प्रस्तावना
निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.
श्रीमद्दंतिमुखासि वंदन करूं सप्रेम चित्तें सदा;
ब्रह्मेशानसुरेंद्रमुख जपती सर्वार्थसिद्धिप्रदा.
जो भक्ताभयदानशौंड विलसे, विघ्नाद्रि भंगी पवी,
विद्यापद्मविकास पूर्ण करितां ध्याती कवी चिद्रवी. ॥१॥
देवी ब्रम्हकुमारिका, भगवती, वाणी, महारूपिणी,
विश्वीं विश्वपणें भरोनि नटली विश्वाद्य नारायणी,
हंसारूढ, सुधांशुसुंदरमुखी, शुक्लांबरालंकृता,
वीणापुस्तकधारिणी, सुखमयी म्यां वंदिली सर्वता. ॥२॥
ध्यातों सद्गुरुनाथनेत्रकमळा चिद्भानु हा शोभला,
ज्याचां रश्मिकृपाबळें तम हरे, वस्तू दिसे सोज्वळा;
तो अंतःकरणीं वसौनि वदनी हे सर्व शब्दावळी;
यासाठीं प्रगटे निरंजनमुखें सद्वृत्तमुक्तावली. ॥३॥
...........................................................................
केला हा उपकार, सर्वहि जगा दावोनि छंदावळी.
वेदच्छंद समूळ मूळ सकळां मंत्रासि जे बोलिले,
गायत्र्युष्णिगनुष्टुबादि बहुधा सूत्रक्रमें दाविले. ॥४॥
झाले वैदिक लौकिकात्मक असे ते छंद सर्वादिसे.
वेदीं वैदिक मंत्र मूळ सकळां मंत्रांसि आदी असे.
श्लोकीं लौकिकपद्यबंधरचना नाना कवींची गिरा
शोभे या वसुधातळीं जनमुखीं, सौख्यप्रदा, सुंदरा. ॥५॥
ऐका सांप्रत लौकिकक्रम असा उक्तादि षड्विशतीं
छंदीं वृत्त अपूर्व पूर्वऋषिनीं नानागणीं संस्कृतीं
केली पद्धति ते सुदेशवचनें जाणावया प्राकृता
छंदःशास्त्रविशारदें विरचिली संतोषदात्री सतां. ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP