राग - भैरवी
चाल : रामसुमर राम तेरे

शेवटची एक विनंती ऐक देवराया ॥
शिणली बहुत आता ही मम काया ॥धृ॥
सोसवेना अधिक क्लेश दुबळ्या जीवा ॥
जाणतोसी सकल स्थिती दयाळु देवा ॥१॥
प्राणांत येईतो घडावी निरंतर सेवा ॥
हीच इच्छा असे मनीं पुरवावी देवा ॥२॥
आणिक नसे आशा कांहीं जाणसी भावा ॥
दासीला तुमच्या चरणीं ठाव झणी द्यावा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP