मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|रूपके| हुंबरी. रूपके शेत कुळवाडी घोंगडें पिंगळा धेनु गोंधळ डांक वासुदेव पांगुळ स्वप्न हरिजागर कूट खेळिया बागुल हुंबरी. कुस्ती जातें रूपक - हुंबरी. संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेवरूपक हुंबरी. Translation - भाषांतर समस्त मिळोनि गोपाळीं । तया यमुनेच्या पाबळीं । कृष्णे मांडिली धुमाळी । कळंबा तळीं आनंद ॥१॥वळूनि कांबळ्या वेठी । त्याही बांधिल्या मणगटीं । विवाद मांडिला निकटी । धुर्जटी कान्होसी ॥२॥आतां कृष्णा कव्णे ठायीं । जासी तुजवरी आली डाई । आमची हमामा हुंबरी देईं । उभा राहें पैं कांगा ॥३॥कृष्ण म्हणे मी एकवटू । तुम्ही आम्ही गडी वाटूं । गोवळी घातलासे हाटू । अति निकटू कान्हुसी ॥४॥म्हणे बळीराम पहागा । बोल नव्हे तुम्हाजोगा । तुम्ही समर्थ श्रीरंगा । आम्हां कांगा भेटविसी ॥५॥ऐसा सकळीं मान केला । तेव्हां कृष्ण संतोषला । आनंद चित्तासी पावला । म्हणे भला भला नाम्या ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP