प्रसंग बारावा - षड्‌दर्शनांतील द्वैत संचार-दृष्‍टांत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


यातियातीमध्यें वैराकार जाणा । जैसा पक्षीकुळांत जन्मला ससाणा । गोत्रज मारितसे उदरपोषणा । तैसे अज्ञानास जालें असे ॥१४॥
एक कावळा निवर्तल्‍याउपरी । अनेक वायसां आकांत परोपरी । ऐसा जो क्षमा दया शांति धरी । तो करुणानिधी बोलिजे ॥१५॥
सारसें विवसां मित्रपणें असती । रात्रीं येरून येरां देखों न शकती । तैसें एक आप्तपणें वर्तती । गोड कडू होऊनियां ॥१६॥
पहा पां मृग सांडोनि स्‍वयाति । लगलासे पारधियाचे संगती । फांसें वागवूनियां शिकलासे मति । गोत्रज वधावयाची ॥१७॥
पाषाणांत जन्मले पोलाद धन । पाथरवटासंगती फोडी पाषाण । तैसेंच त्‍या सामत्‍याचें लक्षण । तिख्या तिख्या मुरळीतसे ॥१८॥
हातोडा लोहतिख्याचा जाला । स्‍वयाती तिखयासी पिडों लागला । कुदळीआड खडकीं संचारला । तैसेंचि सितोळी सोहणें ॥१९॥
दांडा जन्मला तरुवरा शरिरीं । तो रिघे कुदळी कुर्‍हाडीभीतरी । वनस्‍थळभ्‍चा मूळ छेद करी । ऐसा अंगसंगें दावा ॥२०॥
पाषाणगोळा भांड्यामुखीं शिरें । दारुसंगें उडवी दुर्गाचे चिरे । तैसें दरुषनीं द्वैत संचरें । दावा धरूनियां ॥२१॥
हे दृष्‍टांत सांगावया काय कारण । मनुष्‍यदेह धरूनियां ऐसे अवगुण । एकाचे देहीं वर्ततील व्याहान । यातना भोगावयालागीं ॥२२॥
यालागीं मुळीं पडावी दृष्‍टी । तरी पाप कांहीं न दिसे सृष्‍टी । वाउगें बोलणें तें तोंडपिटी । उन्मत्तपणाची ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP