रघुनाथस्वामींचा कटिबंध
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
महाराज रघुविरस्वामी सद्गुरु निजवदनीं गावे ॥धृ॥
गंगातट अतिनिकट वसुनि । बहु प्रगट नसुनि । जगीं गुप्त आसुनि । एकांतीं बसुनि । बहुकाळ घातला । ठउक नसतां मात कुणाला । वसवुनिया वहुसाल वनाला । कंटाळुनि मनिं दारधनाला । शुकसनकादिक उपमा ज्याला । अवलंबुनि बहु उपवासाला । सहजरितीं मग आटा दिसाला । कालवुनी जळीं मुष्टिपिठाला । गोडी कांहीं नसतां त्याला । प्राशन करितां मिष्टमिष्ट बहु । इष्ट म्हणुनि संतुष्ट असावें । वृक्षाचे तळिं नित्य बसावें । सांगाती कोणींच नसावें । वैराग्यें शरिरासि कसावें ।
ग्रामाभीतरि कदा न यावें । शीतउष्णपर्जन्य सहावें । वैर्यासम शरिरासि पहावें । विषयभोगसौख्यासि रुसावें । सुखदु:ख समसमान पहावें । संशय मनिचे समुळ खणावे । आत्मानात्म विचारित जावें । योगबळें निद्रेसि निजावें । याचिपरि वैराग्य करुनि । मनिं त्याग धरुनि । चाळिस वर्षें गेलीं सहज स्वभावें । महाराज ॥१॥
मार्गीं जातां सहज रितीनें । आकाशगमनीं उर्ध्वगतीनें । आत्मस्वरूप निश्चित मतीनें । गंगेच्या परतीरास जावें । वसलें असतां असन उडावें । तेथिल तेथें गुप्तचि व्हावें । दुसर्यासी बहुतेज दिसावें । क्षणामधि काशीप्रति जावें । ऐसें तेथें सतत असावें । कचेश्वराचे संन्निध आपण । गेले असतां विप्र तयास्थळीं । अनुष्ठान करणारे होते । तयाचिया स्वप्नांतरि येऊनि । सांगतसे शिवरघुनाथ हा । ऐष असे मम त्याप्रती तुह्मी । शरण रिघुनिया अनिष्ट जाउनि । इष्ट असेल ते मागुनि घ्यावें । अग ते ब्राह्मण तशाच रितिनें ॥ शरण आलिया मनोगतासम । प्राप्त झालिया जाते झाले । त्याचिपरि दुसर्यानें द्विजवर । सप्तशृंगिचे देवीपासुनि । येउनिया निज सांगतसे मज । स्वप्नांतरि अंबनें येउनि ॥ सांगितलें जें रघुनाथाचें । दर्शन घेता रोग हारले ॥ तव ह्मणवुनिया चरणाचे सन्निधा येता झालों ऐसें ॥ त्या उपरांतिक शितज्वर ॥ शतिरासि पातले । दर्शनासि जन येतांना कंथेत घातलें ॥ वामभागी उचलून ठेविता । कथा मग तटतटा उडाली । असो याचिपरि चमत्कार झाले । ते आतां कोठवरी वर्णावे ॥२॥
भरला पुण्याचा सागर । कीर्ति झाली पृथ्वीवर ॥ धावुनि येती नारीनर । पाया पडती वारंवार ॥ ह्मणती धन्य धन्य गुरुस्वामी । अनाथ दुर्बळ पापी आक्षी ॥ भुललों भवपाशाचे भ्रमी । होऊनि विषयामाजिल कृमी ॥ झालों संसारामधि श्रमी । आह्मासि तारक व्हावें स्वामी ॥ ऐसें ह्मणोनि वारंवार । सांडुनि प्रापंचिक वेव्हार ॥ त्यजिला बहुता नि:संसार । घालुनि चरणावरुते भार ॥ ह्मणती न्यावे जी भवपार । ऐकुनिया त्याचे वचनाला ॥ तत्वबोध बहुताला केला । त्याचा भवभ्रम विलया गेला ॥ देहभाव समुळ विराला। अनुभव ते वदती अपुलाला ॥ धन्य धन्य आह्मी नीराकार । संगातित अह्मि आकाशवत ॥ सर्वांतर व्यापक असंग आद्वय ॥ अनादिशप्ती असे परपार ॥ नसे आमुचे स्वरूपाचा । याचिपरी बहुतांनीं बोलुनी ॥ आत्मतत्व निजबोधें डोलुनि । स्वरुपीं तन्मय व्हावें ॥३॥
कलियूगाचे ठायीं जाण । दिधलें आत्मतत्व बहु देणें ॥ चुकलें जन्ममरण हें जेणें । नाहीं केलें येणें जाणें ॥ निराकारीं वस्तिसि पेणे । देऊनिया निज वस्तू लेणें ॥ नांदविले आपुलाले ठाईं । ऐसें देणें दिधलें पाही ॥ अभिमानाचा लेश न कांहीं ॥ अंतर्यामीं ज्याचे नाहीं ॥ सद्गुरु मी ऐसेंहि कांहीं । ज्याचे अंतरीं सहसा नाहीं ॥ सर्वांलागुनि स्पष्ट वदावें । आपुलाले सदनाप्रति जावें ॥ माझे सन्निध कोणिं न रहावें ॥ पाठीमागें कोणि न यावें ॥ ऐसें बोलुनिया निजभावें । शनै:शनै विपिनांतरिं जावें ॥ एकांती जाऊनि बसावें । निजतत्वातें मनिं गिवसावें ॥ सदाशिवाचे सिन्निध जावें । पिंडिवर पाणि घालावें । उभय हस्त पिंडिचे सन्निध । नेउनिया हळु मान तुकावुनि । मंजुळ शब्दें हळुहळु बोलुनि ॥ शिव शिव शिव शिव । निजवंदनानें गावें ॥४॥
कर्म अकर्मा विरहित असतां । कर्माचे स्थळीं बहूत आस्था ॥ भक्तीचें बहु कारण नसतां । देवाचें स्थळिं बहुत आस्था ॥ दाउनिया जगिं लोकसंग्रहा । साठीं आपण पूजित जावें ॥ पळभरि तेथें उगिच बसावें । गंगाजळ मग मरोनि घ्यावें ॥ शतै:शनै आपण चलावें । मार्गांतरिं जन बहु सद्भावें ॥ धावुनि येति चरणासन्निध । पाया पडती ॥ कितीक स्तुतिसंवादा करिती । तापत्रय वार्तेसि वदती ॥ धोत्रपात्रद्वय हस्तकिं असतां । ओले पडदनीं सहित त्यांचे ॥ मनोगतासम उभें असावें । झाल्यावरि मग मान तुकवुनि ॥ सहजगतीनें मठिके भीतरि । गेल्यावरि ते पाठीमागे ॥ थाट जगाचा कपाट उघडे । असतांना मग अफाट यावें ॥ तितुक्यासि बोलुनिया त्याचे । मनोगतासि निववुनिया ॥ मार्गस्थ करावें । लहानथोर समसमान सारे ॥ श्रीमंत आलिया त्याजप्रती जें । भाषण करणें तशापरीचें ॥ अनाथ दुर्बळ येइल त्यासि । ईष्ट असेल ते मिष्ट वदुनिया ॥ उभे असावें । तो बसलिया आपण बसावें ॥ ऐसी लीला कोठवरि वर्णावी बारे । दयाशांतिचे निजभांडारे ॥ फोडुनि जन निवविले सारे । इतुकें असतां कमळपत्रसम ॥ अलिप्त राहुनि । निरंजनातें नयनीं पाहुनि ॥ स्वरूपीं रमत असावें ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 25, 2016
TOP