अभंग ११
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांड
चाल : साधारण ‘ संशय का ’
रूप तुझें सुंदर विठ्ठला ॥
नाम तुझें मधुर विठ्ठला ॥धृ॥
ऐकुनी भजन सुस्वर विठ्ठला ॥
आनंदले मनी अनिवार विठ्ठला ॥१॥
तुझे भजनी आवड फार विठ्ठला ॥
वाटे जिवा अती सुखकर विठ्ठला ॥२॥
सर्वस्वाचा पाडी विसर विठ्ठला ॥
तूंची एक मज आधार विठ्ठल ॥३॥
विठ्ठल विठ्ठल हरिहर विठ्ठला ॥
दासीचा तूंची सर्वेश्वर विठ्ठला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP