सात वारांचीं पदें - शनिवार
श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.
तुझिया वियोगें । घटका जती युगें । व्यर्थहो । नको होऊ उदासीन ॥
पायीं गुंतलें मन । जिणें नको पराधीन । हो दयाळा रामा येरे येरे हो ॥१॥
तप्त जाहली काया । तुजलागी भेटाया । येई तूं प्राणसखया । हो दयाळा० ॥२॥
आनंदा तारावें । रंका सांभाळावें । आतां निष्ठुर न व्हावें । हो दयाळा० ॥३॥
Last Updated : November 11, 2016
TOP