अभंग १०
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांड
गोपाळा मुरलीधरा अच्युतां माधवा ॥
श्रीधरा मेघश्यामा मोहना केशवा ॥धृ॥
गोविंदा यदुभुषणा मुकुंदा जनार्दना ॥
नारायणा मधुसूदना देवकीनंदना ॥१॥
कमलवदन कमलाक्षा जगत्जीवना ॥
मनमोहना मनहरणा गोपीरमणा ॥२॥
अज्ञमती किती वर्णेल तुझ्या अनंत नामा ॥
दासीचें प्रेमादरें नमन तुम्हा पुरुषोत्तमा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP