सात वारांचीं पदें - रविवार
श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.
आजिचा दिवस आम्हां सोनियाचा । राघव कृपाळु आला सत्य वाश्चा ॥
देह - प्रीति जन - द्दष्टी टाकुनी वेगीं । जीविंचा जिवलग आत्माराम तो भोगी ॥आजिचा०॥१॥
आनंदें श्रीराम स्वामी गीती । नाचतां गर्जतां लाहू पुण्य - स्फूर्ती ॥२॥
भोक्ता भोग्य भोगणें जेथें त्रिपुटी नाहीं । आनंदमूर्ति सद्गुरुकृपें झाला विदेही ॥३॥
Last Updated : November 11, 2016
TOP