सात वारांचीं पदें - शुक्रवार
श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.
श्रीगुरुरामें दिधलें तें मज । तत्वमसि सांगोनिया गूज ॥१॥
स्वरूप पाहतां संशय तुटला । भवजलधि कैचा समूळीं आटला ॥
मी तूं हा शद्ब अवघाचि खुंटला । सबाहय ब्रंम्हानंदचि दाटला ॥२॥
हरिहर - ब्रम्हा शीणले ज्या ठायीं । विश्रांती घेती सांडोनी सर्वही ॥
रविचंद्राविण उदय ज्या ठायीं । द्वैताची वार्ता समूळीं जेथें नाहीं ॥३॥
आतां मी काय होऊं उतराई । न दिसे दुसरा पदार्थचि कांहीं ॥
यालागी मौल्य मस्तक गुरुपायीं । ठेवितां सुखी आनंद मुक्त देही ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP