प्रत्यय
निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.
आधीं सर्व गुरू पादीं लघु योजीं गुरूपदीं.
यथापूर्वक देशेसीं जनीं दीजे गुरूचि तें. ॥४१॥
ऐसा क्रम नियोजावा जो घडे सर्वही लघु.
प्रस्ताररीति हे ऐशी समजावी विचक्षणीं. ॥४२॥
नष्टाचा जो घडे अंक तदर्धार्धीं समीं लघु;
विषमीं योजिजे येक तदर्धार्धीं गुरू दिजे. ॥४३॥
पादपूर्णार्थ तू देयीं लागले ते गुरू लघू.
तदा नष्टक्रियासार्ध विधि साधे अनुक्रमें. ॥४४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP