अभंग २
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - शंकरा
आज शुभदिनीं उल्हास हो हृदयीं ॥
प्रेमादरें वंदुनी ठेवी पदीं डोई ॥धृ॥
मंगल तुझें नाम गाया गीती ॥
प्रफुल्लीत हो मन आनंद अती ॥१॥
रोम रोम देहाचे प्रेमभरे फुलती ॥
गोड मधुर हे नाम भजना रंगविती ॥२॥
वेडी वाकुडी माझी अल्प ही सेवा ॥
गोड मानूनी घ्यावी श्री कृष्ण देवा ॥३॥
अज्ञ दासी ही विनवी प्रभुराया ॥
पूर्ण सफल करी या शुभ कार्या ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP