मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| प्रसंग ११ प्रासंगिक कविता प्रसंग १ प्रसंग २ प्रसंग ३ प्रसंग ४ प्रसंग ५ प्रसंग ६ प्रसंग ७ प्रसंग ८ प्रसंग ९ प्रसंग १० प्रसंग ११ प्रासंगिक कविता - प्रसंग ११ समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत. Tags : hindipadramdassamarthपदरामदाससमर्थहिन्दी प्रसंग ११ Translation - भाषांतर ( शके १६०३ मध्यें श्रीसमर्थांनीं आपला अवतार संपविल्यानंतर तीन दिवसांनीं भीमस्वामी तंजावरकर सज्जनगडावर येऊन पोंचले आणि दर्शन झालें नाहीं म्हणून निग्रह करून बसले. तेव्हां समर्थांनीं समाधींतून प्रगट होऊन त्यांस दर्शन दिलें व पुढील अभंग सांगितला. हल्लीं श्री समाधीवर मधोमध जी चीर पडलेली दिसते ती याच वेळची होय, अशी आख्यायिका प्रचलित आहे. ) माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें ।ऐका स्वहित उतरें । सांगईन ॥१॥राहा देहाच्या विसरें । वर्तों नका वाइट बरें ।तेणें भक्तिमुक्तीचीं द्वारें । चोजवतीं ॥२॥नका करूं वटवट । पाहा माझा ग्रंथपट ।तेणें सायुज्यतेची वाट । ठाईं पडे ॥३॥बुद्धि करावी स्वाधीन । मग हें मजूर आहे मन ।हेंचि करावें साधन । दास म्हणे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP