मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग चवदावा| अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण प्रसंग चवदावा प्रशस्ति अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण ज्ञात्याचा समभाव निवाडा देवता निखंदन मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार देवतांस सामर्थ्य नाहीं धातु पाषाणाच्या प्रतिमा शेख महंमद शब्दांवर टीका अंधप्रकाश दृष्टांत शिंदळा भजक देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ प्रसंग समाप्ति प्रसंग चवदावा - अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण Translation - भाषांतर बिबवा ठेंचिल्या शेलिया उपरी । तो साबणें न निघे अद्यापवरी । तैसा हा गर्व मीपण लवकरी । ज्ञातियाला बाधी ॥४॥उदें धुपविलें रांजणभर पाणी । तिळ एक हिंग पडतां सुटली घाणी । तैसें द्वैत मीपण अवलक्षणी । वागवूं नये चित्तीं ॥५॥पुंगोळ फिरे पाहुणा शकुनधडी । ढक्का लागतांच तो घाण सोडी । थुंकोनियां केरसुणीनें बाहेर झाडी । शूद्री रांगें पेटोनियां ॥६॥अधम ज्ञाता जाणे धडपडे । कुबुद्धिं पडल्या तो चरफडे । जन फटमर म्हणतां हूर पडे । हीन यातीस पडलियां ॥७॥तैसा आत्मज्ञाता जाणे आम धडे । क्रोध मीपण ढक्क्यानें तो चरफडे । जन फटमर म्हणतां हुरपडे । हीन याति वाहूं नेणें ॥८॥मी एक जाणता जन मूर्ख वेडें । हें जेथें उमटों लागे वाडेकोडें । तेथून आत्मज्ञान धडफुडे । पळोनियां जाय ॥९॥पहा समुद्र पूर्णत्वें भरला । परी तो न उल्लंघी मर्यादेला । तैसाच ज्ञाता पाहिजे वर्तला । रंकांमध्यें रंकपणें ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP