योगसंग्राम - प्रास्ताविक १
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदांचा ‘योगसंग्राम’ हा सुलभ, स्पष्ट व अगदी अनुभवाचे बोलींत पराविद्येचें ज्ञान देणारा ग्रंथ आहे. हिंदू अनुवंशिक चालचलणूक, आचार-विचारभेद, स्वार्थपरमार्थाच्या मिळवणीसाठीं पांडित्यपूर्ण मतमतांतील खंडनमंडनाचें बाद यांचा पगडा शेख महंमदांचे मनावर नसल्यानें त्यांचें हें पराविद्येच्या अभ्यासांतील ‘संग्राम’ चित्र जसें वास्तवतेचा बोध करतें तसेंच तें सामान्य माणसाला परामार्गातील आचारविचार बोधाच्या खुणा पटवून पराप्राप्तीच्या अभ्यासास उत्तेजित करते. केवळ पराविद्येच्या ध्येयसाधनेसाठी निष्कलंक, सरळ व शुद्ध हेतूनें केलेलें हें मार्गदर्शन मुमुक्षूंस साहाय्यक होईल यांत शंका नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP