प्रसंग चवदावा - देवतांस सामर्थ्य नाहीं

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


देवतां असत्‍या सामर्थ्यपणें । तर तोंडावर कां मुतती श्र्वानें । प्रसिद्ध देखोनि झकलीं अज्ञानें । कनिष्‍ठ भजन करिती ॥७३॥
देवतांवरी श्र्वानें मुतती । म्‍हणती आम्‍हांस दाविली प्रचीति । मनुष्‍याचें श्र्वान केलें सती । भजोनि तुम्‍हांलागीं ॥७४॥
श्र्वानाहि परीस वोळखा खुणें । मनुष्‍य हीन सांडवलें ज्ञानें । देखोवेखीं करीतसे भ्रमणें । जाणीव कथितां ॥७५॥
कोणी म्‍हणती देवांच्या केल्‍या चेष्‍टा । तरी हे सिद्धसाक्षे वचनीं चतुष्‍टा । वावग्‍या कथिता खटपटा । महा पातकें जोडतील ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP