अभंग ५
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - भैरवी
चाल : “ राम सुमर नाम तेरे ”
सुचवी श्रीहरी जे विचार मम मनी ॥
तेची बोल निघती पद्यरूपे वदनी ॥धृ॥
कर्ता करविता असे तोची नारायण ॥
निमित्यासी पुढे करी ही अबला दीन ॥
मूढासी करी ज्ञानी कृपेने भगवान ॥
हरीकृपा झाल्यावरी कांही न उणे जाण ॥२॥
हरीची म्हणवीता त्यांसी अभिमान ॥
अनन्य भावे दासी करी कृष्णपदी नमन ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP