मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग चवदावा| मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार प्रसंग चवदावा प्रशस्ति अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण ज्ञात्याचा समभाव निवाडा देवता निखंदन मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार देवतांस सामर्थ्य नाहीं धातु पाषाणाच्या प्रतिमा शेख महंमद शब्दांवर टीका अंधप्रकाश दृष्टांत शिंदळा भजक देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ प्रसंग समाप्ति प्रसंग चवदावा - मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार Translation - भाषांतर पुण्य आचरण न ये मुरळ्यांच्या चित्ता। त्याच्या होतील कांता । त्यांचा हात भाळास लावितां । कोण तरला सांग बा ॥५५॥भाळ बाडगी पुढें ओढवी । म्हणे तूं आपुल्या हातें लावी । मुरळी डोळे घालूनि खुणावी । त्या मुरळ्यालागुनी ॥५६॥जे आपल्या कुळस्वामीची मुरळी । तिसी कैसे खेळती ढवाळी । ऐसी कलियुगीं प्रभावळी । पापाची वर्ततसे ॥५७॥मुरळ्या कुळस्वामिच्या दासी । त्यांसी रमता कंटाळेत ना अपेशी । मल्हारी न करीच कांही त्यांसी कां सत्वें सांडवला ॥५८॥कुळ कन्येस बोल लाविला मल्हारीनें । ऐसें विटंबिलें त्याच्या देवपणें । तो पुजिल्या केंवी तुटली बंधनें । लक्ष चौर्यांशीचीं ॥५९॥पां ईश्र्वरें मागितलें श्रियाळा । तेणें भोजना वधिलें चिलिया बाळा । मागुतें उठविलें बा तातवेळा । कांतेसहित उद्धरिलें ॥६०॥ऐसें ज्याचें बालक घ्यावें । त्यांस पूर्वजांसहित मोक्षास न्यावें । नाहीं तरी कां सुफळ निर्फळ करावें । देव म्हणवूनियां ॥६१॥मल्लिकार्जुनाचा देखोनि भाव । आले कैलासीचे राव । चरण जाळूनि तत्त्वीं ठेविला जीव । पंक्तीस बैसविला ॥६२॥अज्ञ ससाणा इंद्र कपोता । चक्रवर्तीचा भाव पाहाती तत्त्वतां । मांऊसें तुकाविलें होऊनि मागुता । प्रसन्न जालें छेदितां शिर ॥६३॥तैसेचि कर्णास रणभितरीं । बाण खडतरले तळमळ करी । विप्रवेषें मागता श्रीहरि । आदरें दंत पडतां प्रसन्न जाला ॥६४॥सुदाम्याचे मुष्टि पोहे घेऊन । शीघ्र सुदामपुरी दिधली गहन । ऐसी उदारीव नाहीं देवतांलागून । लेकुरें मागोन बुडविती ॥६५॥तैसा नव्हे भक्तवत्सल गोपाळ । अंबॠषीचें गर्भ तत्काळ । चुकवूनि केला तो प्रबळ । भक्तांचा महिमा वाढवी ॥६६॥ऐका नामरत्नमाळेमाझारी । श्रीमुखें भक्तांचें स्तवन करी । हरि उणें पडों नेदी अद्यापवरी । नामा संत लडिवाळ म्हणोनियां ॥६७॥गीता भागवती वनमाळी । वाखाणी भक्तांची ब्रीदावळी । म्हणे भक्त माझी निज रांगोळी । स्वहृदयीं जपत असे ॥६८॥ऐसें सांडोनियां श्रीपति । लेकीस करिती मुरळी भूती । कुमारांस श्र्वानें करुनी भुंकविती । मनुष्य असतां ॥६९॥हळदी भंडार विकी वाणी । तैसी देवतांनीं केली झकवणी । जेथून साकारल्या खाणीवाणी । त्यास भंडार बोलिजे ॥७०॥वाणी ईश्र्वराविण नाहीं तत्त्वतां । जेथें इच्छिल्या केण्या नाहीं न्यूनता । हळदी मागोनि देवविती देवता । भंडार म्हणोनियां ॥७१॥कर्मचांडाळा वर्जाया अहर्निशी । अनेक पापांच्या करुनी राशी । नामसाठी उद्धरण दिधलें त्यांसी । देवाधिदेवें ॥७२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP