प्रसंग बारावा - पूजनोपासनीं चित्तचांचल्यता
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
घडिक पुजितसे आसरा । घडिक शरण रिघे महिषासुरा । चित्त चंचळपणें अवधारा । भ्रमिष्ट मूढाचें ॥५६॥
घडिक स्मरतसे मल्हारीराव । घडिक म्हणे हा नागोबा देव । घडिक म्हणे ब्रह्मा विष्णु शिव । तूंचि कुळस्वामी माझा ॥५७॥
घडिक पूजाया धांवे सुपली । म्हणे प्रीतीची मज आस लागली । सोनियाची पाहिजे घडविली । कळंत्री काढुनियां ॥५८॥
तुटकळ आला संचितानें । म्हणे मज भिकेस लाविलें तिनें । लोकांपें सांगे निर्लज्जपणें । निळीचें कुंड करूनिया ॥५९॥
म्हणे माझी पुरली न होती गोडी । म्हणोनि मरोनि लागली आवडी । तुज देव्हारां पूजीन मज सोडी । कृपा करूनियां ॥६०॥
सोनें रूपें म्हणती प्रत्यक्ष देव । ते घडोनि पूजी ठेवूनि तिचें नांवें । दुकाळ पडल्या म्हणती मोडून खावें । सुकाळी मागुतीं घडूं ॥६१॥
घडिक माठ्या म्हणवितसे आवडी । घेऊनि धर्मरायाची परडी । कळंकें फूर्मान म्हणे बंद सोडी । तुजविण आन नेणें मीं कांहीं ॥६२॥
घडिक तेंहि सांडोनियां आवरण । म्हणे मजला सटवाई प्रसन्न । झोंटी मोकळी घाली अवलक्षण । माथां शेंदूर भरोनियां ॥६३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP