तत्वविवेक - श्लोक १८ ते २२
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.
तम:प्रधानप्रकृतेस्तद्भोगायेश्वराज्ञया ॥
वियत्पवनतेजोंबुभुवो भूतानि जज्ञिरे ॥१८॥
तयाचे भोगा साठीं ॥ आकाशादि सृष्टी ॥
निर्माण करी परमेष्टी ॥ ईक्षण मात्रें ॥९६॥
आकाश वायु अग्नि आप ॥ पृथ्वी हे पांचवें रूप ॥
भरतें झालें माप ॥ भूत सृष्टीचें ॥९७॥
सत्वांशै:पंचभिस्तेषां क्रमाद्धींद्रियपंचकम् ॥
श्रोत्रत्वगक्षिरसनघ्राणाख्यमुपजायते ॥१९॥
तया पंचभूतांचें सत्वांश ॥ तोचि ज्ञानेंद्रियांचा वंश ॥
होते झालें एकेक अंश ॥ एकेका सवें ॥९८॥
श्रोत्र त्वचा अक्षी रसना घ्राण ॥ज्ञानेद्रियें झालीं निर्माण ॥
आकाशादिपृथ्वी पासून ॥ एकेकाची ॥९९॥
तैरंत:करणं सर्वैर्वृत्तिभेदेन तदद्विधा ॥
मनो विमर्शरूपं स्याद्बुद्धि: स्यान्निश्चयात्मिका ॥२०॥
सकलभूतांचा सत्वांश एकवटून ॥ तयाचें बनलें अंत: करण ॥
त्याचे दोन भेद जाण ॥ मन बुद्धि ॥१००॥
संशयीं रूप मनाचें ॥ बुद्धि हें रूप निश्चयाचें ॥
अंत: करण जाणतेपणाचें ॥ ओझें वाही ॥१०१॥
रजोंऽशै: पंचभिस्तेषां क्रमात्कर्मेंद्रियाणि तु ॥
वाक्पाणिपादपाय़ूपस्थाधानानि जज्ञिरे ॥२१॥
तै: सर्वै: सहितै: प्राणो वृत्तिभेदात्स पंचधा ॥
प्राणोपान: समानश्चोदानव्यानौ च ते पुन: ॥२२॥
वाचा पाणि पाद ॥ उपस्थ आणि पांचवें गुद ॥
पंचभूताचे पांची भेद ॥ रजांशें झाले ॥१०२॥
रजांश एकवटून ॥ प्राण झाल निर्माण ॥
तोहि पंचभेद जाण ॥ होता झाला ॥१०३॥
प्राण प्राण अपान समान ॥ उदान आणि व्यान ॥
क्रियाभेदें भेद जाण ॥ एरव्हीं एक ॥१०४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2014
TOP