताजी तेली जगनाडे ( चाकणकर )

संतांची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात.


संताजी तेली जगनाडे ( चाकणकर )
यांचा काळ अंदाजे इ. स. १६५० ते १७०८ असा मानला जातो. हे साक्षात्कारी संत, थोर भक्त किंवा तुकोबांचे टाळकरी वगैरे असण्यापेक्षा तुकोबांच्या चरित्राच्या संदर्भात यांचे कार्य एक ऐतिहासिक पुरावा म्हणून उपयुक्त ठरते. बी. सी. बेन्द्रे यांनी ‘ तुकारामांचे संतसांगाती ’ या ग्रंथात यांच्यावर उद्बोधक आनि उपोद्बलक लेखन केले आहे. तुकोबाच्या अभंगाचे संग्रहाक म्हणून त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. जनगाडे कुटुंबीयांच्या अभंगांच्या वह्यात हे मूळचे ता. मावाळ, जि. पुणे मधील ‘ चाकण ’ या गावचे असल्याचा उल्लेख सापडतो. त्यांची समाधी देहूजवळील भंडार्‍याच्या डोंगराच्या पायथ्याजवळील सुदुंबरे या गावी आहे. तुकारामांचे पणतू गोपाळबाबा यांनी तुकारामांच्या निर्वाण परसंगी संताची जगनाडे उपस्थित असल्याचे म्हटले आहे. अनेक संशोधक यांना तुकोबांचे शिष्य मानतात. परंतु बी. सी. बेन्द्रे संताजीचा काळ इ. स. १६५० च्या मागे तुकोबांच्या टाळकर्‍यांत आणि शिष्यांत यांचा कालदृष्ट्या समावेश होऊ शकत नाही. कारण त्यांचा जन्म तुकोबांच्या निर्वाणा आधी ३/४ वर्षे अगोदर झालेल्या आहे, असे बा. सी. बेन्द्रे म्हणतात.
परशुराम तात्या पडवळ यांनी मुंबई येथे १८९६ साली प्रसिद्ध केलेल्या तुकाराम महाराजांच्या गाथ्यात संताजीचे घाण्याचे १५ अभंग छापले आहेत. ( क्र. ३९५१-३९६६ ) परंतु हे अभंग तुकोबा वा संतोबा यापैकी कोणाचेच नसून ते क्षेपक आहेत असे बेन्द्रे म्हणतात. संतोबांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे तुकोबांच्या अभंगांचा त्यांनी केलेला संग्रह. त्यात त्यांचे पुत्र बाळाजी व नातू भागोजी यांनी भर घातली. विशेष म्हणजे जगनाडे वह्यांतील तुकारामांच्या अभंगांची संहिता ही आज उपलब्ध असलेल्या संहितांत सर्वात जुनी मानली जाते.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-08T10:38:22.2230000