अभंग ७
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - पहाडी
चाल : ‘ आधी बीज एकले ’
किती देवा तुझे नाम गोड गोड
गावया मज अती आवड ॥धृ॥
जन म्हणती लागले वेड ॥
रात्रंदिन करी बडबड ॥१॥
तुझ्या भजनाचे लागले वेड ॥
नाही मनी उरली कोणाची भीड ॥२॥
दासी गुण गाण्याची आवड ॥
कुणी निंदा वंदा त्याची नसे चाड ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP