तत्वविवेक - प्रारंभ
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते
हरि : ॐ
आतां नमन करूं जावें ॥ तव नम्य आदी भावावें ॥
मगतयाशी वंदावें ॥ गुरु म्हणोनी ॥१॥
परि हा शिष्टसंप्रदायु ॥ द्वैतीं झाला दीर्घायु ॥
गुरुशिष्यांचा प्रत्ययु ॥ परंपरें ॥२॥
अंधाचिया मालिका ॥ न सोडिती एकमेकां ॥
दूषण ठेविती लोकां ॥ चक्षुष्मंतं ॥३॥
आदि मनन करावें ॥ म्हणजे स्वरूपीं निश्चित होवावें ॥
कल्पना कांहींच नुद्भवे ॥ मनोमयी ॥४॥
तैसेचि मुनी विद्यारण्य ॥ बोलिले स्वमहिमान ॥
वेदमातेचे कडिये बैसोन ॥ पंचदशी ॥५॥
पंचविवेक पंचदीप ॥ तैसा आनंद ही पांचरूप ॥
दाविली पंचदशरूप ॥ पंचदशी ॥६॥
ऐसी ही नवयुवा सुंदरी ॥ वाग्विलासें नृत्यकरी ॥
भाषा संस्कृताभीतरी ॥ गूढध्वनी ॥७॥
तें सकळां नकळें ॥ म्हणोनी ओवियें गाइलें ॥
प्राकृत जन भोळे ॥ तृप्त कराया ॥८॥
नवल प्रेमाची आवडी ॥ स्वदेश भाषेची परम गोडी ॥
संस्कृतेंही झालीं वेडीं ॥ वाग्विलासें ॥९॥
कांहीं गुप्त ठेविल्या मनोगता ॥ उघद बोलियेले यथार्थता ॥
म्हणोनीया हरिगीता ॥ नाम ठेवियेलें ॥१०॥
भाषा शुद्ध मराठी ॥ परि अमृतही लाळ घोटी ॥
ज्ञानिये टकमक द्दष्टी ॥ भांबावती ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2014
TOP