अभंग १२
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - केदार
पाहुनिया सुंदर राम पंचायतना ॥
प्रेमादरे करिते साष्टांग नमना ॥धृ॥
आजी आनंद वाटे जीवा ॥
घडली श्रीराम प्रभुची सेवा ॥१॥
हृदयीच्या उत्कंठ भक्तिभावा ॥
जाणतोसी पूर्ण राम राया ॥२॥
तूं आमुचा मायबाप देवा ॥
सानथोरावरी कृपादृष्टी ठेवा ॥३॥
ही भोळी भाविक अल्प सेवा ॥
दासी म्हणे गोड मानुनी घ्यावी देवा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP