धृति

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


कुसुमितलता.
गण - म, त, न, य, य, य.
यति - ५, ६, ७.
वृता योजीं, गा, म्म त न य य या अक्षरीं युक्तिमंता;
वृत्तांमध्यें हे कुसुमितलता मुख्य कांता वसंता.
चित्तातें देते प्रसुख निववी अंतरा चारुगंधा.
भूतीं, षट्काश्वीं यति भज, सखे; ना मिळे बुद्धिमंदा. ॥१४॥
कोकिला.
गण - न, न, र, र, र, र.
यति - १०, ८.
न न रजलधि अक्षरांनीं बरी योजिजे कोकिला.
निववि मधुरगगगानें यया सर्व भूमंडळा.
सुकुसुमितरसालभूषा असे श्री जशी कानना
विरति सधवसूसमेता प्रिया मानली सज्जनां. ॥१५॥
मल्लिका.
विबुधप्रिया
गण - र, स, ज, ज, भ, र.
रा स जा ज भ रा गणीं जरि गुंफिशी नव मल्लिका,
कंठगा विलसे, तदा कविमंडळीं दिससी निका.
हे वसंतविभूषणा सकळां जनांप्रति आवडे
सौरभें मन पूर्ण हे करि कोण वर्ण्य इचां पुढें ? ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP