अभंग ५
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - सारंग
भाग्य माझे उदया आले ॥
वाटे जिवन धन्य झाले ॥धृ॥
निर्मोही सत्गुणी सद्गुरु लाभले ॥
वेळोवेळी गुरूनी बोधामृत पाजिले ॥१॥
त्यायोगे अंतरी निर्मळ मन झाले ॥
हृदयांतील आत्मदेव मग उमगले ॥२॥
आंत बाहेरी एकच रूप कोंदले ॥
दासीने कृष्णमूर्तीसी प्रेमे वंदिले ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP