मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|तत्वविवेक प्रकरणम्| श्लोक २३ ते २६ तत्वविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते ९ श्लोक १० ते ११ श्लोक १२ ते १४ श्लोक १५ ते १७ श्लोक १८ ते २२ श्लोक २३ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३६ श्लोक ३७ ते ४२ श्लोक ४३ ते ४८ श्लोक ४९ ते ५२ श्लोक ५३ ते ५६ श्लोक ५७ ते ६० श्लोक ६१ ते ६४ श्लोक ६५ तत्वविवेक - श्लोक २३ ते २६ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक २३ ते २६ Translation - भाषांतर बुद्धिकर्मेंद्रियप्राणपंचकैर्मनसा धिया ॥शरीरं सप्तदशभि: सूक्ष्मतल्लिंगमुच्यते ॥२३॥एवं कर्मेंद्रिया ज्ञानेंद्रिय प्राण ॥ हीं पंचकें त्रय एकवटून ॥त्यांत बुद्धि मन मिळोन ॥ सतरा तत्वें ॥१०५॥तया नाम लिग शरीर ॥ सतरा तत्वांचें बिढार ॥सकल सुख दु:ख विचार ॥ येथची वसे ॥१०६॥प्राज्ञस्तत्राभिमानेन तैजसत्वं प्रपद्यते ॥हिरण्यगर्भतामीशस्तयोर्व्यष्टिसमष्टिता ॥२४॥ययाचा धरुनी अभिमान ॥ तैजस नाम झाला प्राज्ञ ॥ईश्वरा हिरण्य गर्भजाण ॥ बोलताती ॥१०७॥व्याष्टि रूपाच्या अभिमाना ॥ तैजस बोलती जाणा ॥समेष्टीच्या अभिमाना ॥ हिरण्यगर्भ ॥१०८॥समष्टिरीश: सर्वेषां स्वात्मतादात्म्यवेदनात् ॥तदभावात्ततोऽन्ये तु कथ्यंते व्यष्टिसंज्ञया ॥२५॥सकळ लिंग शरिराचा ॥ धरितो जो अभिमान साचा ॥तया समेष्टीपणाचा ॥ ईश्वर बोलती ॥१०९॥तोचि हिरण्यगर्भ जाण ॥ इतर जीव सकलही सान ॥एकेक व्यष्टी धरून ॥ राहटताती ॥११०॥तद्भोगाय पुनर्भोग्यभोगायतनजन्मने ॥पंचीकरोति भगवान् प्रत्येकं वियदादिकम् ॥२६॥तया जीवाचे उपभोगासाठीं ॥ पुन्हां भोग्य करी जगजेठी ॥भोगायतनाची अटाटी ॥ रचीतसे ॥१११॥वियदादि पंच भूतातें ॥ पंचीपंच करूनी पांचांतें ॥भगवान जाहले निर्मिते ॥ स्थूल देहा ॥११२॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP