अतिशक्करी

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


मालिनी.
गण - न, न, म, य, य.
यति - ८, ७.
न न म य य युता हे मालिनी रम्य योषा.
वसुहययतिमंता शोभते चारुवेषा.
जरि हित तुज वाटे संग ईचांगिकारीं
रमविल तव चित्ता साच सर्वां प्रकारीं. ॥१००॥
सुकेसरा.
गण - न, ज, भ, ज, र.
यति - ७, ८.
न ज भ ज रा युता रचिशि जैं सुकेसरा,
कवि तुजशीं तुलाचि नपवेल दूसरा.
यति हयअष्टकीं भजसि वृत्त रक्षुनी
तरि कविता घडे मधुरसाद्य या जनीं. ॥१॥
शशिकला.
गण - न, न, न, न, स.
यति - पादांतीं.
मनिनिकर.
गण - न, न, न, न, स.
यति - ७, ८.
द्विहय लघु, गुरु, शर, गण शसिकला
कुकविहृदयसरसिज करि विकला.
बुधजनमति अति रमविल रमणी.
वसुहययति तरि, मणिनिकर गणीं. ॥२॥
सहदळा.
गण - स, ज, न, न, स.
यति - ५, १०.
स ज ना न सीं शरदशयति सहदळा.
सुजना गणी परम सुखद कविकुळा.
भजसी इतें अविकळ तरि परपदीं
रमसी तसा हरिहरसुरवरविधी. ॥३॥
प्रभद्रक.
गण - न, ज, भ, ज, र.
न ज भ ज रा गणीं घडतसे भ्रपद्रक.
चतुरपणीं यथाविध रचोनि सम्यक
जगतितळीं करीं प्रकट सार सद्गिरा
रमवि मना जशी अखिल सत्कवीश्वरा. ॥४॥
कामक्रीडा.
गण - म, म, म, म, म.
पंध्रा वर्णी गुर्वंगी ते कामक्रीडा योजावी
ईचां भोगीं इच्छा तूतें, तैं तां माध्वी पाजावी.
नाना गोडा गोष्टी ईतें बोलोनीयां मोहावी.
वेश्या नारी चित्ता चोरी, माया ईची जाणावी. ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP